पंतप्रधान कार्यालय
स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि स्केटिंगमध्ये जागतिक विजेता म्हणून पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या आनंदकुमार वेलकुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2025 8:45AM by PIB Mumbai
स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये पुरुषांच्या वरिष्ठ गटात 1000 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आनंदकुमार वेलकुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. "त्याची जिद्द, वेग आणि उत्साहामुळे तो स्केटिंगमध्ये भारताचा पहिला जागतिक विजेता बनला आहे. त्याची कामगिरी असंख्य तरुणांना प्रेरणा देईल", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये पुरुषांच्या वरिष्ठ गटात 1000 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आनंदकुमार वेलकुमारचा अभिमान वाटत आहे. त्याची जिद्द, वेग आणि उत्साहामुळे तो स्केटिंगमध्ये भारताचा पहिला जागतिक विजेता बनला आहे. त्याची कामगिरी असंख्य तरुणांना प्रेरणा देईल. त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
***
SushamaKane/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2167038)
आगंतुक पटल : 85
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Bengali-TR
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada