पंतप्रधान कार्यालय
मेघालय राज्याच्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करणारा लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
Posted On:
20 JUL 2025 4:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालय राज्याच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला आहे. पर्यटन, युवक सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गट , पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम आणि इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात झालेल्या परिवर्तनाबद्दल या लेखात कौतुक करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या एक्स या सामाजिक माध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांनी पर्यटन, युवक सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गट, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम आणि अशा अनेक उपक्रमांमुळे घडलेल्या मेघालयाच्या उल्लेखनीय परिवर्तनाचा उल्लेख केला आहे. भक्कम शासकीय पाठबळ आणि उत्साही लोकसहभागाच्या जोरावर हे राज्य सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी एक दिशादर्शक मॉडेल ठरले आहे.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146257)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam