पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नारी शक्तीसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान प्रभावी आणि लाभदायी बनवण्याच्या उद्देशाने तळापर्यंत काम करणाऱ्यांचे केले कौतुक
Posted On:
04 OCT 2025 3:41PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान प्रभावी आणि भारताच्या नारी शक्तीसाठी फायदेशीर बनवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
जन भागिदारी - म्हणजेच लोकसहभागाचे हे अभियान एक उत्तम उदाहरण असल्याचे वर्णन पंतप्रधानांनी केले. अशी सामूहिक कृती जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच निरोगी, सशक्त समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वाची आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"प्रशंसनीय प्रयत्न! आपल्या नारी शक्तीसाठी हे अभियान इतके प्रभावी आणि फायदेशीर बनवण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे त्यांचे कौतुक. जीवनमान उंचाविण्यासाठी जन भागिदारीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.”
***
निलिमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174826)
Visitor Counter : 13