पंतप्रधान कार्यालय
दिल्लीतील चित्तरंजन पार्क येथे दुर्गा पूजा उत्सवात पंतप्रधान झाले सहभागी
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या सुखासाठी आणि निरामय आरोग्यासाठी केली प्रार्थना
Posted On:
30 SEP 2025 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
महाअष्टमीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील चित्तरंजन पार्कला भेट दिली आणि तेथील दुर्गा पूजा उत्सवात ते सहभागी झाले.
मोदी म्हणाले की, चित्तरंजन पार्क बंगाली संस्कृतीशी असलेल्या त्याच्या घट्ट संबंधासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेथील उत्सव खरोखरच आपल्या समाजातील एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलता प्रतिबिंबित करतो असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या सुखासाठी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली.
पंतप्रधानांनी या सोहळ्यातील काही क्षण सामायिक करताना म्हटले: दिल्लीतील एका अतिशय संस्मरणीय दुर्गा पूजा उत्सवातील काही लक्षवेधक क्षण! सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदो….
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“आज, महाअष्टमीच्या शुभ प्रसंगी , मी दिल्लीतील चित्तरंजन पार्कला भेट दिली आणि तेथील दुर्गा पूजा उत्सवात सहभागी झालो. चित्तरंजन पार्क बंगाली संस्कृतीशी असलेल्या त्याच्या घट्ट संबंधासाठी ओळखले जाते. हा उत्सव खरोखरच आपल्या समाजातील एकता आणि सांस्कृतिक चैतन्यशीलता प्रतिबिंबित करतो. सर्वांच्या सुखासाठी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली.”
“उत्सवातील लक्षवेधक क्षण असे म्हणत नमूद केले : “दिल्लीतील एका अतिशय संस्मरणीय दुर्गा पूजा उत्सवातील लक्षवेधक क्षण ! सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदो ….”
“আজ মহা অষ্টমীর পুণ্যদিনে, আমি দিল্লীর চিত্তরঞ্জন পার্কের দুর্গাপুজোয় অংশ নিতে গিয়েছিলাম। চিত্তরঞ্জন পার্ক, বাঙালী সংস্কৃতির সঙ্গে ওতপ্রোতভাবে জড়িত। আমাদের সমাজের ঐক্য ও সাংস্কৃতিক প্রাণময়তার প্রকৃত রূপ ফুটে ওঠে এই অনুষ্ঠানগুলিতে। সকলের সুখ ও কল্যাণের জন্যে প্রার্থনা করেছি আমি।”
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173417)
अभ्यागत कक्ष : 32
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam