पंतप्रधान कार्यालय
मुंबई मेट्रोमध्ये पंतप्रधानानी स्थानिकांशी साधलेला संवाद
Posted On:
05 OCT 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2024
पुरुष प्रवासी: मी एआय वर संशोधन करत आहे.
पंतप्रधान: तुम्ही एआय वर संशोधन करत आहात! हे चांगलेच आहे.
पुरुष प्रवासी: सर, आम्ही विकास आणि वाढीसाठी तसेच भारतात नवीन औषधे आणण्यासाठी औषधनिर्माण क्षेत्रात एआय कसे वापरायचे ते पाहत आहोत.
महिला प्रवासी: मी समाजशास्त्रात बी.ए. करत आहे आणि मला भविष्यात समाजासाठी योगदान द्यायचे आहे.
महिला प्रवासी: मी तुमच्या सर्व योजनांचा पूर्णपणे वापर केला आहे. उदाहरणार्थ, मला पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांचा फायदा झाला आहे.
महिला प्रवासी: माझा हँडबॅग बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय आहे. मी स्वनिधी योजनेचा फायदा घेतला आणि माझा व्यवसाय वाढवला.
पंतप्रधान: छान!
पंतप्रधान: शिंदेजींनी सुरू केलेल्या योजनेतून तुम्हाला कोणते फायदे मिळाले?
महिला प्रवासी: हो, आम्हाला लाडकी बहीण योजनेचा खूप फायदा झाला.
पंतप्रधान: आणि तुमच्या समुदायातील सर्व महिलांना?
महिला प्रवासी: हो, साहेब, आमची बालांचल नावाची एक महिला संघटना आहे आणि आम्ही खात्री केली आहे की सर्व महिलांनी फॉर्म भरले आणि त्याचा लाभ घेतला.
पंतप्रधान: तुम्हाला पैसे मिळाले का?
महिला प्रवासी: हो, साहेब, आम्हाला या आठवड्यात ते मिळाले.
पंतप्रधान: तुम्ही आनंदी आहात का?
महिला प्रवासी: हो, हो साहेब.
पंतप्रधान: तुम्ही किती वर्षांपासून काम करत आहात?
मेट्रो कामगार: साहेब, आता सात वर्षे झाली.
पंतप्रधान: तुम्ही आतापर्यंत कामात प्रभुत्व मिळवले असेल?
मेट्रो कामगार: हो, साहेब, आम्हाला खूप अनुभव मिळाला आहे.
पंतप्रधान: तर आता तुम्ही कुठेही मेट्रो मार्ग बांधू शकता.
मेट्रो कामगार: हो, साहेब, आम्ही त्या कुठेही बांधू शकतो. आता आम्हाला खूप अनुभव आहे.
पंतप्रधान: तुमचे कुटुंबीय आनंदी आहेत का?
मेट्रो कामगार: हो, साहेब, खूप आनंदी.
पंतप्रधान: तुमच्या चांगल्या कामाने?
मेट्रो कामगार: हो, आमच्या यशाने.
पंतप्रधान: एके दिवशी तुमच्या कुटुंबाला मेट्रोने फिरायला घेऊन जा.
मेट्रो कामगार: हो, साहेब, आम्ही त्यांना घेऊन जाऊ.
पंतप्रधान: त्यांना सांगा की तुम्ही ते बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली.
मेट्रो कामगार: हो, साहेब.
* * *
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2185012)
अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam