पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण उत्पादनातील भारताच्या अलीकडील वाटचालीबद्दलचा संदेश LinkedIn वर सामायिक केला

Posted On: 30 OCT 2024 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा इथे C-295 विमान उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. यानिमित्ताने, त्यांनी भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील वाटचालीबद्दल,  या महत्त्वपूर्ण कामगिरीवरील त्यांच्या विचारांबद्दलचा एक संदेश LinkedIn  या समाजमाध्यमावर सामायिक केला आहे.

भारताच्या संरक्षण क्रांतीने घेतली भरारी  ! ('India's Defence Revolution Takes Flight!) या शिर्षकाअंतर्गत त्यांनी हा संदेश सामायिक केला आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामाइक केलेला संदेश :

“मी नुकताच @LinkedIn या समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात संरक्षण उत्पादनात भारताने अलीकडच्या काळात साध्य केलेल्या प्रगतीवर भर दिला आहे. आपण येत्या काळात या क्षेत्राला आणखी गती देणार आहोत.”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184083) अभ्यागत कक्ष : 16