पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2025 10:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे,
“सार्वजनिक जीवनात विविध स्तरांवरून पुढे येत जनतेसाठी समर्पण करणारे शिबू सोरेन जी हे एक तळागाळातील जनतेचे नेते होते.आदिवासी समुदाय,गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेतले. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रती माझ्या संवेदना मी व्यक्त करत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन जी यांच्याशी मी संभाषण करून शोक व्यक्त केला आहे. ओम शांती.”
सार्वजनिक जीवनात विविध स्तरांवरून पुढे येत जनतेसाठी समर्पण करणारे शिबू सोरेन जी हे एक तळागाळातील जनतेचे नेते होते.आदिवासी समुदाय,गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेतले. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रती माझ्या संवेदना मी व्यक्त करत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन जी यांच्याशी मी संभाषण करून शोक व्यक्त केला आहे. ओम शांती.
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2025
***
JaydeviPujariSwami/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2152046)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam