पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारच्या राष्ट्र सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन ऑन्ग हलिंग यांची घेतली भेट

Posted On: 31 AUG 2025 4:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन आंग हलिंग यांची भेट घेतली. भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट', 'ॲक्ट ईस्ट' आणि 'इंडो-पॅसिफिक' धोरणांचा एक भाग म्हणून म्यानमारसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत,असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, संरक्षण आणि सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सीमा व्यापार यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक पैलूंवर आणखी प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संपर्कव्यवस्था प्रकल्पांमधील प्रगतीमुळे दोन्ही देशांच्या लोकांमध्ये अधिक संवाद वाढेल, तसेच भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणात संकल्पना केलेल्या प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

म्यानमारमधील आगामी निवडणुका सर्व हितधारकांना सामील करून निष्पक्ष आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पडतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत 'म्यानमारच्या नेतृत्वाखालील' आणि 'म्यानमारच्या स्वतःच्या' शांतता प्रक्रियेला पाठिंबा देत आहे, ज्यासाठी शांततापूर्ण संवाद आणि सल्लामसलत हाच एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

म्यानमारच्या विकासविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी पाठबळ देण्याची भारताची तयारी असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

***

निलीमा चितळे / शैलेश पाटील / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162505) Visitor Counter : 2