पंतप्रधान कार्यालय
मेघनाद देसाई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
29 JUL 2025 10:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि अर्थतज्ञ मेघनाद देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि अर्थतज्ञ मेघनाद देसाई यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते नेहमीच भारत आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेले राहिले. भारत-युके संबंध आणखी दृढ करण्यात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांचे मौल्यवान विचार सामायिक करणाऱ्या आमच्या चर्चांच्या स्नेहपूर्ण आठवणी लक्षात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती शोकसंवेदना. ओम शांती.”
***
SonalTupe/SanjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150057)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam