माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवली
Posted On:
05 NOV 2025 6:00PM by PIB Mumbai
मुंबई, 5 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृतीची अंतिम मुदत येत्या 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या पत्रकारांनी अद्याप त्यांचे अर्ज पूर्ण भरले नसतील त्यांना आता अतिरिक्त कालावधी मिळू शकेल.
माध्यम अधिस्वीकृतीसाठी : https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx पोर्टल खुले असेल.

अधिस्वीकृत माध्यम प्रतिनिधींना महोत्सवातील सर्व विशेष कार्यक्रम, मास्टरक्लासेस, पॅनेल चर्चासत्रे आणि पत्रकार परिषदांमध्ये प्रवेश मिळेल. हा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील पणजी इथे आयोजित केला जाणार आहे.
याशिवाय, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे पत्र सूचना कार्यालयाच्या सहकार्याने अधिस्वीकृत पत्रकारांसाठी खास चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम आयोजित करणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर अधिस्वीकृत माध्यम प्रतिनिधींना यात प्रवेश दिला जाईल.
ज्या पत्रकारांनी याआधीच इफ्फी 2025 च्या माध्यम अधिस्वीकृतीसाठी अर्ज केला आहे, त्यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल, अधिस्वीकृतीसंदर्भात पत्रकार पीआयबी इफ्फी मदत कक्षाशी 📧 iffi.mediadesk@pib.gov.in या इमेलवर संपर्क साधू शकतात
इफ्फी हा आशियातील एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव असून त्या माध्यमातून हजारो चित्रपट व्यावसायिक आणि रसिक दरवर्षी गोवा येथे एकत्र येतात. पत्रकारांनी आपला अर्ज सुधारित अंतिम मुदतीच्या आधीच अधिस्वीकृतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186686)
Visitor Counter : 8