पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून स्वराज पॉल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त.
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2025 9:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज पॉल यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, स्वराज पॉल यांचे युनायटेड किंग्डममधील उद्योग, परोपकार आणि सार्वजनिक सेवेतील योगदान तसेच भारताशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिलेला त्यांचा ठाम पाठिंबा नेहमीच स्मरणात राहील. मोदी यांनी स्वराज पॉल यांच्याशी झालेल्या अनेक संवादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील शोक संदेशात मोदी म्हणाले की,
स्वराज पॉल जी यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालो आहे. युनायटेड किंग्डममधील उद्योग, परोपकार आणि सार्वजनिक सेवेमधील त्यांचे योगदान तसेच भारताशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिलेले ठाम पाठबळ नेहमी स्मरणात राहील. आमच्यातील अनेक संवाद मला नेहमी आठवतील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.
***
SonalTupe/RajDaleka/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2159662)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam