पंतप्रधान कार्यालय
पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2025 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
नवी दिल्ली इथे आयोजित जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक केले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 6 सुवर्ण पदकांसह 22 पदके जिंकून, या स्पर्धेच्या पदकतालिकेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीने देशाच्या पॅरा-क्रीडा प्रवासातील एक नवीन टप्पा गाठला गेला आहे. भारताने पहिल्यांदाच या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
आपल्या पॅरा-ॲथलीट्सची ऐतिहासिक कामगिरी!
यावर्षीची जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप खूपच खास होती. 6 सुवर्ण पदकांसह 22 पदके जिंकून भारतीय चमूने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. आपल्या ॲथलीट्सचे अभिनंदन. त्यांचे यश असंख्य लोकांना प्रेरणा देईल. मला आपल्या चमूतील प्रत्येक सदस्याचा अभिमान वाटतो आणि मी त्यांना भविष्यातील त्यांच्या मोहिमांसाठीही खूप खूप शुभेच्छा देतो.
या स्पर्धेचे दिल्लीत आयोजन करणे हा देखील भारतासाठी सन्मानाचा क्षण होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास 100 देशांतील ॲथलीट्स आणि सहायक कर्मचाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175489)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada