पंतप्रधान कार्यालय
भारताच्या परिवर्तनकारी सेमीकंडक्टर प्रवासावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2025 12:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला ज्यामध्ये भारताच्या परिवर्तनकारी सेमीकंडक्टर प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सेमिकॉन इंडिया समिट 2025 हा देखील याच मार्गाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी भारताच्या परिवर्तनकारी सेमीकंडक्टर प्रवासावर लिहिले आहे. ते सांगतात की सेमिकॉन इंडिया समिट 2025 याच मार्गाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.
येत्या दशकात, भारतातील सेमीकंडक्टर युनिट्स जसजसे मोठ्या प्रमाणात कार्य करतील आणि परिपक्व होतील तसतसे संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्य साखळीसाठी आपला देश एक स्पर्धात्मक केंद्र म्हणून उदयास येईल यावर वैष्णव यांनी भर दिला आहे.
***
आशिष सांगळे / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2163302)
आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam