पंतप्रधान कार्यालय
भारताच्या विकासगाथेत अरुणाचल प्रदेशच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2025 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखात देशाच्या विकासाच्या प्रवासात अरुणाचल प्रदेशचे परिवर्तन आणि त्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधान म्हणाले की ईशान्य भारत हे पहिल्यांदाच विकासाच्या गाथेचा परिघ नव्हे तर धडधडणारे हृदय ठरले आहे. नवीन विमानतळांपासून ते सक्षम स्वयं-सहाय्यता गटांपर्यंत, आणि कनेक्टिव्हिटीपासून ते सर्जनशीलतेपर्यंत, अरुणाचल प्रदेश विकसित भारताच्या भावनेचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्र्यांनी लिहिलेल्या लेखाला उत्तर देताना मोदी म्हणाले;
"पहिल्यांदाच, ईशान्य भारत हे विकासाच्या गाथेचा परिघ नव्हे तर भारताच्या विकासाच्या कथेचे धडधडणारे हृदय ठरले आहे. नवीन विमानतळांपासून ते सक्षम स्वयंसहायता गटांपर्यंत, कनेक्टिव्हिटीपासून ते सर्जनशीलतेपर्यंत, अरुणाचल प्रदेश विकसित भारताच्या भावनेचे प्रतिबिंब आहे. केंद्रीय मंत्री श्री @JM_Scindia यांचा वाचलाच पाहिजे असा लेख."
* * *
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177756)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam