युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
माय भारत युवा स्वयंसेवकांची 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस पदयात्रा; कारगिलमधील भारताच्या विजयाचा 26 वा वर्धापनदिन करणार साजरा
द्रास येथे अभिवादन पदयात्रेचे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ करणार नेतृत्व
Posted On:
25 JUL 2025 11:12AM by PIB Mumbai
1999 च्या कारगिल युद्धात भारताच्या विजयाचा 26 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 26 जुलै 2025 रोजी द्रास, कारगिल येथे युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालयाच्या छत्राखाली, माय भारत (मेरा युवा भारत) 'कारगिल विजय दिवस पदयात्रा' आयोजित करणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळ तसेच श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्यासह 1,000 हून अधिक तरुण, माजी सैनिक, सशस्त्र दलाचे जवान, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होतील.
1.5 किलोमीटर अंतर असलेली ही पदयात्रा द्रास येथील हिमाबास पब्लिक हायस्कूलच्या मैदानावरून सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि भीमबेट येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर तिचा समारोप होईल.
पदयात्रेनंतर, केंद्रीय मंत्री 100 युवा स्वयंसेवकांसह कारगिल युद्ध स्मारकाकडे जातील. तिथे ते पुष्पचक्र अर्पण करून, 1999 च्या कारगिल संघर्षात सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांना आदरांजली वाहतील.
या प्रसंगी, मंत्री शक्ती उद्घोष प्रतिष्ठानच्या 26 महिला बाईकर्सचा सत्कार करतील. या महिला बाईकर्स शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी एक लांब पल्ल्याची मोटारसायकल रॅली पूर्ण करून युद्ध स्मारकावर दाखल होतील.
या पदयात्रेत "एक पेड माँ के नाम" मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम देखील राबवली जाईल. यामुळे देशभक्तीपर कर्तव्य आणि पर्यावरणीय जागृती तसेच विकसित भारत @2047 मध्ये शाश्वत विकासाप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित होईल.
***
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148317)