पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा

Posted On: 27 JUL 2025 9:40AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कर्तव्यनिष्ठा, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एक्स' या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलीस दल- (सीआरपीएफ)च्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील आव्हानात्मक परिस्थितीत सीआरपीएफने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कठीण प्रसंगी देखील कर्तव्य, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे. मानवी संकटांवर मात करण्यातही या बलाचे योगदान उल्लेखनीय आहे.

@crpfindia

***

शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2148996)