पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अद्भुत, अतुलनीय आणि कल्पनातीत! अयोध्येतील जनतेला भव्य आणि दिव्य दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! : पंतप्रधान


रामभक्तांच्या असंख्य आणि अखंड त्याग व तपश्चर्येनंतर 500 वर्षांनी हा पवित्र क्षण अवतरला आहे : पंतप्रधान

Posted On: 30 OCT 2024 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील जनता तसेच संपूर्ण राष्ट्राचे भव्य आणि दिव्य दीपोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाज माध्यम एक्स वर लिहिलेल्या संदेशांच्या एका मालिकेत पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामांच्या पवित्र जन्मभूमी अयोध्येत साजऱ्या होत असलेल्या या प्रकाशमय उत्सवाबद्दल आपला आनंद आणि अभिमान व्यक्त केला आणि म्हटले आहे की...,

“अद्भुत, अतुलनीय आणि कल्पनातीत!

अयोध्येतील जनतेला भव्य आणि दिव्य दीपोत्सवाच्या अनेक शुभेच्छा!

रामलल्लाच्या पवित्र जन्मभूमीवर कोट्यवधी दीपांनी उजळलेला हे ज्योतीपर्व अत्यंत भावनिक आहे. अयोध्या धामातून प्रकटणारी ही प्रकाशकिरणे माझ्या देशवासी कुटुंबियांना नवीन ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण करतील. प्रभू श्रीराम सर्व देशबांधवांना आनंद, समृद्धी आणि यशस्वी जीवनाचे आशीर्वाद देवोत.

जय श्रीराम!”

या दीपावलीचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान पुढे म्हणाले, 

“दिव्य अयोध्या!

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात राज्याभिषेक झाल्यानंतरची ही पहिली दीपावली आहे. अयोध्येतील श्रीरामलल्लांच्या मंदिराचे हे अप्रतिम सौंदर्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे आहे.

500 वर्षांनंतर रामभक्तांच्या असंख्य त्याग, बलिदान आणि सततच्या तपश्चर्येनंतर हा पवित्र क्षण आला आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होणे हे आपले परम भाग्य आहे. मला विश्वास आहे की प्रभू श्रीरामांचे जीवन आणि त्यांचे आदर्श देशवासीयांना विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सतत प्रेरणा देतील.

जय सिया राम!”

 

* * *

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183833) Visitor Counter : 6