पंतप्रधान कार्यालय
फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2025
फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल दिव्या देशमुख हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा”, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना !
फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकणाऱ्या युवा दिव्या देशमुख हिचा अभिमान वाटतो. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन, यामुळे युवावर्गाला प्रेरणा मिळेल.
कोनेरू हम्पीने देखील संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा."
@DivyaDeshmukh05
@humpy_koneru
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2149426)
आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada