पंतप्रधान कार्यालय
भारताची टपाल प्रणाली जगातील सर्वात मोठे 'घरपोच बँकिंग जाळे' बनल्याविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
Posted On:
04 SEP 2025 1:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लिहिलेला एक लेख सामाईक केला आहे, ज्यामध्ये भारतीय टपाल कार्यालय आणि आयपीपीबी ऑनलाईनसह भारतीय टपाल प्रणाली कशा प्रकारे जगातील सर्वात मोठे घरपोच बँकिंग जाळे बनले आहे आणि सन्मान आणि सक्षमीकरण सुनिश्चित करत आहे त्याची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांच्या एक्सवरील एका पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणालेः
"सरकारच्या अभूतपूर्व प्रयत्नांमुळे, आपला साधा पोस्टमन आता आर्थिक समावेशकतेचा दूत बनला आहे. @IndiaPostOffice आणि @IPPBOnline यांच्या माध्यमातून, भारताची टपाल प्रणाली आता जगातील सर्वात मोठे ' घरपोच बँकिंग जाळे' बनली आहे, ज्यामुळे सन्मान आणि सक्षमीकरण सुनिश्चित होत आहे.
अधिक व्यापक दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांचा हा लेख वाचा!"
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163691)
Visitor Counter : 2
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam