पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिली त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांना राम मंदिराची प्रतिकृती आणि पवित्र जलाची भेट
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 8:57AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानार्थ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या मेजवानीच्या कार्यक्रमा दरम्यान राम मंदिराची प्रतिकृती आणि प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभातील आणि शरयू नदीतील पवित्र जल भेट म्हणून दिले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
"पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या मेजवानीच्या कार्यक्रमा दरम्यान मी त्यांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आणि शरयू नदीतील तसेच प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभातील पवित्र जल भेट म्हणून दिले. भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील अतिशय घनिष्ठ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांची ती प्रतीके आहेत."
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168801)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam