पंतप्रधान कार्यालय
भारत - मॉरिशस संयुक्त घोषणा : विशेष आर्थिक पॅकेज
Posted On:
11 SEP 2025 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025
मॉरिशस प्रजासत्ताकाचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर अतिशय फलदायी चर्चा झाली. मॉरिशस सरकारकडून आलेल्या विनंती आधारे खालील प्रकल्प भारत आणि मॉरिशस यांनी संयुक्तरीत्या राबविण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
अनुदान पद्धतीवर राबविण्यात येणारे प्रकल्प/मदत :
I. सर शिवसागर रामगुलाम नवे राष्ट्रीय रुग्णालय.
II. आयुष उत्कृष्टता केंद्र.
III. पशुवैद्यकीय शाळा व प्राणी रुग्णालय.
IV. हेलिकॉप्टरची उपलब्धता.
या प्रकल्पांचा व मागणी केलेल्या मदतीचा अंदाजित खर्च सुमारे 215 दशलक्ष अमेरिकन डॉलर / 9.80 अब्ज मॉरिशियन रुपया इतका आहे.
अनुदान सह एलओसी यांच्या संयुक्त पद्धतीवर सुरू केले जाणारे प्रकल्प/मदत :
I. एसएसआर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एटीसी टॉवरचे बांधकाम पूर्ण करणे
II. मोटरवे एम 4 चा विकास.
III. रिंग रोड टप्पा II चा विकास.
IV. सीएचसीएलमार्फत बंदरांसंबंधी उपकरणांची खरेदी.
या प्रकल्पांचा/मदतीचा अंदाजित खर्च सुमारे 440 दशलक्ष अमेरिकन डॉलर / 20.10 अब्ज मॉरिशियन रुपया इतका आहे.
धोरणात्मक पातळीवर तत्त्वतः मान्य करण्यात आलेले प्रकल्प :
I. मॉरिशस बंदराचा पुनर्विकास व पुनर्रचना.
II. चागोस सागरी संरक्षित क्षेत्राचा विकास व देखरेखीमध्ये मदत.
भारत सरकार चालू आर्थिक वर्षात 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आर्थिक सहाय्य प्रदान करेल, यावरही तत्वतः सहमती झाली.
सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165812)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam