पंतप्रधान कार्यालय
रिपब्लिक ऑफ कोरियाच्या विशेष दूतांच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
रिपब्लिक ऑफ कोरियाच्या किम बू क्यूम यांच्या नेतृत्वाखालील विशेष दूतांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रिपब्लिक ऑफ कोरियाचे (आरओके) राष्ट्राध्यक्ष जेम्युंग ली यांच्याशी नुकत्याच झालेल्या सकारात्मक भेटीचे स्मरण करून, पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांपासून जारी असलेली भारत- आरओके विशेष धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ही भागीदारी नवोन्मेश, संरक्षण, जहाजबांधणी आणि कुशल मनुष्यबळाची गतिशीलता यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सातत्याने वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
“किम बू क्यूम यांच्या नेतृत्वाखालील आरओकेच्या विशेष दूतांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना आनंद होत आहे. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष @Jaemyung_Lee यांच्याशी झालेल्या सकारात्मक भेटीचे स्मरण करत आहे. भारत-आरओके विशेष सामरिक भागीदारी, ज्याला 10 वर्षे पूर्ण होत आहेत, नवोन्मेश आणि संरक्षणापासून, ते जहाज बांधणी आणि कुशल मनुष्यबळाच्या गतिशीलतेपर्यंत वृद्धिंगत होत आहे. दोन्ही लोकशाही देशांमधील घनिष्ठ सहकार्य हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी योगदान देत आहे.”
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2145667)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam