पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांशी केली औपचारिक चर्चा

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2025 11:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2025

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रेड हाऊस येथे त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या पंतप्रधान महामहिम कमला प्रसाद-बिसेसर यांची भेट घेतली. अलीकडे झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून  दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान कमला प्रसाद- बिसेसर यांचे अभिनंदन केले.   कमला प्रसाद-बिसेसर यांनी केलेल्या  अगत्‍याशील  स्वागताबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

दोन्ही नेत्यांनी कृषी, आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण, डिजिटल परिवर्तन, यूपीआय, क्षमता बांधणी, संस्कृती, क्रीडा आणि दोन्ही देशातील लोकांमध्‍ये थेट संबंधासह विविध सहकार्यावर चर्चा केली. विकास कार्यामध्‍ये  सहकार्य करणे हाँ भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पंतप्रधान बिसेसर यांनी नमूद केले की, पंतप्रधान मोदी यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा यासारख्या सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी अधिक सहकार्याचे आवाहन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्रिनिदाद आणि टोबॅगोने भारतीय जनतेला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.  सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही नेत्यांनी  त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी दिली. ग्लोबल साउथमधील देशांमध्ये अधिक एकता निर्माण करण्यासाठी आणि भारत-कॅरिकॉम भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

उभय नेत्यांमधील चर्चेनंतर, औषधनिर्माणशास्त्र, जलद परिणाम प्रकल्प, संस्कृती, क्रीडा, राजनैतिक प्रशिक्षण आणि हिंदी आणि भारतीय अभ्यासांसाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदासाठी सहा सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय वंशाच्या सहाव्या पिढीला ‘ओसीआय कार्ड’  म्हणजेच परदेशस्‍थ भारतीय नागरिक कार्ड  देण्यासह द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.

चर्चेच्या निकालांची यादी येथे पाहता येईल. 

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांना दिलेल्या भारत भेटीच्या आमंत्रणाचा  त्यांनी स्वीकार केला. पंतप्रधान मोदी यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांमधील विशेष संबंध आणखी दृढ झाले आहेत.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2169078) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam