पंतप्रधान कार्यालय
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
Posted On:
15 AUG 2025 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणालेः
“पंतप्रधान डॉ. नवीन रामगुलाम, आमच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय जिव्हाळ्याने दिलेल्या तुमच्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभारी आहे. मॉरिशस नेहमीच आपली सामायिक प्रगती, समृद्धी आणि आपल्या लोकांसाठी उज्ज्वल भविष्याच्या प्रयत्नांमध्ये एक धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार राहील.”
मालदीवच्या अध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"अध्यक्ष मुइज्जू, तुमच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपल्या लोकांसाठी आणि प्रदेशासाठी शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या आपल्या सामायिक दृष्टिकोनात मालदीव एक मौल्यवान शेजारी आणि जवळचा भागीदार आहे."
फ्रान्सच्या अध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"माझे मित्र, अध्यक्ष मॅक्रॉन, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय जिव्हाळ्याने दिलेल्या तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आम्ही आपल्या धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देतो आणि आपल्या लोकांच्या फायद्यासाठी ती अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत."
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या सदिच्छांबद्दल पंतप्रधान तोबगे यांचे मी आभार मानतो. येणाऱ्या काळात आपल्या राष्ट्रांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ होत राहोत."
* * *
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156988)