पंतप्रधान कार्यालय
वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार
Posted On:
17 SEP 2025 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली यांना दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले:
"राष्ट्राध्यक्ष अली, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भारत आणि गयानामधील मैत्री आणि परस्पर विश्वासाचे दृढ बंध प्रतीत करणाऱ्या तुमच्या शुभेच्छांनी मन भरून आले."
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले:
"पंतप्रधान लक्सन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. आपली मैत्री माझ्यासाठी खास आहे. विकसित भारत 2047 च्या दिशेने भारताच्या वाटचालीत न्यूझीलंड हा एक महत्त्वाचा भागीदार आहे."
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना उत्तर देताना मोदी म्हणाले:
"माझे स्नेही, पंतप्रधान अल्बानीज, तुम्ही केलेल्या अभिष्टचिंतनासाठी धन्यवाद. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि आपल्या नागरिकांतील परस्पर संबंध आणखी दृढ करण्यास मी उत्सुक आहे."
भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांना उत्तर देताना मोदी म्हणाले:
"पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भूतानसोबतची आमची विशेष भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."
डोमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट यांना दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले:
"पंतप्रधान स्केरिट, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भारत हा डोमिनिकाच्या राष्ट्रकुलसोबत मैत्री आणि एकतेच्या मजबूत बंधांना खूप महत्त्व देतो."
* * *
निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167611)
Visitor Counter : 2