पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अभिनेता राम चरण आणि अनिल कामिनेनी यांच्या भेटीदरम्यान धनुर्विद्येला लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2025 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला तसेच अनिल कामिनेनी यांची भेट घेतली.
त्यांच्यामध्ये झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी, प्रथम जागतिक धनुर्विद्या प्रीमियर लीगद्वारे धनुर्विद्येला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनासाठीच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे धनुर्विद्येचा समृद्ध वारसा जतन करण्यास मदत होईल आणि अधिकाधिक तरुणांना या खेळाची निवड करण्याची प्रेरणा मिळेल असे नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात,
उपासना आणि अनिल कामिनेनी गारू तुम्हाला भेटून आनंद झाला. धनुर्विद्या लोकप्रिय करण्याचे तुमचे सामूहिक प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि असंख्य तरुणांना त्याचा फायदा होणार आहे.
@AlwaysRamCharan
@upasanakonidela”
* * *
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178218)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam