स्टार्टअप ॲक्सलरेटर WaveX कडून 20-24 नोव्हेंबर 2025 दरम्यान इफ्फी गोवा 2025 मध्ये आयोजित होणाऱ्या वेव्हज बाजार मध्ये सहभागी होण्यासाठी स्टार्टअप्सना निमंत्रण
इफ्फी गोवा 2025 मध्ये वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स या दोन्हींमध्ये सहभागी होण्यासाठी बुकिंग्ज खुली आहेत
वेव्हेक्स बुथ्समध्ये घडणार वेव्हज बाजारमधील उदयोन्मुख एव्हीजीसी-एक्सआर आणि मीडिया-टेक स्टार्टअप्सचे दर्शन, जागतिक दृश्यमानता आणि नेटवर्किंग संधी होणार उपलब्ध
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोव्यामध्ये आयोजित होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत वेव्हेक्स बुथ्ससाठी वेव्हज् बाजारमधील वैशिष्ट्यपूर्ण स्टार्टअप प्रदर्शनाची दोन्ही बुकिंग्ज खुली झाल्याची घोषणा केली आहे. एव्हीजीसी-एक्सआर( ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रियालिटी) आणि मनोरंजन क्षेत्रातील होतकरू स्टार्ट अप्सना जागतिक उद्योगातील धुरीण, गुंतवणूकदार आणि निर्मिती स्टुडिओ यांच्यासोबत जोडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. चित्रपट निर्माते, निर्माते आणि माध्यम व्यावसायिक यांच्या उत्साही सहभागासाठी ओळखल्या जाणाऱ्या इफ्फीच्या फिल्म बाजार या नेटवर्किंग हबच्या छत्राखालीच वेव्हज बाजारचे 20 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजन होणार आहे.
30,000 रुपये प्रति स्टॉल (विभागणी तत्वावर) या नाममात्र शुल्कावर प्रत्येक बूथ उपलब्ध असेल. सहभागी स्टार्टअप्सना खालील सुविधा उपलब्ध होतील.
- 2 प्रतिनिधी पासेस
- भोजन आणि चहा
- सायंकालीन नेटवर्किंग सुविधा
- जागतिक चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान व्यावसायिक यांच्याबरोबर प्रत्यक्ष उपस्थिती
इच्छुक स्टार्टअप्सना wavex.wavesbazaar.com येथे नोंदणी करता येईल. काही शंका असल्यास wavex-mib[at]gov[dot]in येथे संपर्क साधावा. उपलब्ध स्टॉल्सची संख्या मर्यादित आहे आणि त्यांचे वाटप 'आधी येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर केले जाईल.
इफ्फी, गोवा विषयी
1952 पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या(इफ्फी) आयोजनाला सुरुवात झाली. जागतिक चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्तेचा गौरव करणारा आणि चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट रसिक यांना एका छताखाली आणणारे व्यासपीठ असलेला हा आशियातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. गोव्यामध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या इफ्फी या महोत्सवात जागतिक चित्रपट क्षेत्रातील संबंधित मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि सर्जनशील निर्मितीसाठी सहकार्य आणि संधी उपलब्ध करून देणारा एक उत्प्रेरक म्हणून हा महोत्सव काम करतो. गोव्यामध्ये पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचे आयोजन होणार आहे.
वेव्हेक्सविषयी
वेव्हेक्स हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक राष्ट्रीय स्टार्ट अप ऍक्सलरेटर आणि इन्क्युबेशन उपक्रम आहे. एव्हीजीसी-एक्सआर आणि माध्यम तंत्रज्ञान परिसंस्थेतील नवोन्मेष आणि उद्यमशीलता यांची जोपासना करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.आघाडीच्या शैक्षणिक, उद्योगासोबत आणि इन्क्युबेशन नेटवर्कसोबत सहकार्याच्या माध्यमातून वेव्हेक्स सर्जनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सना त्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी पाठबळ देते ज्यामुळे भारताच्या वृद्धिंगत होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान मिळत आहे.
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2187038
| Visitor Counter:
30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam