गृह मंत्रालय
महत्त्वपूर्ण निर्णय घेत कुकी-झो परिषदेने प्रवासी आणि अत्यावश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी राष्ट्रीय महामार्ग-02 खुला करण्यास दिली मान्यता
केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीचे प्रतिनिधीमंडळ यांच्यात नवी दिल्ली येथे गेले काही दिवस लागोपाठ सुरु असलेल्या बैठकानंतर हा निर्णय झाला
Posted On:
04 SEP 2025 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत कुकी-झो परिषदेने (केझेडसी), प्रवासी आणि अत्यावश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी राष्ट्रीय महामार्ग-02 खुला करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीचे प्रतिनिधीमंडळ यांच्यात नवी दिल्ली येथे गेले काही दिवस लागोपाठ सुरु असलेल्या बैठकानंतर हा निर्णय जाहीर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग (एनएच) क्र. 02 लगतच्या परिसरात शांतता राखण्यासाठी भारत सरकारने तेथे नेमलेल्या सुरक्षा दलांशी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केझेडसीने दिली आहे.
त्याच अनुषंगाने, एमएचए, मणिपूर राज्य सरकार आणि कुकी राष्ट्रीय संघटना/केएनओ तसेच युनायटेड पीपल्स फ्रंट/युपीएफ यांच्या प्रतिनिधींची एक त्रिपक्षीय बैठक आज नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत पुनर्वाटाघाटी झालेल्या अटी आणि शर्ती (ग्राउंड रुल्स) संबंधी त्रिपक्षीय कृती स्थगिती (एसओओ) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वाक्षऱ्या झाल्यापासून एक वर्ष कालावधीसाठी हा करार लागू असणार आहे. इतर तरतुदींसह सुधारित ग्राउंड रुल्स पुन्हा एकदा निश्चित करण्यात आले:
- मणिपूरची प्रादेशिक अखंडता.
- मणिपूर राज्यात कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी करुन उपाय शोधण्याची गरज.
केएनओ आणि युपीएफ यांनी खालील बाबींना देखील मान्यता दिली:
- संघर्षाच्या दृष्टीने जास्त संवेदनशील असलेल्या भागांपासून लांब असलेल्या भागात सात नियुक्त छावण्या स्थलांतरित कराव्या.
- नियुक्त छावण्यांची संख्या कमी करावी.
- जवळच्या सीआरपीएफ/बीएसएफ छावण्यांमध्ये शस्त्रे स्थलांतरित करावी..
- परदेशी नागरिकांची नावे यादीत असल्यास ती त्यातून वजा करण्यासाठी सुरक्षा दलांच्या जवानांतर्फे कसून शारीरिक पडताळणी केली जावी.
यापुढे एक संयुक्त देखरेख गट एसओओ कराराच्या आढाव्यासह ग्राउंड रुल्सच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि भविष्यात या नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करेल.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163718)
Visitor Counter : 8
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam