पंतप्रधान कार्यालय
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून साधला संवाद
इस्रायल आणि इराण यांच्यातील बदलत्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती
पंतप्रधान मोदी यांनी भारताला इस्राइल आणि इराण यांच्यातील परिस्थितिबाबत असलेली चिंता व्यक्त केली आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकर पूर्ववत करण्याच्या गरजेवर दिला भर
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2025 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना अलीकडच्या काळातील घडामोडी, इस्रायल आणि इराण यांच्यातील बदलत्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी भारताला इस्राइल आणि इराण यांच्यातील परिस्थितिबाबत असलेली चिंता व्यक्त करत या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकर पूर्ववत करण्याच्या गरजेवर भर दिला.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्यावर सहमति दर्शविली.
सोनल तुपे/आशिष सांगले/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164882)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam