पंतप्रधान कार्यालय
थायलंडच्या राजमाता महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
26 OCT 2025 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी थायलंडच्या राजमाता, महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोक संदेशात त्यांनी महाराणी सिरिकीत यांनी लोकसेवेत आयुष्यभर दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहत नमूद केले की, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
X या समाजमाध्यमावर टिप्पणी करताना मोदी म्हणतात:
“थायलंडच्या राजमाता महाराणी सिरिकीत यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकून, मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी आयुष्यभर लोकसेवेसाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या अत्यंत दुःखद क्षणी मी महामहिम महाराज, राजघराण्यातील सदस्य आणि थायलंडच्या लोकांप्रति माझ्या मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो.”
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182636)
Visitor Counter : 10