राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 27 AUG 2025 3:34PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, 25 ऑगस्ट 2025 संपल्यानंतर, उपराष्ट्रपती निवडणूक, 2025 साठी दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

 

S.No

NAME

ADDRESS

1

Shri Buchireddy Sudershan Reddy

8-2-293/82/NL, 12-A MLA and MP Colony, Jubilee Hills Road No 10C TSSP Greater Hyderabad,    Telangana-500033

2

Shri C.P. Radhakrishnan

Jal Bhushan, Raj Bhavan,

Walkeshwar Road, Malabar Hill, Mumbai-400035

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, 2025 साठी मतदान मंगळवार, दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील संसद भवनातील वसुंधरा कक्ष क्रमांक एफ-101 येथे होईल. मतदान सकाळी 10:00 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05:00 वाजता समाप्त होईल.

भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र असतात. राज्यसभेचे नामांकित सदस्य देखील निवडणूक मंडळात समाविष्ट होण्यास पात्र आहेत आणि म्हणूनच ते मतदानात भाग घेण्यास पात्र आहेत.

उपराष्ट्रपती पदाची निवडणुक 2025 साठी संसद भवनातील मतदान व्यवस्था निवडणूक अधिकारी तसेच राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी पाहणार आहेत.

मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी 06:00 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2161313) अभ्यागत कक्ष : 24