पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची घेतली भेट
Posted On:
24 JUL 2025 11:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्रिटन भेटीमध्ये यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची, त्यांच्या उन्हाळी निवासस्थान- सँडरिंगहॅम इस्टेट इथे भेट घेतली. पंतप्रधानांनी राजांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल आणि त्यांचे शाही कामकाज पुन्हा सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान आणि राजांनी आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीशी संबंधित बाबींवर चर्चा केली, ज्यामध्ये आयुर्वेद आणि योगसाधनेचा समावेश होता, तसेच त्यांचे फायदे जगभरातील लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, यावरही विचारमंथन झाले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. ऐतिहासिक भारत- ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (सीईटीए) स्वाक्षरी केल्यामुळे भागीदारीला नवी गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले. शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांनी राजे चार्ल्स यांना माहिती दिली. हवामान बदल आणि शाश्वततेसंदर्भात कशा प्रकारे सहकार्य करता येईल आणि त्यांच्या सामायिक दृष्टीकोनाला कशा प्रकारे चालना देता येईल यावरही त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान आणि महामहीम यांनी राष्ट्रकुल समूहात ब्रिटन आणि भारत कशा प्रकारे एकत्र काम करू शकतात यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी 'एक पेड माँ के नाम' या हरित मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्माननीय राजांचे आभार मानले आणि एक रोपटे त्यांना दिले, जे आगामी शरद ऋतूतील लागवडीच्या हंगामात सँडरिंगहॅम इस्टेटमध्ये लावले जाईल. पंतप्रधानांनी त्यांच्या आदरातिथ्याबद्दल सन्माननीय राजांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या अधिकृत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.
***
SuvarnaBedekar/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148235)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada