पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राजकीय दौऱ्याची निष्पत्ती
Posted On:
04 JUL 2025 11:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2025
A) सामंजस्य करार / इतर करारावर स्वाक्षरी:
- भारतीय औषधनिर्माणशास्त्राबाबत सामंजस्य करार
- जलद परिणाम प्रकल्पांच्या (क्यूआयपी) अंमलबजावणीसाठी भारतीय अनुदान सहाय्यावर करार
- 2025-2028 या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम
- क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
- राजनैतिक प्रशिक्षणातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
- त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठात (यूडब्ल्यूआय ) हिंदी आणि भारतीय अभ्यासाच्या दोन आयसीसीआर अध्यक्षांच्या पुनर्स्थापनेबाबत सामंजस्य करार
B) पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा:
- त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील भारतीय समुदायामधल्या सदस्यांच्या सहाव्या पिढीपर्यंत ओसीआय कार्ड सुविधेचा विस्तार: यापूर्वी, ही सुविधा त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील भारतीय समुदायामधल्या सदस्यांच्या चौथ्या पिढीपर्यंत उपलब्ध होती
- त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील शालेय विद्यार्थ्यांना 2000 लॅपटॉप भेट देण्यात आले.
- राष्ट्रीय कृषी विपणन आणि विकास महामंडळाला कृषी-प्रक्रिया यंत्रसामग्रीचे औपचारिक हस्तांतरण (1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स)
- त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये 800 लोकांसाठी 50 दिवसांसाठी कृत्रिम अवयव फिटिंग कॅम्प (पोस्टर-लाँच) आयोजित करणे
- 'हील इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत भारतात विशेष वैद्यकीय उपचार दिले जातील
- आरोग्यसेवा पुरवठ्यात मदत करण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो ला वीस (20) हेमोडायलिसिस युनिट्स आणि दोन (2) समुद्री रुग्णवाहिका भेट देणे
- छतावरील फोटोव्होल्टेइक सौर पॅनेल प्रदान करून त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयाचे सौरीकरण करणे
- भारतातील गीता महोत्सवाच्या अनुषंगाने पोर्ट ऑफ स्पेनमधील महात्मा गांधी सांस्कृतिक सहकार्य संस्थेत गीता महोत्सवाचे आयोजन.
- भारतातील त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि कॅरिबियन प्रदेशातील पंडितांना प्रशिक्षण
C) इतर परिणाम:
त्रिनिदाद आणि टोबॅगोने घोषणा केली की, ते भारताच्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी (सीडीआरआय) आणि जागतिक जैवइंधन आघाडी (जीबीए) या जागतिक उपक्रमांमध्ये सामील होत आहेत.
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169614)
Visitor Counter : 4
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam