गृह मंत्रालय
नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर मोदी सरकारने देशातल्या सर्व माताभगिनींना पुढच्या टप्प्यातील जीएसटी सुधारणांची भेट दिली – केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
Posted On:
22 SEP 2025 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
मोदी सरकारने नवरात्रीच्या पवित्र काळात देशातल्या सर्व माताभगिनींना पुढच्या टप्प्यातील जीएसटी सुधारणांची भेट दिली आहे, असे केंद्रिय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशांमध्ये केंद्रिय गृह व सहकार मंत्री म्हणतात, नवरात्रीच्या या पावन काळात मोदी सरकारने देशातील सर्व माताभगिनींना पुढच्या टप्प्यातील जीएसटी सुधारणांची भेट दिली आहे. मोदींनी देशवासियांना दिलेल्या जीएसटी सुधारणांबाबतच्या वचनाची अंमलबावणी आजपासून देशभरात सुरू होत आहे. या जीएसटी सुधारणांमध्ये 390 पेक्षा जास्त वस्तूंवरील ऐतिहासिक करकपातीचा समावेश आहे. अन्नधान्य, घरगुती वस्तू, गृहबांधणी साहित्य, वाहने, कृषी, आरोग्य आणि विमा या क्षेत्रांतील अभूतपूर्व कर कपातीमुळे लोकांच्या आयुष्यात आनंद येईल आणि त्यांच्या बचतीतही वाढ होईल.
अमित शहा म्हणाले, पुढच्या टप्प्यातील जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारताचा निर्धार प्रत्यक्षात आणण्यात लक्षणीय भूमिका बजावेल. देशाला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात मोदींनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करुन जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या निश्चयाला कशाप्रकारे बळ देतील हे समजावून सांगितले आहे. आपल्या दैनंदिन वापरात स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करुन व प्रत्येक घर आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनवून तुम्हीसुद्धा आत्मनिर्भर देशाच्या उभारणीत आपले योगदान देऊ शकता.
केंद्रिय गृहमंत्री म्हणाले की, मोदी सरकार मध्यम वर्गासाठी अनेक संधी खुल्या करुन त्यांचे उत्पन्न वाढवत आहे आणि पुढच्या टप्प्यातील जीएसटी सुधारणांच्या माध्यमातून त्यांच्या बचतीत सातत्याने वाढ होईल याचीही काळजी घेत आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू, औषधे व आरोग्यसेवा उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि शैक्षणिक साहित्य यावरची जीएसटी दरातील मोठी कपात यामुळे त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल तसेच जास्त बचत करण्यालाही प्रोत्साहन मिळेल.
* * *
सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169634)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam