पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिक: पंतप्रधानांनी भारतीय चमूला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2024 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूला शुभेच्छा दिल्या.
या चमूतील प्रत्येक खेळाडू हा भारताचा अभिमान आहे असे सांगत, पंतप्रधान मोदी यांनी दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या 33 व्या वर्षीच्या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवण्यात यशस्वी होण्यासाठी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:
“पॅरिस #Olympics स्पर्धांचा प्रारंभ होत असताना, माझ्या शुभेच्छा भारतीय चमूसोबत आहेत. त्यातील प्रत्येक क्रीडापटूचा भारताला अभिमान आहे. त्या सर्वांनी चमकदार कामगिरी करून दाखवावी आणि आपल्या सर्वांना त्यांच्या असाधारण सादरीकरणाने प्रेरित करत खिलाडूवृत्तीची सच्ची भावना मूर्त रुपात साकार करून दाखवावी हीच शुभेच्छा.”
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184119)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam