पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ हे उद्दिष्ट अधोरेखित करत प्रत्येक नागरिकासाठी आर्थिक सुरक्षा आणि आरोग्यसेवा उपलब्धतेवर दिला भर

Posted On: 04 SEP 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सार्वत्रिक आर्थिक संरक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्धतेबाबत सरकारच्या वचनबद्धतेतील मोठे पाऊल अधोरेखित केले. #NextGenGST सुधारणांच्या नवीनतम टप्प्यात जीवन आणि आरोग्य विमा उत्पादनांवरील महत्त्वपूर्ण कर सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे हे विमा प्रत्येक नागरिकासाठी अधिक परवडणारे आणि सहज उपलब्ध होतील.

नरेंद्र भारिन्दवाल यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:

“गेल्या काही वर्षांत, आम्ही प्रत्येक नागरिकासाठी आर्थिक सुरक्षा आणि आरोग्यसेवा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

जीवन आणि आरोग्य विमा अधिक परवडणारे बनवणाऱ्या नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा म्हणजे आमच्या, ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या ध्येयपूर्तीच्या मार्गातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

एकत्रितपणे, आपण एक ‘आरोग्यसंपन्न  आणि समर्थ भारत’ घडवण्याकडे वाटचाल करत आहोत.

#NextGenGST”

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164011) Visitor Counter : 2