पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
प्रोजेक्ट लायनच्या यशातून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची सिंहगर्जना ऐकू येते : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक सिंह दिन 2025 साजरा
Posted On:
10 AUG 2025 12:47PM by PIB Mumbai
गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातल्या बरडा वन्यजीव अभयारण्यात आज जागतिक सिंह दिन - 2025 साजरा केला गेला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच गुजरात सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, तसेच गुजरातचे वनमंत्री मुलुभाई बेरा, खासदार, राज्य विधानमंडळाचे सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारतातील सिंहांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 2020 मध्ये सिंहांची संख्या 674 होती, ती वाढून आता 891 झाली असल्याचे सांगितले. आशियाई सिंह (Panthera leo persica) हे यशस्वी वन्यजीव संवर्धनाचे जागतिक प्रतीक आहेत आणि आजच्या जागतिक सिंह दिनानिमित्त, या प्रजातीचे अस्तित्व पुन्हा ठळकपणे निर्माण केल्याचा उत्सव साजरा करत आहोत असे त्यांनी सांगितले. 1990 मध्ये केवळ 284 सिंह होते, ही संख्या 2025 मध्ये 891 वर पोहोचली आहे. गेल्या दशकात सिंहाच्या संख्येत 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली तर, 2020 नंतर ही संख्या 32 टक्क्याने वाढली अशी माहिती त्यांनी दिली.
6PY5.jpeg)
या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक वन अधिकाऱ्याचे, वन्यजीवप्रेमींचे आणि पर्यावरणप्रेमींचेही यादव यांनी अभिनंदन केले.
M1IN.jpeg)
आज जगभरात केवळ गुजरातच्या गीरमध्ये आशियाई सिंह अस्तित्वात असणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. या सिंहाच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारने गेल्या दशकभरात केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आणि यामुळे जागतिक वन्यजीव संरक्षणाला उमेद मिळाली आहे ही बाब त्यांनी नमूद केली. आजच्या या समारंभातून या राजेशाही प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळू दे. हा वन्यजीव म्हणजे गुजरातच्या वारशाचे आणि भारताच्या पर्यावरणाच्या सामर्थ्याचे खरे प्रतीक आहे असेही ते म्हणाले.
R6CV.jpeg)
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. आशियाई सिंहांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी गुजरात वचनबद्ध असल्याची ग्वांनी त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गुजरात या महत्त्वाच्या प्रजातीसाठी जागतिक अधिवास म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154844)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam