पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रिओ दि जानेरो जाहीरनामा - अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी ग्लोबल साऊथ सहकार्य सामर्थ्यशाली करताना

Posted On: 07 JUL 2025 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2025

 

आम्ही, ब्रिक्स देशांचे नेते, 6 - 7 जुलै 2025 दरम्यान ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे "अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी ग्लोबल साऊथ सहकार्य सामर्थ्यशाली करणे" या मुद्द्यावर आयोजित 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भेटलो.

आम्ही ब्रिक्स राष्ट्रांमधील परस्पर आदर आणि समजूतदारपणा, सार्वभौम समानता, एकता, लोकशाही, खुलेपणा, समावेशकता, सहकार्य आणि एकमत या भावनांप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. ब्रिक्स शिखर परिषदेच्या 17 वर्षांच्या पूर्ततेनंतर आम्ही विस्तारित ब्रिक्समध्ये राजकीय आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय, सांस्कृतिक आणि व्यक्ती - व्यक्तींमधील सहकार्य या तीन स्तंभांखाली सहकार्य मजबूत करण्यासाठी तसेच शांतता, अधिक प्रतिनिधित्व, न्याय्य आंतरराष्ट्रीय व्यवस्था, पुनरुज्जीवित आणि सुधारित बहुपक्षीय व्यवस्था, शाश्वत विकास आणि समावेशक विकासाच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या हितासाठी आमची धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्धता दर्शवित आहोत.

ब्रिक्स सदस्य म्हणून इंडोनेशिया प्रजासत्ताक, तसेच ब्रिक्स भागीदार देश म्हणून बेलारूस प्रजासत्ताक, बहुराष्ट्रीय राष्ट्र बोलिव्हिया, कझाकस्तान प्रजासत्ताक, क्युबा प्रजासत्ताक, नायजेरियाचे संघराज्य प्रजासत्ताक, मलेशिया, थायलंडचे राज्य, व्हिएतनामचे समाजवादी प्रजासत्ताक, युगांडा प्रजासत्ताक आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक यांचे आम्ही स्वागत करतो.

आम्ही ब्रिक्स नेत्यांच्या हवामान वित्तविषयक चौकटीतील जाहीरनामा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक प्रशासनाविषयक ब्रिक्स नेत्यांच्या निवेदनाचे महत्त्व अधोरेखित करतो, तसेच सामाजिकदृष्ट्या निश्चित आजारांच्या निर्मूलनासाठी ब्रिक्स भागीदारीच्या प्रारंभाला मान्यता देतो. हे उपक्रम जागतिक समस्यांवरील समावेशक आणि शाश्वत उपायांना चालना देण्यासाठीच्या आमचे संयुक्त प्रयत्न प्रतिबिंबित करतात.

बहुपक्षीयता मजबूत करणे आणि जागतिक प्रशासनात सुधारणा करणे

व्यापक सल्लामसलत, संयुक्त योगदान आणि सामायिक फायद्यांच्या भावनेने अधिक न्याय्य, समतापूर्ण, चपळ, प्रभावी, कार्यक्षम, प्रतिसादात्मक, प्रातिनिधिक, कायदेशीर, लोकशाही आणि जबाबदार आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय प्रणालीला प्रोत्साहन देऊन जागतिक प्रशासनात पुनर्रचना आणि सुधारणा घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.

या संदर्भात, आम्ही भविष्यकालीन शिखर परिषदेत भविष्यकालीन करार स्वीकारल्याची नोंद घेतो, ज्यामध्ये जागतिक डिजिटल सारांश आणि भविष्यकालीन पिढींचा जाहीरनामा या दोन परिशिष्टांचा समावेश आहे. समकालीन वास्तवांना चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विद्यमान रचनेशी अनुकूल राहण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही बहुपक्षीयतेचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) सनदेमध्ये समाविष्ट केलेल्या उद्दिष्टे आणि तत्त्वांसह त्याचा अपरिहार्य आधारस्तंभ म्हणून परस्परसंबंध आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील संयुक्त राष्ट्रांची मध्यवर्ती भूमिका याबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे संपूर्णपणे पालन करण्याची आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो, ज्यामध्ये सार्वभौम राज्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी, लोकशाही, मानवी हक्क आणि सर्वांसाठी मूलभूत स्वातंत्र्यांचा प्रचार आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी तसेच एकता, परस्पर आदर, न्याय आणि समानतेवर आधारित सहकार्य सुनिश्चित करतील.

आम्ही जागतिक निर्णय प्रक्रियेतील आणि संरचनांमधील उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देश (ईएमडीसी), तसेच कमी विकसित देश (एलडीसी), विशेषतः आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील, यांचा अधिकाधिक अर्थपूर्ण सहभाग आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना समकालीन वास्तवांशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. 

संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयात आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सुयोग्य वेळी समान भौगोलिक प्रतिनिधित्व मिळावे तसेच या संघटनांमध्ये नेतृत्व आणि जबाबदाऱ्यांच्या सर्व स्तरांवर महिलांची भूमिका आणि हिस्सा वाढवावा, विशेषत: विकसनशील देशांतील, असे आवाहन आम्ही करीत आहोत. पारदर्शकता आणि समावेशकतेच्या तत्त्वांनुसार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील कलम 101 च्या सर्व तरतुदींनुसार संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी प्रमुखांची आणि वरिष्ठ पदांची निवड आणि नियुक्ती प्रक्रिया- शक्य तितक्या विस्तृत भौगोलिक आधारावर कर्मचारी भरती होणे आणि महिलांचा सहभाग वाढवणे याकडे योग्य लक्ष देत आणि कोणत्याही राज्याच्या किंवा राज्यांच्या गटाच्या नागरिकांची संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीतील वरिष्ठ पदांवर मक्तेदारी नसावी या सामान्य नियमाचे पालन होण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो.

2023 च्या जोहान्सबर्ग-II नेत्यांच्या जाहीरनाम्याला मान्यता देऊन, आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह सर्वसमावेशक सुधारणांना आमचा पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो, ज्याचा उद्देश संयुक्त राष्ट्रांना अधिक लोकशाहीवादी, प्रातिनिधिक, प्रभावी आणि कार्यक्षम बनवणे तसेच परिषदेच्या सदस्यांमध्ये विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व वाढवणे असा आहे जेणेकरून ती विद्यमान जागतिक आव्हानांना पुरेसा प्रतिसाद देऊ शकतील आणि आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील उदयोन्मुख आणि विकसनशील देशांच्या, ज्यामध्ये ब्रिक्स देशांचा समावेश आहे, आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये, विशेषतः संयुक्त राष्ट्रांमध्ये, त्यांच्या सुरक्षा परिषदेमध्ये, मोठी भूमिका बजावण्याच्या कायदेशीर आकांक्षांना पाठिंबा देऊ शकतील. 

एझुलविनी सहमती आणि सिर्ते जाहीरनाम्यात प्रतिबिंबित झालेल्या आफ्रिकन देशांच्या वैध आकांक्षा आम्ही ओळखतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेमागील उद्दिष्ट हे ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्याचे आहे, यावर आम्ही भर देतो. 2022 च्या बीजिंग आणि 2023 च्या जोहान्सबर्ग-II नेत्यांच्या जाहीरनाम्यांची आठवण करून देत चीन आणि रशिया हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य, संयुक्त राष्ट्रांमध्ये, त्यांच्या सुरक्षा परिषदेसह, मोठी भूमिका बजावण्याच्या ब्राझील आणि भारताच्या आकांक्षांना असणाऱ्या त्यांच्या पाठिंब्याची पुष्टी करत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त, आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील ठराव 75/1, 77/335 आणि इतर संबंधित ठरावांचे स्मरण करतो आणि संयुक्त राष्ट्रांना त्यांचे कार्यभार पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक समर्थन प्रदान करण्याची आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. ठोस प्रगती साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख अंगांमध्ये सुधारणा करण्याच्या खंबीर आवाहनावर आम्ही भर देतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवरील चर्चेत नवीन जीवन निर्माण करण्यासाठी तसेच महासभा पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि आर्थिक आणि सामाजिक परिषदेला बळकटी देण्यासाठी काम सुरू ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध आहोत. 2025 च्या शांतता निर्माण व्यवस्थेच्या पुनरावलोकनाच्या यशस्वी समारोपाची आम्ही उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत.

बहुध्रुवीय जगाच्या समकालीन वास्तवाच्या संदर्भात, विकसनशील देशांनी अधिक न्याय्य आणि समतापूर्ण जागतिक प्रशासन आणि राष्ट्रांमधील परस्पर फायदेशीर संबंधांसाठी संवाद आणि सल्लामसलत वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न बळकट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर आम्ही सहमत आहोत. आम्ही हे मान्य करतो की बहुध्रुवीयतेमुळे विकसनशील देशांना त्यांची रचनात्मक क्षमता विकसित करण्यासाठी आणि सार्वत्रिकरित्या फायदेशीर, समावेशक आणि समतापूर्ण आर्थिक जागतिकीकरण आणि सहकार्याचा आनंद घेण्यासाठी वाढीव संधींचा लाभ होऊ शकतो. 

सकारात्मक बदलाचे चालक म्हणून असणारे ग्लोबल साऊथचे महत्त्व, विशेषतः वाढते भू-राजकीय तणाव, वेगवान आर्थिक मंदी आणि तांत्रिक बदल, संरक्षणवादी उपाय आणि स्थलांतर आव्हाने यासारख्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देताना, आम्ही अधोरेखित करतो. ब्रिक्स देश ग्लोबल साऊथच्या चिंता आणि प्राधान्यक्रम व्यक्त करण्यात तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित अधिक न्याय्य, शाश्वत, समावेशक, प्रतिनिधी आणि स्थिर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असा आमचा विश्वास आहे.

ज्या युद्धाने मानवजातीला, विशेषतः युरोप, आशिया, आफ्रिका, प्रशांत आणि जगाच्या इतर भागांमध्ये, अगणित दुःख दिले त्या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीचे 2025 हे ऐंशीवे वर्ष आहे हे लक्षात घेऊन आम्ही दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीसाठी परिस्थिती निर्माण करणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या ऐंशीव्या वर्धापनदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या महासभा ठराव 79/272 ला आमचा पूर्ण पाठिंबा देत आहोत, जो पुढील पिढ्यांना युद्धाच्या संकटापासून वाचवण्यासाठी आखण्यात आला आहे.

80 व्या वर्धापन दिनानिमित्त, ब्रेटन वुड्स संस्था (बीडब्ल्यूआय) अधिक चपळ, प्रभावी, विश्वासार्ह, समावेशक, उद्देशासाठी योग्य, निःपक्षपाती, जबाबदार आणि प्रातिनिधिक बनविण्यासाठी, त्यांची वैधता वाढविण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज आम्ही पुन्हा व्यक्त करतो. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या स्थापनेपासून जागतिक अर्थव्यवस्थेतील परिवर्तन प्रतिबिंबित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रशासन संरचनेत सर्वप्रथम सुधारणा केल्या पाहिजेत. 

ब्रेटन वुड्स संस्थांमधील विकसनशील देशांचा आवाज आणि प्रतिनिधित्व यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील त्यांचे वाढते वजन प्रतिबिंबित करायला हवे. याशिवाय, आम्ही सुधारित व्यवस्थापन प्रक्रियांचे आवाहन करतो, ज्यामध्ये गुणवत्तेवर आधारित आणि समावेशक निवड प्रक्रियेचा समावेश आहे ज्यामुळे प्रादेशिक विविधता आणि आयएमएफ आणि डब्ल्यूबीजी च्या नेतृत्वातील विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व वाढेल, तसेच व्यवस्थापकीय स्तरावर महिलांची भूमिका आणि वाटा उंचावेल.

सध्याच्या अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या संदर्भात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय एम एफ) ने जागतिक वित्तीय सुरक्षा जाळ्याच्या (जीएफ एस एन) केंद्रस्थानी राहून पुरेसे संसाधनात्मक आणि चपळ राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिच्या सदस्यांना, विशेषतः सर्वात असुरक्षित देशांना प्रभावीपणे मदत करता येईल. कोटा पुनर्संरचना नसतानाही, आम्ही 16 व्या कोटा सामान्य पुनरावलोकन (जीआरक्यू) अंतर्गत प्रस्तावित कोटावाढीला संमती दिली आहे आणि नाणेनिधीच्या ज्या सदस्यांनी अद्याप असे केले नाही त्यांना त्यांची संमती देण्याचा तसेच 16 व्या जीआरक्यूअंतर्गत कोटावाढीला अधिक विलंब न करता प्रभावी करण्याचा आग्रह करीत आहोत.

17 व्या जीआरक्यूअंतर्गत नवीन कोटा सूत्रासह, कोटा समभाग पुनर्संरचना करण्याबाबतचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने ठरवून दिलेल्या आदेशाची पूर्तता लवकरात लवकर करावी असा नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाला आम्ही आग्रह करतो. भविष्यातील चर्चेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि महत्त्वाच्या कोटा आणि प्रशासन सुधारणांभोवती विचारांची एकरूपता वाढविण्यास मदत करण्यासाठी सामान्य तत्त्वे विकसित करण्याच्या नाणेनिधी कार्यकारी मंडळ आणि आंतरराष्ट्रीय मौद्रिक वित्त समिती (आय एम एफ सी) प्रतिनिधींच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो. आम्ही पुन्हा सांगतो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये पुढील कोटा पुनर्संरचना विकसनशील देशांच्या खर्चाने होऊ नये, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील देशांचे सापेक्ष स्थान प्रतिबिंबित होईल आणि विकसनशील देशांचे समभाग वाढतील. 

आयएमएफ कोटा आणि प्रशासन सुधारणांसाठी ब्रिक्स रिओ दि जानेरोच्या दृष्टिकोनानुसार, आम्ही 17 व्या जीआरक्यूमध्ये अर्थपूर्ण कोटा समभाग पुनर्संरचना आणि प्रशासन सुधारणांचा समावेश करण्याची हमी देण्याच्या दृष्टीने इतर आयएमएफ सदस्यांशी रचनात्मकपणे संवाद साधण्यास तयार आहोत.

आम्ही पुन्हा एकदा पुष्टी करतो की ब्राझीलच्या सह-अध्यक्षतेखाली 2025 चा जागतिक बँकेचा भागधारणा आढावा हा बहुपक्षीयता बळकट करण्यासाठीचे आणि जागतिक बँक समूहाची वैधता वाढविण्यासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे, जी एक चांगली, मोठी आणि अधिक प्रभावी विकास वित्त संस्था आहे. लिमा तत्त्वांनुसार, आम्ही विकसनशील देशांचा आवाज आणि प्रतिनिधित्व बुलंद करण्यासाठी वकिली करत आहोत, ज्याला ऐतिहासिक अपूर्ण प्रतिनिधित्वाला दुरुस्त करणाऱ्या भागधारणा पुनर्संरचनेद्वारे आधार दिला जातो.‌

हवामान बदल आणि डिजिटलायझेशनच्या आव्हानात्मक संदर्भात, रोजगार निर्मितीसह गरिबी आणि असमानतेचा सामना करणे हा जागतिक बँक समूहाच्या ध्येयाचा केंद्रबिंदू राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

बहुपक्षीय व्यापार व्यवस्था बऱ्याच काळापासून एका वळणावर आहे. व्यापार-प्रतिबंधक कृतींचा प्रसार, मग ते शुल्कात अविवेकी वाढ आणि[1] बिगर शुल्क उपाय असोत किंवा पर्यावरणीय उद्दिष्टांच्या नावाखाली संरक्षणवाद असो, जागतिक व्यापार आणखी कमी करण्याचा, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार क्रियाकलापांमध्ये अनिश्चितता आणण्याचा धोका निर्माण करतो, ज्यामुळे विद्यमान आर्थिक असमानता आणखी वाढण्याची आणि जागतिक आर्थिक विकासाच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता असते. 

व्यापाराला विकृत करणारे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी विसंगत असलेल्या एकतर्फी शुल्क आणि बिगर शुल्क उपायांच्या वाढीबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो. या संदर्भात, आम्ही नियमांवर आधारित [1], खुले, पारदर्शक, निष्पक्ष, समावेशक, समतापूर्ण, भेदभावरहित, सहमती-आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर करतो, ज्यामध्ये जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) त्याच्या केंद्रस्थानी आहे आणि तिच्या विकसनशील सदस्यांसाठी विशेष आणि भिन्न वागणूक (एस ॲन्ड डीटी) आहे. 

आम्ही यावर भर देतो की, डब्ल्यूटीओ, तिच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त आवश्यक आदेश, कौशल्य, सार्वत्रिक पोहोच आणि नवीन व्यापार नियमांच्या वाटाघाटीसह आंतरराष्ट्रीय व्यापार चर्चेच्या बहुआयामी पैलूंवर नेतृत्व करण्याची क्षमता असलेली एकमेव बहुपक्षीय संस्था आहे. आम्ही 12 व्या डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय परिषदेत दिलेल्या वचनबद्धतेचे स्मरण करतो आणि 13 व्या डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय परिषदेत संघटनेची प्रासंगिकता सुनिश्चित करण्याच्या तसेच बहुपक्षीय व्यापार प्रणालीची विश्वासार्हता पुनर्संचयित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्यासाठी काम करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करतो. 

आम्ही सुलभ, प्रभावी, पूर्णपणे कार्यरत, द्विस्तरीय बंधनकारक डब्ल्यूटीओ वाद निवारण प्रणाली तातडीने पुनर्संचयित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. डब्ल्यूटीओमधील प्रवेशासाठी इथिओपिया आणि इराणच्या प्रयत्नांना आम्ही प्रबळ पाठिंबा देतो. व्यापार मंत्र्यांनी स्वीकारलेल्या डब्ल्यूटीओ सुधारणा आणि बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या बळकटीकरणावरील ब्रिक्स जाहीरनाम्याचे आम्ही स्वागत करतो.

आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध असलेल्या एकतर्फी जबरदस्तीच्या उपाययोजना लादण्याचा आम्ही निषेध करतो आणि पुनरुच्चार करतो की अशा उपाययोजना, इतर गोष्टींबरोबरच, एकतर्फी आर्थिक निर्बंध आणि दुय्यम निर्बंधांच्या स्वरूपात, लक्ष्यित राज्यांच्या सामान्य लोकसंख्येच्या विकास, आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या अधिकारांसह मानवी हक्कांवर दूरगामी नकारात्मक परिणाम करतात, गरीब आणि असुरक्षित परिस्थितीतील लोकांवर विषम परिणाम करतात, डिजिटल दरी रुंदावतात आणि पर्यावरणीय आव्हाने वाढवतात. 

आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील तत्त्वांना आणि उद्देशांना कमकुवत करणाऱ्या अशा बेकायदेशीर उपाययोजना रद्द करण्याचे आम्ही आवाहन करतो. आम्ही पुन्हा एकदा पुष्टी करतो की ब्रिक्स सदस्य देश आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध

असलेले तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशिवाय मंजूर झालेले निर्बंध लादत नाहीत किंवा त्यांचे समर्थन करत नाहीत. 

Part 2------------------------------------------------------------ Patil/JPS------

"आफ्रिकन समस्यांसाठी आफ्रिकन उपाय" हे तत्व आफ्रिकन खंडातील संघर्ष निराकरणासाठी आधार म्हणून काम करत राहिले पाहिजे, याचा आम्ही पुनरुच्चार करतो. संघर्षाला प्रतिबंध, व्यवस्थापन आणि निराकरणात आफ्रिकन संघाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आम्ही दखल घेतो, आणि आफ्रिकन संघ आणि आफ्रिकन उप-प्रादेशिक संघटनांनी हाती घेतलेल्या प्रयत्नांसह खंडातील आफ्रिकन शांतता प्रयत्नांना आमचा पाठिंबा राहील याची पुन्हा एकदा खातरजमा करतो. याद्वारे आफ्रिकन खंडातील आफ्रिकन संघाचे शांतता-समर्थनार्थ उपक्रम, मध्यस्थी प्रयत्न, शांतता प्रक्रिया आणि व्यापक शांतता निर्माण करण्यासाठीच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

आफ्रिकेतील काही प्रदेशांमध्ये नवीन आणि प्रदीर्घ सशस्त्र संघर्षांमुळे उद्भवलेल्या गंभीर मानवतावादी संकटांबद्दल, विशेषतः सुदान, ग्रेट लेक्स क्षेत्र आणि हॉर्न ऑफ आफ्रिकेतील संघर्षांच्या विनाशकारी परिणामांबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो, आणि त्याचबरोबर आफ्रिकन देश आणि संघटनांनी शाश्वत शांतता आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि कामगिरीचे आम्ही कौतुक करतो. या संकटांवर राजकीय उपाय शोधण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा असल्याचा आम्ही पुनरूच्चार करतो, शत्रुत्व संपवण्याचे पुन्हा एकदा आवाहन करतो, आणि संघर्षांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या गरजेवर आम्ही भर देतो.

सुदानमधील परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाबद्दल तसेच अतिरेकी आणि दहशतवादाच्या वाढत्या धोक्याबद्दल आम्हाला खूप काळजी वाटते. या संदर्भात आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा मांडतो, आणि तात्काळ, कायमस्वरूपी आणि बिनशर्त युद्धबंदी, आणि संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्याचे आवाहन आम्ही करतो. सुदानच्या जनतेसाठी मानवतावादी मदत शाश्वत, तातडीने आणि विनाअडथळा मिळावी यावर, तसेच सुदान आणि शेजारी देशांना मानवतावादी मदत वाढवण्यावरही आम्ही भर देतो.

हैतीमधील सुरक्षा, मानवतावादी परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती सतत बिघडत असल्याबद्दल आम्हाला अजूनही गंभीर चिंता वाटते. सुरक्षा आणि विकास हातात हात घालून चालतात, याचा आम्ही पुनरूच्चार करतो. सध्याच्या संकटांवर मात करण्यासाठी हैतीयन नेतृत्वाखालील उपाय आवश्यक आहे, ज्यामध्ये स्थानिक राजकीय शक्ती, संस्था आणि समाज यांच्यात राष्ट्रीय संवाद आणि एकमत निर्माण होणे गरजेचे आहे. हैतीमधील टोळ्यांचा नाश करण्यासाठी, सुरक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी आणि देशातील दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाया रचण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने हैतीयन प्रयत्नांना पाठिंबा द्यावा असे आवाहन आम्ही करतो. संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो आणि हैतीच्या बहुविध संकटांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्याचे अधोरेखित करतो.

दहशतवादी कृत्य हे गुन्हेगारी आणि अन्याय्यच असते, मग त्याचा हेतू कोणताही असो, किंवा ते केव्हाही, कुठेही आणि कोणीही केलेले असो, कोणत्याही दहशतवादी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांच्या सीमेपलिकडील हालचाली, दहशतवादाला वित्तपुरवठा आणि सुरक्षित आश्रयस्थाने, अशा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि दहशतवादाच्या प्रकटीकरणाचा सामना करण्यासाठी आम्ही आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. दहशतवाद कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, संस्कृती किंवा वांशिक गटाशी जोडला जाऊ नये, आणि दहशतवादी कारवायांमध्ये आणि त्यांच्या समर्थनामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना जबाबदार धरले पाहिजे, आणि संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना न्याय दिला पाहिजे, याचा आम्ही पुनरुच्चार करतो. दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता सुनिश्चित करण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करताना दुहेरी मापदंड नाकारण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. दहशतवादाचा सामना करणे ही राज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे, यावर आम्ही भर देतो. दहशतवादाचे धोके रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत, विशेषतः संयुक्त राष्ट्रांची सनद विचारात घेत, आपली उद्दिष्टे आणि तत्त्वे, आणि संबंधित आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि प्रोटोकॉल, विशेषतः आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा लक्षात घेत आपल्या जबाबदाऱ्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन आम्ही करतो. ब्रिक्स दहशतवादविरोधी कार्यगट (CTWG) आणि ब्रिक्स दहशतवादविरोधी धोरणे, ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना आणि ब्रिक्स दहशतवादविरोधी कार्यगटाच्या CTWG प्रकाशनावर आधारित त्याच्या पाच उपसमूहांच्या उपक्रमांचे आम्ही स्वागत करतो. दहशतवादविरोधी सहकार्य आणखी दृढ करण्यास आम्ही उत्सुक आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक कराराला जलद अंतिम स्वरूप देण्याचे आणि स्वीकारण्याचे आवाहन आम्ही करतो. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या सर्व दहशतवादी आणि दहशतवादी घटकांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचे आवाहन आम्ही करतो.  

31 मे तसेच 1 आणि 5 जून 2025 रोजी रशियन फेडरेशनच्या ब्रायन्स्क, कुर्स्क आणि व्होरोनेझ प्रदेशात जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य करून पूल आणि रेल्वे पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, या हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

आम्ही मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद, अतिरेकीवाद आणि त्याच्या प्रसाराला केला जाणारा वित्तपुरवठा, अंमली पदार्थांचा ड्रग्ज तस्करी, सायबर गुन्हे, पर्यावरणावर परिणाम करणारे गुन्हे, बंदुकांची अवैध तस्करी, मानवी तस्करी, भ्रष्टाचार आणि क्रिप्टोकरन्सीसह नवीन तंत्रज्ञानाचा अवैध वापर अशा बेकायदेशीर आर्थिक प्रवाहांना प्रतिबंधित करण्यासाठी, आणि त्यांचा सामना करण्यासाठी आमची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करतो. या संदर्भात, संबंधित आंतरराष्ट्रीय दायित्वांच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे, विशेषतः विकसनशील देशांसाठी क्षमता-निर्मिती आणि तांत्रिक सहाय्य वाढविण्याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला प्रतिबंध आणि आर्थिक तपासाच्या उद्देशासह, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरोधी सहकार्याच्या तांत्रिक आणि बिगर-राजकीय स्वरूपाच्या तत्त्वांप्रती आमची वचनबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो. संबंधित विद्यमान ब्रिक्स कार्यगट, ब्रिक्स देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठका आणि ब्रिक्समध्ये स्वीकारलेल्या कागदपत्रांवर आधारित इतर सर्व प्रकारच्या सहकार्याला, तसेच ब्रिक्स देश ज्यांचे पक्ष आहेत अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधित कायदेशीर साधनांद्वारे अशा सहकार्याला आणखी बळकटी देण्याची गरज आम्ही लक्षात घेतो. युवा पिढीच्या सुरक्षित विकासासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण करण्याच्या, आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाचा धोका कमी करण्याच्या महत्त्वावर आम्ही भर देतो आणि युवा वर्गाच्या सहभागासह संबंधित आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या विकासाचे आम्ही स्वागत करतो.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी ब्रिक्स सहकार्याला प्रोत्साहन देण्याबाबत, विशेषतः संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचारविरोधी अधिवेशनाच्या अनुषंगाने, आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी अजेंडावरील प्रमुख मुद्द्यांवर आमचे समन्वय मजबूत करण्याबाबत आम्ही ठाम आहोत. ब्रिक्सची भ्रष्टाचारविरोधी वचनबद्धता पूर्ण करण्यास आणि भ्रष्टाचारविरोधी सहकार्य वाढविण्यास आणि भ्रष्टाचारातून मिळालेल्या मालमत्तेची वसुली आणि परतफेड करण्यास आम्ही महत्त्व देतो. भ्रष्टाचारविरोधी बाबींवर सहकार्य वाढविण्यासाठी ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या कार्याचे आम्ही स्वागत करतो. विशेषतः व्यावसायिकांशी भ्रष्टाचारविरोधी ज्ञान आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी, ब्रिक्स कॉमन व्हिजन तयार करणे, भ्रष्टाचारविरोधी सहकार्य तसेच भ्रष्टाचाराच्या मालमत्तेची वसुली आणि परतफेड यावर संयुक्त कृती, भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षित आश्रयस्थान नाकारण्यास प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांमध्ये क्षमता [1] बांधणी मजबूत करण्याचेही आम्ही स्वागत करतो.

आण्विक धोका आणि संघर्षाच्या वाढत्या जोखमींबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो. जागतिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता साध्य करण्यासाठी निःशस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण आणि अप्रसार [1] प्रणालीला बळकटी देण्याची, तसेच तिची अखंडता आणि प्रभावीपणा जपण्याची गरज आम्ही पुन्हा व्यक्त करतो. अण्वस्त्र अप्रसार [1] व्यवस्था मजबूत करण्यासाठी अण्वस्त्रमुक्त क्षेत्रांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर आम्ही भर देतो. सर्व विद्यमान अण्वस्त्रमुक्त क्षेत्रांना आणि अण्वस्त्रांच्या वापराच्या किंवा वापराच्या धोक्यासंदर्भातील संबंधित आश्वासनांना आम्ही पुन्हा एकदा पाठिंबा आणि आदर व्यक्त करतो. मध्य पूर्वेमध्ये अण्वस्त्रे आणि इतर मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रांपासून मुक्त क्षेत्र स्थापन करण्याच्या ठरावांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांचे सर्वोच्च महत्त्व आम्ही मान्य करतो, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निर्णय 73/546 नुसार आयोजित केलेल्या परिषदेचा समावेश आहे. सर्व आमंत्रित पक्षांना या परिषदेत सद्भावनेने सहभागी होण्याचे आणि या प्रयत्नात रचनात्मकपणे सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करतो. आम्ही "अण्वस्त्रमुक्त क्षेत्रांच्या प्रश्नाचा त्याच्या सर्व पैलूंमध्ये व्यापक अभ्यास" हा UNGA ठराव 79/241  स्वीकारण्याचे  स्वागत करतो.

शांततापूर्ण हेतूंसाठी अंतराळ प्रणालींचा वापर तसेच अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाची चांगली कामगिरी साध्य करण्याची आवश्यकता आम्ही जाणतो. बाह्य अवकाशातील कृतींची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी, बाह्य अवकाशातील शस्त्रास्त्र स्पर्धा (PAROS) आणि बाह्य अवकाशाचे शस्त्रीकरण रोखण्यासाठी, तसेच बाह्य अवकाशातील घटकांविरोधात धमक्या किंवा बळाचा वापर रोखण्यासाठी, जागतिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित कायदेशीर बहुपक्षीय साधन स्वीकारण्यासाठी वाटाघाटींच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आमचा पाठिंबा व्यक्त करतो. 2014 साली निःशस्त्रीकरण परिषदेत बाह्य अवकाशात शस्त्रे ठेवण्याच्या प्रतिबंधावरील, बाह्य अवकाशातील घटकांविरोधात बळाचा धोका किंवा वापर (PPWT) यावरील अद्यतनित मसुदा करार सादर करणे, म्हणजे या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे आम्ही मानतो. पारदर्शकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारे उपाय (TCBMs), तसेच सार्वत्रिकरित्या मान्य केलेले निकष, नियम आणि तत्त्वे अशा व्यावहारिक आणि बंधनकारक नसलेल्या वचनबद्धता देखील PAROS मध्ये योगदान देऊ शकतात, यावर आम्ही भर देतो. सर्वसाधारण सभेत काही ब्रिक्स सदस्यांनी घेतलेल्या पुढाकाराची आम्ही दखल घेतो, ज्याद्वारे त्यांनी एकच ओपन-एंडेड वर्किंग ग्रुप तयार केला आहे ज्यामुळे सुसंगत, समावेशक आणि प्रभावी चर्चा शक्य होतील आणि PAROS वरील कायदेशीर बंधनकारक साधनावरील महत्त्वाच्या घटकांसह, विद्यमान कामगिरीच्या आधारे, प्रक्रियेत रचनात्मकपणे सहभागी होण्याची जबाबदारी घेतली जाईल.

देशांतील आणि देशांमधील वाढती डिजिटल तफावत कमी करण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या (आयसीटीच्या) क्षमतेवर भर देताना, आम्ही डिजिटल क्षेत्र आणि त्यातून उद्भवणारी आव्हाने आणि धोके मान्य करतो. आम्ही खुल्या, सुरक्षित, स्थिर, सुलभ, शांत आणि परस्पर वापरण्यायोग्य आयसीटी वातावरणाच्या प्रचारासाठी आमच्या वचनबद्धतेची ग्वाही देतो. आयसीटी वापराच्या सुरक्षिततेबद्दल सर्वमान्य समज निर्माण करण्यासाठी रचनात्मक संवादाला चालना देण्यासाठी, या क्षेत्रात सार्वत्रिक कायदेशीर चौकट विकसित करण्यावर चर्चा करण्यासाठी आणि आयसीटीच्या वापरात राज्यांच्या जबाबदार वर्तनासाठी सार्वत्रिकपणे मान्य केलेले मानदंड, नियम आणि तत्त्वांचा पुढील विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी रचनात्मक संवादाला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आघाडीच्या भूमिकेवर आम्ही भर देतो. आम्ही आयसीटी उत्पादने आणि प्रणालींच्या विकास आणि सुरक्षिततेसाठी तसेच पुरवठा साखळी सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर परस्पर वापरण्यायोग्य सामान्य नियम आणि मानकांच्या विकास आणि अंमलबजावणीसाठी व्यापक, संतुलित आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचे आवाहन करतो. या विषयावरील एकमेव जागतिक आणि समावेशक यंत्रणा म्हणून 2021-25 च्या आयसीटीच्या सुरक्षितता आणि वापरावरील संयुक्त राष्ट्रांच्या ओपन-एंडेड वर्किंग ग्रुपच्या चालू कामाचे आम्ही कौतुक करतो, आणि या जुलै महिन्यात त्या कार्यगटाच्या कामाला यशस्वीरित्या अंतिम रूप देण्याच्या आमच्या सामान्य उद्देशावर आम्ही भर देतो. भविष्यातील अशा यंत्रणेची स्थापना तसेच यंत्रणेच्या निर्णय प्रक्रियेबाबत एकमताच्या तत्त्वाचे महत्त्व जाणत, संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयाखाली या मुद्द्यावर एकल-मार्ग असणारी, राज्य-नेतृत्वाखालील, कायमस्वरूपी यंत्रणा स्थापन करण्यासाठी आम्ही आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो, ही यंत्रणा UNGA च्या पहिल्या समितीला अहवाल देईल. धोरणात्मक देवाणघेवाण, संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकांचे (CERTs) परस्पर सहकार्य, कायदा अंमलबजावणी सहकार्य आणि संयुक्त संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रात आयसीटीच्या वापरातील सुरक्षिततेवरील ब्रिक्स कार्यगटाच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीची आम्ही दखल घेतो. या संदर्भात, कायदा अंमलबजावणी सहकार्य आणि सीईआरटींमधील बहुपक्षीय सहकार्याबाबत ब्रिक्स सामंजस्य कराराच्या वाटाघाटीचे आम्ही स्वागत करतो. आयसीटीच्या वापरामध्ये सुरक्षेची खातरजमा करण्याच्या व्यावहारिक सहकार्याचा आराखडा आणि त्याच्या प्रगती अहवालाच्या अनुषंगाने, शैक्षणिक सहकार्य मजबूत करणे आणि देवाणघेवाण कार्यक्रमांच्या संधींबद्दल माहिती सामायिक करणे याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो.

संयुक्त राष्ट्रांच्या सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या अधिवेशनाच्या महासभेने स्वीकारलेल्या मंजुरीचे आम्ही कौतुक करतो. ही एक ऐतिहासिक बहुपक्षीय कामगिरी आहे जी सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी, तसेच आयसीटी प्रणालींच्या वापराद्वारे होणाऱ्या कोणत्याही गंभीर गुन्ह्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वेळेवर आणि कायदेशीर संकलन तसेच देवाणघेवाण सुनिश्चित करण्यासाठी  आवश्यक आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक प्रभावी साधन आणि आवश्यक कायदेशीर चौकट बनेल. ब्रिक्स देशांनी हे प्रस्तावित केल्यापासून स्वीकारण्यात दिलेल्या महत्त्वाच्या योगदानावर आम्ही प्रकाश टाकतो. सर्व राज्यांनी 2025 मध्ये हनोई येथे लवकरात लवकर त्यावर स्वाक्षरी करावी, आणि देशांतर्गत कायदे, प्रक्रिया आणि कार्यपद्धतींनुसार शक्य तितक्या लवकर ते मंजूर करावे, असे आवाहन आम्ही करतो, जेणेकरून त्यावर जलद अंमलबजावणीची खात्री होईल. महासभेच्या ठराव 74/247 आणि 75/282 नुसार, तात्पुरत्या समितीमध्ये त्यांचा सहभाग सुरू ठेवता येईल, जेणेकरून अधिवेशनाला पूरक असलेल्या मसुदा प्रोटोकॉलवर वाटाघाटी करता येतील आणि इतर बाबींबरोबरच, सारासार विचार करून अतिरिक्त गुन्हेगारी गुन्हेही विचारात घेता येतील. 

आंतरराष्ट्रीय आर्थिक, व्यापार-संबंधी आणि वित्तीय सहकार्य अधिक दृढ करणे

"ब्रिक्स आर्थिक भागीदारी 2025 साठीचे धोरण" च्या निकालांचे आम्ही स्वागत करतो. या धोरणामध्ये ब्रिक्स सहकार्य आणि सदस्यांच्या क्षेत्रीय विकास, धोरणे, कार्यक्रम आणि आराखड्यासंबंधी सहकार्यासाठी मार्गदर्शन आणि चौकट निश्चित करण्यात आली आहे. ब्रिक्स आर्थिक भागीदारी 2030 साठीचे धोरण पूर्ण होण्याची आणि त्यानुसार अंमलबजावणी होण्याची आम्हाला उत्सुकता आहे. बहुपक्षीय व्यापार प्रणाली, डिजिटल अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक सहकार्य तसेच व्यापार आणि शाश्वत विकासाशी संबंधित मुद्द्यांवर ब्रिक्सच्या सहकार्यासाठी आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे एकत्रित करणे, हा या धोरणाचा उद्देश असेल.

ब्रिक्स व्यापार आणि शाश्वत विकास चौकटीचा स्वीकार केल्याबद्दल प्रशंसा करताना, समावेशक वाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी व्यापारात सहकार्य मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरूच्चार करतो. व्यापार आणि शाश्वत विकासाची धोरणे परस्परांना आधार देणारी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी सुसंगत असतील, याची खातरजमा करण्याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो.

पीपीपी अर्थात खाजगी व सरकारी भागीदारीतील प्रकल्प व पायाभूत सुविधा यांच्याबाबतीत विनिमय दर जोखमीमध्ये घट करण्यासाठी तसेच हवामान लवचिकता (1) आणण्यासाठी यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने ब्रिक्स कृतिदलाच्या सुरु असलेल्या चर्चांचे आम्ही स्वागत करत आहोत.यातून प्रकल्प तयारीमध्ये सुधारणा व खाजगी गुंतवणूक वाढ होऊ शकेल. याशिवाय , पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने  व माहिती सामायिक करण्यास सहाय्यभूत अशी माहिती केंद्रे स्थापन करण्यासाठी सुरु असलेल्या चर्चेचेही आम्ही स्वागत करतो. कृती दलाने या उपक्रमात पुढे प्रगती करण्यास आमचा पाठिंबा आहे. 

नवीन विकास बँक NDB  लवकरच उच्च [1] गुणवत्ता विकासाच्या दुसर्‍या सुवर्णमय दशकात प्रवेश करणार आहे , ग्लोबल साऊथ देशांमधील विकास आणि आधुनिकीकरणाचा एक मजबूत आणि धोरणात्मक वाहक म्हणून तिच्या वाढत्या योगदानाची आम्हाला जाणीव असून आम्ही त्यास समर्थन देतो. संसाधने एकत्रित करणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, स्थानिक चलनातील  वित्तपुरवठा वाढविणे, निधी स्त्रोतांमध्ये विविधता आणणे,  शाश्वत विकासाला  चालना देणाऱ्या व असमानता कमी करणाऱ्या प्रभावी प्रकल्पांना पाठबळ देणे तसेच  पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि आर्थिक समावेशनाला  प्रोत्साहित करण्याची  क्षमता असणाऱ्या या बँकेच्या विस्ताराचे आम्ही स्वागत करतो. आम्ही बँकेच्या वाढत्या सदस्यत्वासह चालू असलेल्या विस्तारास आणि त्याच्या कारभाराच्या चौकटीच्या बळकटीकरणाची आम्ही नोंद घेतो, या मुळे बँकेची संस्थात्मक लवचिकता आणि कामकाजातील प्रभाव वाढत असून ,  उद्दीष्टपूर्तीसाठी बँकेचे  कार्य निष्पक्ष आणि भेदभाव नसलेल्या पद्धतीने सुरू आहे याचे आम्ही समर्थन करतो आहोत.  एनडीबीची  सर्वसाधारण रणनीती आणि संबंधित धोरणांच्या अनुषंगाने एनडीबीच्या सदस्यतेच्या  पुढील विस्तारासाठी  आणि इच्छुक ब्रिक्स देशांच्या आवेदनांचा लवकरात लवकर विचार व्हावा यासाठी आम्ही जोरदार समर्थन करतो आहोत . राष्ट्रपती दिलमा रौसेफ यांच्या पुन्हा नेमणुकीसाठी सर्व सदस्यांकडून जोरदार पाठबळ मिळाले आहे व त्यांच्या नेतृत्वाचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो . विकास आणि स्थिरतेसाठी कार्यरत जागतिक संस्था म्हणून उदयाला येणाऱ्या बँकेच्या जोरदार  प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. ग्लोबल साऊथ मधील  सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासास प्रोत्साहित करणार्‍या वित्तीय यंत्रणेला बळकटी देण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब या प्रगतीत दिसून येते . 

विषयतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि अग्रगण्य संशोधक यांच्यात सहकार्य वाढविण्यासाठी ‘ब्रिक्स थिंक टँक नेटवर्क फॉर फायनान्स’ (बीटीटीएनएफ) देत असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्ही स्वागत करतो तसेच बीटीटीएनएफचा  कृती कार्यक्रम आणि त्यांनी ठरवलेल्या प्राधान्यक्रमांचेही आम्ही  स्वागत करतो.

नवीन गुंतवणूक व्यासपीठ (एनआयपी) च्या संकल्पनेवर 2025 च्या पहिल्या सत्रामध्ये झालेल्या विधायक चर्चेचे आम्ही स्वागत करतो आणि ब्राझीलच्या अध्यक्षपदांतर्गत  झालेल्या प्रगतीची नोंद घेतो. साल 2025 च्या दुसर्‍या सत्रामध्ये वित्त मंत्रालये आणि मध्यवर्ती बँकांचा समावेश असलेले  तंत्रज्ञान -स्तरीय प्रयत्न सुरु राहतील अशी अपेक्षा करतो.  या व्यासपीठावरील चर्चा व समन्वयातून सातत्यपूर्ण व अर्थपूर्ण प्रगती साध्य होईल अशी आम्हाला आशा आहे. 

पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि शाश्वत  विकासासाठी खाजगी गुंतवणुक उभी करण्याच्या आमच्या प्राथमिकतेनुसार  आम्ही ‘ब्रिक्स बहुस्तरीय  हमी’ (बीएमजी) उपक्रम  स्थापित करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. जोखीमरहित धोरणात्मक  गुंतवणूकीसाठी गरजेनुरूप हमी योजना तयार करणे आणि ब्रिक्स व ग्लोबल साऊथमधील पत सुधारणे  हे बीएमजीचे उद्दीष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवांमधून मार्गदर्शन घेत एनडीबीमध्ये अतिरिक्त भांडवल न वापरता बीएमजीला पथदर्शी उपक्रम म्हणून पुरेसा वेळ देण्याचे आम्ही ठरवले.  आम्ही 2025 मध्ये हा पथदर्शी उपक्रम विकसित करण्यास तसेच तो राबवून त्याबद्दलचा अहवाल 2026 मधील ब्रिक्स शिखर परिषदेत सादर करण्यास  उत्सुक आहोत.

स्थानिक चलनांमध्ये वित्तपुरवठा करण्यासाठी स्वीकारार्ह यंत्रणा शोधण्यासह, प्रकल्प आणि कार्यक्रमांसाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पद्धती  सुलभ आणि विस्तारित करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘ब्रिक्स आंतर बँक सहकार्य यंत्रणे’चे  (ICM)  आम्ही स्वागत करतो. ICM आणि NDB यांच्यातील सतत संवादाचे आम्ही स्वागत करतो.

आम्ही आमच्या अर्थमंत्र्यांना आणि योग्य त्या ठिकाणी  केंद्रीय बँक गव्हर्नरना,  ‘ब्रिक्स सीमापार पेमेंट उपक्रमा’बद्दल  चर्चा सुरू ठेवण्याचे काम सोपवतो आणि ब्रिक्स पेमेंट यंत्रणेच्या अधिक व्यापक वापराच्या संभाव्यतेवर चर्चा सुरू ठेवण्यास समर्थन देण्यासाठी शक्य ते मार्ग शोधण्यात ‘ब्रिक्स पेमेंट टास्क फोर्स’ (BPTF)ने केलेल्या प्रगतीची नोंद घेतो. या संदर्भात, आम्ही "तांत्रिक अहवाल: ब्रिक्स सीमापार पेमेंट यंत्रणा " चे स्वागत करतो.  या अहवालात  सदस्यांच्या प्रकट पसंती दर्शवल्या आहेत. ब्रिक्स देशांमध्ये तसेच  इतर राष्ट्रांमध्ये जलद, कमी किमतीचे, अधिक सुलभ, कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित सीमापार पेमेंट उपलब्ध करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो  व्यापार आणि गुंतवणुकीच्या अधिकाधिक  प्रवाहांना प्रोत्साहन देण्यास उपयोगी ठरू शकतो.

आमच्या अर्थमंत्र्यांनी मान्यता दिलेल्या कृती दला द्वारे संबंधित भागधारकांच्या स्वयंसहभागासह, ब्रिक्स देशांमधील नियामक, पुनर्विमा कंपन्या आणि ब्रिक्स बिझनेस कौन्सिलसह ब्रिक्स सदस्यांची (पुनर्) विमा क्षमता वाढवण्यासाठी होणाऱ्या चर्चेचे आम्ही स्वागत करतो. संबंधित भागधारकांमध्ये सेटलमेंट आणि डिपॉझिटरी पायाभूत सुविधांवरील पुढील तांत्रिक संवादामधून अनुरूप प्रारूपांचा शोध घेण्यासाठीदेखील आम्ही चर्चेला प्रोत्साहन देतो आहोत.

‘ब्रिक्स रॅपिड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी चॅनल’ (BRISC) अंतर्गत ब्रिक्स देशांसाठी समान प्राधान्य असलेल्या माहिती सुरक्षा आणि वित्तीय तंत्रज्ञानातील सुरू असलेल्या सहकार्याची आम्ही नोंद घेत आहोत. आर्थिक नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापरासाठी  सहकार्य वाढविण्यात ‘ब्रिक्स फिनटेक इनोव्हेशन हब’ची भूमिका देखील आम्ही मान्य करतो.

‘आकस्मिक राखीव व्यवस्था’ (Contingent Reserve Arrangement - CRA) च्या तांत्रिक पथकाने सुधारित करार आणि नियमांच्या प्रस्तावावर साधलेल्या एकमतासह, CRA बद्दल होणाऱ्या प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. विशेषतः पात्र पेमेंट चलनांचा समावेश आणि सुधारित जोखीम व्यवस्थापनाद्वारे CRA ची लवचिकता आणि परिणामकारकता वाढवण्याच्या प्रयत्नांना आम्ही समर्थन देतो. CRA मध्ये सामील होण्यात स्वारस्य दाखविणाऱ्या नवीन BRICS सदस्यांच्या सहभागाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही त्यांना स्वेच्छेने आणि देश-विशिष्ट परिस्थितीनुसार सामील करुन घेण्यास वचनबद्ध आहोत.

आमच्या संबंधित राष्ट्रीय शाश्वत विकास धोरणांच्या अनुषंगाने, कार्यक्षमता, पारदर्शकता, आधुनिकता, सर्वसमावेशकता, आणि शाश्वतता या तत्वांच्या आधाराने, विकसनशील देशांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन, पुरवठा साखळीतील लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाला अधिक प्रोत्साहन देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) विकास आणि प्रोत्साहनाला पाठिंबा देणे आणि अधिक लवचिक आणि गतिमान जागतिक व्यापार परिसंस्था निर्माण करणे या महत्वाच्या मुद्द्यांचे  आम्ही स्मरण ठेवतो. व्यवसाय कामकाज  सुलभ करण्याच्या उद्देशाने डिजिटल सेवा आणि प्लॅटफॉर्मद्वारे एमएसएमईंना समर्थन देण्याच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याचा आमचा मानस आहे.  ज्ञानाची देवाणघेवाण आणि साऊथ-साऊथ सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून शाश्वत सरकारी खरेदीवर ब्रिक्स चर्चासत्र सुरू करण्याच्या ब्राझिलियन अध्यक्षांच्या पुढाकाराचे आम्ही स्वागत करतो. आर्थिक आणि व्यापार सहकार्य सुलभ करण्यासाठी, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, औद्योगिक धोरणाला समर्थन देण्यासाठी आणि समावेशक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी खरेदीची धोरणात्मक भूमिका आम्ही मान्य करतो. विकासाचे साधन म्हणून खरेदीच्या वापराशी संबंधित राष्ट्रीय अनुभव, धोरणात्मक नवकल्पना आणि आव्हाने सामायिक करण्यात ब्रिक्स आणि भागीदार देशांच्या सहभागाची आम्ही प्रशंसा करतो. पुढील अध्यक्षांच्या कार्यकाळात या नियमित संवादाच्या सातत्यतेला आम्ही प्रोत्साहन देतो.

किम्बर्ली प्रोसेस (केपी) ला कच्च्या हिऱ्यांच्या व्यापाराचे नियमन करणारी एकमेव जागतिक आंतरसरकारी प्रमाणन योजना या नात्याने आम्ही पाठिंबा देतो आहोत . तसेच वादग्रस्त प्रमाणीकरण असलेल्या हिऱ्यांना बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी आमच्या वचनबद्धतेवर भर देतो.  किम्बर्ली प्रोसेसची 2025 मधील संरक्षक संस्था म्हणून युएईच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो आणि जागतिक हिरे उद्योगाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो. ब्रिक्समध्ये आणि जागतिक बाजारपेठेत हिरे आणि मौल्यवान धातूंच्या व्यापाराला चालना देण्यासाठी आम्ही व्यवहार्य यंत्रणांची तपासणी करत राहू.

वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात हितसंबंध, आव्हाने आणि संधी ओळखण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रातील क्षमता बांधणीसाठी ‘नवीन औद्योगिक क्रांतीमधील भागीदारी’ (PartNIR) हे मार्गदर्शक व्यासपीठ म्हणून काम करते, त्याचबरोबर शाश्वत सहकार्यासाठी संरचित चौकटीद्वारे ‘ब्रिक्स औद्योगिक सहकार्या’च्या सातत्यतेलादेखील  समर्थन देते, हे आम्ही मान्य करतो.  या संदर्भात, ‘इंटेलिजंट उत्पादन आणि रोबोटिक्स कार्यगट’, उद्योग कार्यगटाचे डिजिटल परिवर्तन आणि लघु आणि मध्यम उद्योग कार्यगटासाठी संदर्भ अटींच्या मंजुरीचे आम्ही स्वागत करतो. ब्रिक्स देशांमध्ये एसएमई क्षेत्रात योजनाबद्ध रीतीने  सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या ब्रिक्स एसएमई कार्यगट कृती आराखड्याला (2025-2030) दिलेल्या मंजुरीचे आम्ही स्वागत  करतो. ब्रिक्स देशांमध्ये उद्योग 4.0 कौशल्यांच्या विकासाला संयुक्तपणे पाठिंबा देण्यासाठी आणि नवीन औद्योगिक क्रांतीमध्ये भागीदारी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक विकास संघटने’ (UNIDO) च्या सहकार्याने ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ (BCIC) सुरु  करण्याच्या कृतीचे  आम्ही स्वागत करतो. BCIC च्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सदस्यांना BCIC मध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करतो.  यात पुढील ब्रिक्स भागीदारींसाठी इलेक्ट्रॉनिक मंचावर कंपन्यांची नोंदणी करणे हे समाविष्ट आहे. आम्ही चीन ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र (CCBIC) च्या स्थापनेचे देखील स्वागत करतो. गेल्या 5 वर्षात ब्रिक्स पार्टनरशिप फोरम, ब्रिक्स औद्योगिक नवोन्मेष स्पर्धा, ब्रिक्स नवीन औद्योगिक क्रांतीवरील प्रदर्शन आणि BPIC प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात BRICS PartNIR इनोव्हेशन सेंटर (BPIC) च्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो आणि BPIC प्रशिक्षण कार्यक्रमांच्या शिष्यवृत्तीच्या स्थापनेचे स्वागत करतो. ब्राझिलियन अध्यक्षतेखाली असलेल्या तसेच, चीनकडे  सह-यजमानपद असलेल्या  आणि चीन-BRICS कृत्रिम बुद्धिमत्ता विकास आणि सहकार्य केंद्राने आयोजित केलेला  BRICS कृत्रिम बुद्धिमत्ता उच्च-स्तरीय मंच, 9 व्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान ब्राझिलियामध्ये आयोजित करण्यात आला आहे याची आम्ही नोंद घेत आहोत. भारताच्या नेतृत्वाखाली जानेवारी 2025 मध्ये ब्रिक्स स्टार्टअप फोरम सुरू करणे यासह, ब्रिक्स कृती आराखडा 2021-2024 च्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीची आम्ही प्रशंसा करतो आणि ब्रिक्स देशांच्या स्टार्टअप परिसंस्थांमध्ये सहकार्य आणि सखोल सहभाग वाढविण्यासाठी  ‘ब्रिक्स स्टार्टअप नॉलेज हब’च्या प्रारंभाची आम्ही प्रशंसा करतो.

सक्षम, समावेशक आणि सुरक्षित डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्व तसेच डिजिटल परिवर्तन व सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी ही एक आवश्यक पूर्वअट आहे हे ओळखून, आम्ही ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेवर भर देतो. आम्ही हे मान्य करतो की लवचिक, सुरक्षित, समावेशक व  परस्पर वापरण्यायोग्य डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये, मोठ्या प्रमाणात सेवा प्रदान करण्याची तसेच  सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक संधी वाढविण्याची क्षमता आहे.

डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात ब्रिक्स सदस्यांनी संयुक्त कृतीच्या संधी शोधाव्यात यासाठी आम्ही त्यांना  प्रोत्साहित करतो. त्यामुळे  इंटरनेटच्या देशनिहाय विभागांची अखंडता, कार्यप्रणालीची स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल, तसेच इंटरनेट विखंडन टाळता येईल आणि इंटरनेट वापराच्या सुरक्षेसंबंधी सर्व पैलूंबद्दल असलेल्या  प्रत्येक देशाच्या  कायदेविषयक चौकटींचा आदर करता येईल.

‘डिजिटल परिवर्तन आणि उद्देशपूर्ण कनेक्टिव्हिटी’वरील वेबिनार आयोजित करण्याच्या ब्राझिलियन अध्यक्षांच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.  शेती, उत्पादन, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि वित्तपुरवठा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये  प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या गरजांनुसार समावेशक, सुलभ आणि मोजता येण्याजोग्या डिजिटल सेवा देऊ करण्याच्या दृष्टीने आयसीटीचा अवलंब करून सातत्यपूर्ण  ज्ञान सामायिकिकरण आणि धोरण देवाणघेवाण करण्यास यामुळे प्रोत्साहन  मिळेल. ब्रिक्समधील उप कार्यक्रम म्हणून  डिजिटल परिवर्तनावर क्षमता बांधणी सत्रे आयोजित करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो आणि अशा उप कार्यक्रमांना समर्थन देत राहण्यास ब्रिक्स सदस्यांना प्रोत्साहित करतो. 

चीन आणि ब्राझील यांनी 2025 मध्ये आयोजित केलेल्या ‘ब्रिक्स फोरम ऑन फ्युचर नेटवर्क्स इनोव्हेशन’च्या आयोजनाबद्दल आम्ही आभारी आहोत. ब्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर नेटवर्क्सच्या कौन्सिलने एआय, नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेशन्स, इंटरनेट अॅप्लिकेशन इन इंडस्ट्री 4.0 आणि ईएमएफ एक्सपोजरवरील अभ्यास गटांच्या संदर्भ अटींचा केलेला स्वीकार  तसेच त्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नामांकनाचे आम्ही स्वागत करतो. या बीआयएफएन अभ्यास गटांकडून येणाऱ्या अहवालांची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ऑनलाइन बालसंरक्षणाच्या मुद्द्यावर सदस्य राष्ट्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींद्वारे या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी नवीन यंत्रणा विकसित करण्यासह झालेल्या प्रगतीची देखील आम्ही प्रशंसा करतो. डिजिटल ब्रिक्स फोरम दरम्यान डिजिटल सार्वजनिक वस्तू (DPG) आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील पॅनेल चर्चा आयोजित करण्यासाठी  ब्राझिलियन अध्यक्षांनी केलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो आणि सतत ज्ञान सामायिकरण आणि धोरण देवाणघेवाणीला प्रोत्साहन देतो. आम्ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील फोकस ग्रुपची बैठक आयोजित केल्याची देखील नोंद घेतो आणि त्याच्या संदर्भ अटी स्वीकारल्याचे स्वागत करतो.

स्पेक्ट्रम आणि त्याला संलग्न उपग्रह कक्षांचा तर्कसंगत, कार्यक्षम, न्याय्य, निष्पक्ष, प्रभावी आणि किफायतशीर वापर साध्य करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो, अंतराळ शाश्वततेवर सहकार्य सुलभ करण्यासाठी आम्ही ब्रिक्स सदस्यांमध्ये अधिक सहकार्याला प्रोत्साहन देतो. शाश्वत अंतराळ कनेक्टिव्हिटी संसाधनांवरील भविष्यातील कृतींसाठी ब्रिक्स करत असलेल्या कार्याबद्दल तसेच काही प्रस्तावांसह ब्राझिलियन अध्यक्षपद एक अहवाल विचारार्थ तयार करत आहे, याबद्दल आम्हाला समाधान आहे. अंतराळ दूरसंचार प्रणालींच्या तांत्रिक आवाक्याची कोणत्याही परिस्थितीत देशांच्या सार्वभौमत्वावर कुरघोडी होऊ नये, या तत्वाला  आम्ही मान्यता देत आहोत . एखाद्या देशाच्या हद्दीत उपग्रह सेवांची तरतूद करण्याआधी त्या देशाची परवानगी आवश्यक आहे.  शाश्वत अंतराळ कनेक्टिव्हिटी संसाधनांवरील ब्रिक्स श्वेतपत्रिकेचे आम्ही स्वागत करतो.

बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण शोध आणि उपयोग यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्व आम्ही जाणले असून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये अंतराळ क्षमतांविषयी सध्या असलेला असमतोल दूर करण्यासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. आपल्या अंतराळ संस्थांमध्ये सध्या सुरु असलेले सहकार्य वाढविण्यासाठी आणि शाश्वत प्रगतीची जोपासना करण्यासाठी अंतराळ घडामोडींमधला डाटा, तज्ञ व उत्तम प्रथांची देवाण-घेवाण अधिक बळकट करणे, हा महत्वाचा घटक असल्याचे आम्ही स्वीकारले आहे. सुलभ माहिती आदान-प्रदान आणि क्षमता बांधणी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठीची यंत्रणा म्हणून समन्वित वृत्त पत्रिका प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो. या समूहात अंतराळ घडामोडींमध्ये सहकार्य अधिक वाढविण्याच्या दृष्टीने ब्रिक्स अंतराळ परिषद स्थापन करण्यासाठी आणि यासाठीची रूपरेषा आखण्यासाठीचे काम जारी राखण्याला आम्ही तत्वतः मान्यता दर्शवली आहे. UNFCCC COP30 ला पाठींबा देण्याकरिता संयुक्त निरीक्षण अभ्यासावरची चर्चा पुढे नेण्याकरिता एजन्सीनी मान्यता दिल्याची आम्ही दखल घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठीचा महत्वाचा जागतिक मंच म्हणून जी-20 ची महत्वाची भूमिका आम्ही अधोरेखित करतो. हा मंच बहुध्रुवीय जगासाठी प्रोत्साहन त्याचबरोबर जागतिक आव्हानांवर विकसित आणि उदयोन्मुख अशा दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी समान व परस्परांना लाभदायी पायावर संवादाची संधी पुरवितो. फलनिष्पत्तीवर लक्ष केंद्रित करत मतैक्यावर आधारित जी-20 च्या निरंतर आणि उत्पादक कामकाजाचे महत्व आम्ही जाणले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदासाठी आमच्या ठाम पाठींब्याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग इथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाची प्रतीक्षा करत आहोत. जागतिक आर्थिक प्रशासन व्यवस्थेत ग्लोबल साउथ राष्ट्रांचा आवाज वाढविण्यासाठी आणि अधिक समावेशकतेसाठी भूमिका समन्वयीत करण्याच्या इच्छेचा आम्ही पुनरुच्चार करतो, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उदयोन्मुख बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्था यांचा वाढता प्रभाव पुरेसा प्रतिबिंबित होईल तसेच 2022-2025 या काळात आणि त्यापलीकडे इंडोनेशिया, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सलग जी-20 अध्यक्षपदाद्वारे ब्रिक्स जी- 20 कार्यक्रम पत्रिकेत त्यांच्या प्रधान्यांना अधिक प्रभावीपणे समाविष्ट करेल. 2023 मध्ये भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन महासंघाच्या प्रवेशद्वारे जी-20 मध्ये उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा आवाज जोरदार केल्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. ब्राझील आणि इंडोनेशिया यांच्या अध्यक्षपदाच्या काळात एनडीबीच्या निमंत्रणाचे स्वागत करतो.

बाह्य धक्क्यांचा विशेषकरून काही प्रगत अर्थव्यवस्थांमधल्या वित्तीय धोरणांमधल्या चढउतारांच्या प्रभावामुळे आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेमधल्या मुलभूत समस्यांमुळे काही देशांचा सध्याच्या विकासासंदर्भातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक वित्तीय अवकाश, उच्च कर्ज स्तरामुळे कमी झाल्याची नोंद आम्ही घेतली आहे. उच्च व्याज दर आणि कठोर वित्तीय अटी यामुळे अनेक देशांमध्ये कर्ज असुरक्षितता अधिक वाढत आहे. आंतरराष्ट्रीय कर्जाची योग्य, तसेच आर्थिक वसुली आणि शाश्वत विकासाला सहाय्यकारक पद्धतीने समग्र दखल घेणे आवश्यक असल्याचे आम्ही मानतो. यासाठी प्रत्येक राष्ट्राचे कायदे आणि अंतर्गत पद्धती लक्षात घेत त्याला शाश्वत बाह्य कर्ज व वित्तीय सुज्ञपणाची जोड हवी. कमी आणि मध्यम उत्पन्न अशा दोन्ही गटातल्या देशांमधल्या कर्ज असुरक्षिततेची प्रभावी, समावेशक आणि नियोजनबद्ध पद्धतीने दखल घेण्याच्या गरजेची आम्ही नोंद घेतली आहे. कर्ज असुरक्षिततेची एकत्रित दखल घेण्याचे एक साधन म्हणजे अधिकृत द्विपक्षीय कर्जदाते, खाजगी कर्जदाते आणि बहुपक्षीय विकास बँका (एमडीबीएस) यांच्या एकत्रित कृती व न्याय्य भार (1) वाटून घेण्याच्या तत्वाला अनुसरत सहभागासह जी-20 कर्ज व्यवहारविषयक सामायिक चौकटीची सुव्यवस्थित, वेळेवर आणि समन्वित अंमलबजावणी, विकासाच्या दृष्टीकोनातून उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या (ईएमडीईएस) कर्ज विषयक समस्यांची निष्पक्ष आणि रचनात्मक पद्धतीने दखल घेण्यात मदत करण्यासाठी कर्ज घेणारे तसेच अधिकृत द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि खाजगी कर्जदाते यांच्यामधला समन्वय वाढविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

आधुनिक जीवनात, नवोन्मेश संचालित विकास आणि माहिती आधारित तसेच समावेशक सार्वजनिक धोरणे निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून डाटाची महत्वाची भूमिका जाणून डाटा शासनासंदर्भात सामायिक आणि तत्वाधारित आंतर संचालन चौकटीच्या आवश्यकतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. यामध्ये राष्ट्रीय डाटा सार्वभौमत्वाचा आदर, प्रभावी, सोयीचा, सुरक्षित आणि परस्पर संमत सीमापार डाटा ओघ आणि डाटाचा नैतिक उपयोग यांचा समावेश आहे, जेणेकरून संग्रह, रेकॉर्डिंग, साठवण, संघटन, डाटा  प्रक्रिया आणि हस्तांतरण विषयक तत्वांची दखल घेतली जाईल; राष्ट्रीय डाटा धोरण नियमनाच्या आंतर संचालनाला प्रोत्साहन मिळेल, डाटाचे मौद्रिक आणि बिगर (1) मौद्रिक लाभ विकसनशील देश आणि त्यांचे नागरिक यांच्यामध्ये वितरीत करता येतील. या संदर्भात ब्रिक्स देशांमधल्या डाटा अर्थव्यवस्थेची सांगड घालण्याकरिता पथदर्शक म्हणून ‘ब्रिक्स डाटा अर्थव्यवस्था शासन आकलन’ समापनाचे आम्ही स्वागत करतो. जेणेकरून तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर, वैयक्तिक आणि राष्ट्रीय हित संरक्षण, उद्योग आणि सेवांचे डिजिटलायझेशन, देशांमध्ये आंतर ब्रिक्स व्यापाराचा विस्तार यांना प्रोत्साहन मिळेल.

ई-कॉमर्स हा जागतिक आर्थिक विकासाचा महत्वाचा घटक झाला असून वस्तू आणि सेवा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देत आहे, परदेशी गुंतवणुकीचा ओघ सुनिश्चित करत आहे तसेच नवोन्मेशाला चालना देत आहे, यावर आम्ही भर देत आहोत. ई-कॉमर्स वरचा विश्वास अधिक वाढविण्याचा आम्ही निर्धार केला आहे. ग्राहक हक्क संरक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, ऑनलाईन विवाद निराकरण उपकरणांचा शोध, जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी व्यापाराकरिता सक्षम वातावरण निर्मिती, सीमापार ई-कॉमर्सद्वारे अल्प मूल्य उत्पादनांच्या व्यापाराच्या मुद्यावर विचारांची देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रात सहकार्य दृढ करून ई-कॉमर्स पार्टीच्या अधिकारांचे संपूर्णपणे संरक्षण सुनिश्चित करण्याचा आमचा निश्चय आहे.

ब्रिक्स देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्रांचा (एसईझेड) प्रभाव आणि व्यापार व औद्योगिक सहकार्य तसेच उत्पादन सुलभता यासाठीची प्रस्थापित यंत्रणा म्हणून मान्यता आम्ही जारी ठेवतो. यामध्ये अर्थव्यवस्थेची उच्च-तंत्र क्षेत्रे, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान चलित सेवा, पर्यटन, बंदरे आणि वाहतूक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायीकरण त्याचबरोबर नव्या प्रकारच्या मूल्यवर्धित उत्पादनांचे उत्पादन यांचा समावेश आहे, मात्र हे केवळ याच क्षेत्रापुरते मर्यादित नाही. आर्थिक विकासाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये अतिरिक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे अपार संधी पुरवितात, तसेच आर्थिक विकासाला चालना देणारे आणि प्रामुख्याने उच्च तंत्र व पायाभूत सुविधा क्षेत्रात मात्र केवळ याच क्षेत्रापुरत्या मर्यादित नसणाऱ्या नव्या रोजगार संधी निर्माण करणारे साधन या रूपाने आम्ही विशेष आर्थिक क्षेत्रांच्या क्षमतेचा स्वीकार करतो.

जागतिक अन्नधान्य उत्पादनात ब्रिक्स देशांची महत्वाची भूमिका आम्ही मान्य करतो, तसेच जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करण्यात, कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वृद्धिंगत करण्यात त्यांची महत्वाची भूमिकाही आम्ही मान्य करतो. अल्पभूधारक, पशुपालक, कारागीर, छोट्या प्रमाणात मासेमारी करणारे आणि जलशेती उत्पादक, स्थानिक समुदाय आणि लोक, महिला व युवक यांच्यासह शेतकरी परिवार हे कृषी आणि अन्न प्रणालीचे महत्वाचे भागधारक आहेत, याची आम्ही नोंद घेतो. जागतिक शाश्वत वनस्पती तेल क्षेत्रात स्थैर्य, समावेशकता आणि न्याय्य बाजार पोहोच यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाठबळ, योग्य किंमतची खात्री, लवचिक आणि शाश्वत कृषी मूल्य साखळीला प्रोत्साहन यासाठी ब्रिक्स देश व भागीदार यांचा सहयोग चालू ठेवण्याचे आवाहन आम्ही करतो. माहिती आणि डिजिटल नवोन्मेश यासह छोट्या प्रमाणातल्या शेतीमध्ये यांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक नवोन्मेश हे कष्ट कमी करण्याची, उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्याची, लवचिकता वृद्धिंगत करण्याची तसेच शाश्वत परिवर्तनाला गती देण्याची धोरणात्मक संधी आहे, हे आम्ही मान्य करतो.

अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करण्याच्या, अन्नधान्य किमतीतल्या अनिश्चित चढ-उताराच्या प्रभावाचे शमन करण्याच्या त्याचबरोबर खत टंचाईसह पुरवठा साखळी संकटे कमी करण्याच्या महत्वावर आम्ही भर देतो. ब्रिक्स देशांमध्ये (ब्रिक्स धान्य देवाणघेवाण) धान्य व्यापार मंच व त्याचा विकास, तसेच इतर कृषी उत्पादने आणि वस्तू यामध्ये त्याचा विस्तार यासाठीच्या उपक्रमाच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे महत्व आम्ही स्वीकारतो. ब्रिक्स आणि इतर विकसनशील देशांमध्ये राष्ट्रीय धोरण व अन्न उपलब्धता, पोहोच, उपयोग, स्थैर्य आणि किफायतशीरपणा वृद्धिंगत करणारी आंतरराष्ट्रीय सहकार्यावरची चर्चा पुढे नेण्याला आम्ही पाठींबा देतो. त्याचबरोबर ब्रिक्स आणि इतर विकसनशील राष्ट्रांमध्ये संबंधित कृषी आणि अन्न उत्पादन इनपुटस, ज्यामध्ये पुरवठा साखळीतल्या व्यत्ययाला तोंड देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्षमता बळकट करणाऱ्या राष्ट्रीय अन्न राखीव साठा प्रणालीचा समावेश आहे, यावरच्या चर्चेलाही आम्ही पाठींबा देतो. ब्रिक्स सदस्य राष्ट्रांवर परिणाम करणारा पुरवठ्याचा तुटवडा किंवा अन्नधान्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती अशा अपवादात्मक परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि तातडीने प्रतिसाद यासारखे सहकार्य उपक्रम सुविधाजनक ठरतात, याची आम्ही नोंद घेतो. हे प्रतिसाद राष्ट्रीय धोरणाला अनुलक्षून आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांना अनुसरून असावेत. आंतरराष्ट्रीय ऐक्याद्वारे अन्न सुरक्षा आणि पोषण यांना पाठबळ देणे, हे एकमेव उद्दिष्ट यामागे असल्याने यापैकी कोणतीही उपाययोजना आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचा भंग करणारी किंवा अनुचित व्यापार प्रथा असता कामा नये. अन्नधान्य वाया जाणे आणि त्याची नासाडी कमी करण्याचे महत्व आम्ही जाणतो त्याचबरोबर हानिकारक रोग व कीटक यांच्यासाठी एकत्रित अटकाव तसेच नियंत्रण याद्वारे प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्याची खात्री यांचे महत्व आम्ही जाणतो. यामध्ये अन्नधान्य आणि पशुखाद्याची  ने-आण करण्यामध्ये पारदर्शकता वाढविणे, प्राणी आणि वनस्पती उत्पादनांना एकीकृत इलेक्ट्रॉनिक्स प्रमाणन पद्धती हे महत्वाचे साधन मानणे, यांचा समावेश आहे.

उपासमार हद्दपार करण्यासाठी आणि कोणत्याही स्वरूपातले कुपोषण नष्ट करण्यासाठी, दारिद्र्य निर्मुलनासाठी, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश यांचा अवलंब करत शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, छोटे (1) आणि कौटुंबिक शेती करणारे, मच्छिमार आणि जलशेती करणारे, या वर्गाला परवडणारे आणि त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्यानुसार यंत्रसामग्री व यंत्रे यांचे स्थानिक उत्पादन घेण्यासाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी कृषी, मत्स्य पालन आणि जलशेती क्षेत्रामध्ये सहकार्य आणखी वाढविण्याचे आवाहन आम्ही करतो. अन्न सुरक्षा आणि पोषणावरच्या डेक्कन उच्च स्तरीय तत्वावर आधारित वाटचाल करताना उपासमार आणि दारिद्र्य याविरोधातल्या जागतिक आघाडीला, आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारे महत्वाचे साधन म्हणून आम्ही मान्यता देतो. कृषी उत्पादने, कृषी आणि अन्नधान्य उत्पादन कच्चा माल यांचा आंतर ब्रिक्स व्यापार सुलभ करणाऱ्या तसेच मूल्य साखळी आणि शाश्वत कृषी प्रथा सुधारणा यासंदर्भातल्या चर्चेच्या प्रगतीसाठी आम्ही उत्सुक आहोत. न्याय्य कृषी व्यापार प्रणाली विकसित करण्याची तसेच लवचिक आणि शाश्वत कृषी पद्धती अवलंबण्याच्या आवश्यकतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. अडथळे कमी करण्यासाठी तसेच कृषी आणि खते या क्षेत्रात नियमाधारित व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्धता दर्शवतो ज्यायोगे, कृषी उत्पादनांसाठी अन्नधान्य आणि आवश्यक कच्चा माल यांचा अखंडित ओघ खात्रीशीर होईल; ज्याला अयोग्य प्रतिबंधात्मक आर्थिक उपाययोजनांमधून सूट मिळायला हवी, जे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी सुसंगत नाहीत, ज्यामध्ये कृषी उत्पादनांचे उत्पादक आणि निर्यातदार तसेच आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसंदर्भात व्यापार सेवा प्रभावित करणाऱ्या उपायांचा समावेश आहे. युएनसीसीडी चौकटीच्या धर्तीवर भू पुनर्संचयासाठी ब्रिक्स भागीदारीच्या प्रारंभाचे तसेच उपासमार आणि दारिद्र्य याविरोधातली जागतिक आघाडी अमलात आणण्यासाठीच्या योगदानासंदर्भातल्या ब्रिक्स एडब्ल्यूजी अहवालाचे आम्ही स्वागत करतो.

बाजारपेठांच्या शाश्वत विकासासाठी योगदान, स्पर्धात्मक नसलेल्या सीमापार पद्धतींना आळा, निकोप बाजार वातावरणाला प्रोत्साहन या दृष्टीकोनातून ब्रिक्स देशांमध्ये स्पर्धात्मक कायदे आणि धोरणे या क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी तसेच यात वाढ करण्यासाठीच्या आमच्या कटिबद्धतेची आम्ही पुष्टी करतो. ब्रिक्स स्पर्धात्मकता विषयक अधिकाऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि ज्ञान निर्मिती यामध्ये ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक कायदा व धोरण केंद्र उपक्रमांच्या भूमिकेची आम्ही नोंद घेतो तसेच ब्रिक्स अर्थव्यवस्थांमध्ये स्पर्धात्मकता कायदा विकासासाठी अतिशय अनुकूल वातावरण खात्रीशीर करण्याचे आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या बाजारांमध्ये एकाधिकारशाहीसारखे अडथळे दूर करण्याच्या दिशेने काम करण्याचे महत्व आम्ही जाणतो. 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये नवव्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता परिषदेच्या आयोजनाचे आम्ही स्वागत करतो.

ब्रिक्स राष्ट्रीय मानकीकरण संस्था  प्रमुखांच्या बैठकीच्या ब्रासिलीया जाहीरनाम्याचा स्वीकार करण्याचे आम्ही स्वागत करतो, ज्यामध्ये आर्थिक संबंध आणि व्यापार सुलभता, ग्राहक संरक्षण वृद्धी, शाश्वत विकासाला प्रोत्साहन यासह या क्षेत्रातल्या सहकार्याच्या लक्षणीय लाभांची दखल घेण्यात आली आहे. मानकीकरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत सामंजस्य कराराच्या वाटाघाटी वेळेत समाप्त करण्याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत, कारण व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी तसेच सीमापार वस्तू आणि सेवा व्यवहार सुलभ करण्याकरिता प्रभावी उपकरण म्हणून मानकीकरण तसेच मापनशास्त्राला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा आहे.

ब्रिक्स देशांमधल्या लेखापरीक्षणाच्या सर्वोच्च संस्थांमधल्या उत्तम प्रथांच्या सातत्यपूर्ण देवाण घेवाणीची आम्ही प्रशंसा करतो. सुप्रशासन आणि प्रभावी सार्वजनिक धोरणांना प्रोत्साहन देण्यात सर्वोच्च लेखा परीक्षण संस्थेची भूमिका लक्षात घेत कृत्रिम प्रज्ञेसह डिजिटल तंत्रज्ञानाने दिलेल्या संधीचा पूर्ण लाभ घेतानाच या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यात या संस्थेचे महत्व आम्ही स्वीकारतो.  

प्रभावी निर्णय घेण्यासाठी अधिकृत आकडेवारीचे महत्व जाणत, ब्रिक्स मध्ये वार्षिक ब्रिक्स संयुक्त सांख्यिकी प्रकाशन आणि ब्रिक्स संयुक्त सांख्यिकी प्रकाशन स्नॅप शॉट यांच्यासह सांख्यिकी सहकार्य वृद्धिंगत करण्याला त्याचबरोबर ब्रिक्स देशांमध्ये अधिकृत आकडेवारी क्षेत्रात उत्तम प्रथांची देवाणघेवाण करण्याला आम्ही पाठींबा  दर्शवतो. एकविसाव्या शतकासाठी योग्य अशा निष्पक्ष, अधिक समावेशक, स्थिर आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय कर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सहकार्य कायम ठेऊ.

कर पारदर्शकता तसेच प्रभावी आणि निष्पक्ष कर प्रणालीसाठी जागतिक संवादाला प्रोत्साहन, व्यापक प्रगती आणि असमानता कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात योगदान यासाठीच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. कर अधिकाऱ्यांमधला जागतिक समन्वय अधिक दृढ करणे, देशांतर्गत महसूल गतिमानता सुधारणे, कर अधिकारांचे न्याय्य वाटप पुरविणे आणि कर चुकवेगिरीला तसेच कर विषयक अवैध वित्तीय ओघाला आळा घालणे, हा आमचा उद्देश आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय कर सहकार्यावरील संयुक्त राष्ट्रांच्या करार चौकटीच्या आधारावर ब्रिक्स संयुक्त निवेदनाचे आम्ही स्वागत करतो तसेच संयुक्त राष्ट्र करार आणि त्याचे शिष्टाचार यासंदर्भातल्या वाटाघाटीमध्ये आम्ही भरीव योगदान कायम ठेऊ.

सीमाशुल्क सहयोगातल्या प्रगतीचे आम्ही स्वागत करतो, विशेषकरून अधिकृत आर्थिक ऑपरेटर कार्यक्रमाच्या परस्पर मान्यतेच्या दिशेने  संयुक्त कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठीचे उपक्रम जे द्विपक्षीय मान्य अपवाद, सुधारणा आणि रुपांतर यांच्या अधीन आहेत. सीमाशुल्क सहकार्यामधली महत्वाची घडामोड म्हणजे ब्रिक्स सीमाशुल्क उत्कृष्टता केंद्र उभारणी आणि स्मार्ट सीमाशुल्क विकास असून यासाठी आमचे प्रोत्साहन सुरु राहील.

बौद्धिक संपदा (आयपी) कार्यालयांनी आयपी ब्रिक्स अंतर्गत दिलेले फलदायी सहकार्य आम्ही अधोरेखित करतो. आर्थिक आणि सामाजिक विकासात आयपी साठी मजबूत योगदानाची अपेक्षा करत परिचालनात्मक मार्गदर्शक तत्वांच्या आराखड्याद्वारे मार्गदर्शित आयपी जागरूकतेला प्रोत्साहन आणि परीक्षकांचे परीक्षण यांसारख्या सहकार्याच्या आठ शाखांच्या अंतर्गत अधिक व्यावहारिक परिणाम साध्य करण्याला पाठींबा देतो. आम्ही बौद्धिक संपदा, जनुकीय साधनसंपत्ती आणि संबंधित पारंपरिक ज्ञानविषयक डब्ल्यूआयपीओ ठराव तसेच रियाध डिझाईन कायदा करार यांच्या स्वीकाराचे स्वागत करतो. या ठरावांवर ब्रिक्स देशांना लक्षणीय रुची आहे आणि या संदर्भात ब्रिक्स देशांमध्ये सहयोग वाढवण्याप्रती आम्ही वचनबद्ध आहोत. विकसनशील देशांच्या गरजा तसेच प्राधान्यक्रम यांच्याप्रती आदर राखत कृत्रिम बुद्धीमत्ता प्रशिक्षण हेतू आणि पात्र धारकांसाठी योग्य मोबादल्यासह डिजिटल वातावरणात वापरण्यात येणाऱ्या बौद्धिक संपदेच्या हक्कांप्रती सन्मानाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येण्याचे महत्व आम्ही जाणतो. एआयच्या वापराचा उदय झाल्यापासून, डाटा संचात तसेच एआय नमुन्यांमध्ये अपुऱ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेल्या ज्ञान, वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांचा गैरवापर तसेच चुकीची माहिती दिली जाण्याशी संबंधित जोखमी आम्ही ओळखतो.   

भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष मंत्र्यांनी (एसटीआय) वर्ष 2015 मध्ये सहकार्यविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यापासून आतापर्यंतच्या दहा वर्षांच्या कालावधीतील लक्षणीय कामगिरी लक्षात घेत ब्रिक्स देशांनी एसटीआयमधील सहकार्याच्या क्षेत्रात गाठलेला महत्त्वाचा टप्पा आम्ही साजरा करत आहोत. या करारातील प्रवेश नियमावलीच्या माध्यमातून सदर करारामध्ये नवीन सदस्यांच्या समावेशासाठी सध्या सुरु असलेल्या प्रक्रियेचे स्वागत करतो. ब्रिक्स देशांमध्ये मैत्री, परस्पर सामंजस्य तसेच शांततापूर्ण नाते बळकट करण्यात अधिक योगदान देत सहयोगामध्ये घट्ट रुजलेल्या भागीदारीच्या माध्यमातून ब्रिक्स देशांचा विकास तसेच त्यांच्या तिन्ही मितींमध्ये प्रगत शाश्वत विकास साध्य करण्यासाठी नव्या उत्पादक शक्तींना चालना देणे, हा एसआयटी मधील ब्रिक्स सहकार्याचा अंतिम हेतू आहे, या मुद्द्याला आम्ही दुजोरा देतो.

ब्रिक्स एसटीआय कृतिगटांच्या कार्याचे आम्ही कौतुक करतो. नव्याने उदयाला येणारी तंत्रज्ञाने आणि राष्ट्रीय पुनरौद्योगिकीकरण प्रक्रियांतील वेगवान प्रगतीच्या अनोख्या संदर्भात, उद्योग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम तंत्रज्ञाने तसेच नवोन्मेष यांचा वर्ष 2025 मधील प्राधान्यक्रम म्हणून विचार करण्याच्या ब्राझील देशाने मांडलेल्या प्रस्तावाचे आम्ही कौतुक करतो. नवोन्मेष 2025-2030 साठी ब्रिक्स कृती योजनेचे तसेच संशोधन प्रकल्पांसाठीचे सातवे संयुक्त आवाहन आणि नवोन्मेष प्रकल्पांसाठीचे पहिले संयुक्त आवाहन यांचे आम्ही स्वागत करतो. ब्रिक्स देशांच्या दरम्यान पाण्याखालील केबल्सच्या माध्यमातून उच्च-वेग असलेले संपर्क नेटवर्क स्थापन करण्यासाठी “तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अभ्यास” हाती घेण्याबाबत वर्ष 2025 मध्ये चर्चा करण्याच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो.

यावर्षी ज्या उपक्रमाच्या कार्याचे दहावे वर्ष आहे, असा युवा शास्त्रज्ञ मंच तसेच युवा नवनिर्माते पारितोषिक अशा उपक्रमांच्या माध्यमातून तरुण शास्त्रज्ञ आणि स्टार्ट अप्स यांच्या सहभागाला चालना देण्याचे आवाहन आम्ही सर्व ब्रिक्स सदस्य देशांना करत आहोत. ब्रिक्स गहन समुद्र स्त्रोतविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना पूर्ण करणाऱ्या संदर्भ अटींच्या विस्तारासह गहन समुद्रातील संयुक्त संशोधनाच्या सहकारी कार्यक्रमातील प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. मानवतावादी क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि 2025 मध्ये रशियात सामाजिक विज्ञान आणि मानवतावादी संशोधन मंचाच्या आयोजनाचे स्वागत करतो.

ब्रिक्स देशांमध्ये पर्यटन क्षेत्रात अमर्याद क्षमता आहे आणि हे देश सहयोग तसेच ब्रिक्स देशांदरम्यानच्या प्रवासाला चालना देण्यासाठी नव्या संधी पुरवणाऱ्या वर्ष 2024 मधील सदस्यत्व विस्तारामुळे अधिक सुधारलेल्या पर्यावरणस्नेही पर्यटनासह शाश्वत तसेच लवचिक पर्यटनाची वाढ आणि विकासासाठी आश्वासक शक्यता देऊ करतात याची दखल घेत आम्ही पर्यटन कृतीगटाच्या निष्कर्षांचे स्वागत करतो. सदस्य देशांमध्ये समन्वय आणि पूरकता बळकट करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन नीतींना प्रोत्साहन; सामायिक आव्हानांना तोंड देण्याचा एक मार्ग म्हणून शाश्वत, लवचिक आणि पुनरुत्पादक पर्यटनाची प्रगती; आणि स्थानिक विकास तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतिनिधी म्हणून डिजिटल भटक्यांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्वांची निश्चिती हे त्यापैकी काही निष्कर्ष होय. ब्रिक्स देशांतील सहकार्याचा विस्तार करणे, नवोन्मेषाची जोपासना करणे आणि शाश्वत विकास ध्येयांची पूर्तता करण्यात पर्यटन क्षेत्र अर्थपूर्ण रीतीने योगदान देईल यांची खात्री करून घेणे, या प्रती आम्ही आमच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

हवामान बदलाशी लढा आणि शाश्वत, न्याय्य तसेच समावेशक विकासाला चालना

आपला सामायिक ग्रह आणि आपले भविष्य यांच्यासाठी धोका ठरणाऱ्या हवामान बदलासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याच्या आमच्या कटिबद्धतेवर आम्ही भर देतो. पॅरिस कराराचा हेतू तसेच ध्येये आणि 'युएनएफसीसीसी'ची उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या प्रयत्नात एकत्र राहण्याचा निर्धार आम्ही व्यक्त करतो आणि सर्व देशांना 'युएनएफसीसीसी' प्रती तसेच पॅरिस कराराप्रती पक्ष म्हणून त्यांच्या विद्यमान कटिबद्धता राखण्याचे आणि हवामान बदलाशी लढा देण्याचे त्यांचे प्रयत्न कायम ठेऊन त्यात आणखी वाढ करण्याचे आवाहन करतो. विविध राष्ट्रीय परिस्थितींमध्ये न्यायबुद्धी आणि सामायिक पण भिन्न जबाबदाऱ्या तसेच संबंधित क्षमतांचे तत्व यांचे दर्शन घडवत, पॅरिस करारातील उपशमन, स्वीकार यांच्याशी संबंधित तरतुदी तसेच विकसनशील देशांमध्ये अंमलबजावणीच्या मार्गांची तरतूद यांच्यासह या कराराच्या संपूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणीला मजबुती देऊन हवामान बदलाचा सामना करण्यासाठी युएनएफसीसीसीच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याप्रती आमची अढळ वचनबद्धता आम्ही आणखी ठामपणे व्यक्त करत आहोत. या संदर्भात, आम्ही जागतिक हवामान बदलासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या संरचनात्मक परिषदेच्या (युएनएफसीसीसी) कॉप-30च्या अध्यक्षतेला आमचा संपूर्ण पाठींबा व्यक्त करतो. ब्राझीलमध्ये बेलेम शहरात आयोजित करण्यात आलेली ही परिषद युएनएफसीसीसीच्या सर्व स्तंभांसाठी कृती आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत त्या अंतर्गत प्रत्येक देशाचे सदस्यत्व आणि वचनबद्धता यांना विचारात घेते. युएनएफसीसीसी आणि त्याचा पॅरिस करार यांच्या अंमलबजावणीमधील प्रगतीला प्रेरक ठरणारी कॉप30 परिषद यशस्वी करण्याप्रती आमची संपूर्ण वचनबद्धता देखील आम्ही अधोरेखित करतो. वर्ष 2028 मध्ये कॉप 33च्या यजमानपदासाठी भारताच्या उमेदवारीचे आम्ही स्वागत करतो.

आम्ही शाश्वत विकास आणि दारिद्रय निर्मूलनाच्या संदर्भात हवामान बदलाप्रती अधिक मजबूत जागतिक प्रतिसादाचे आवाहन करतो. हवामान बदलाच्या समस्येवर कृती करण्याची निकड समजून घेत, युएनएफसीसीसी आणि त्याचा पॅरिस करार यांच्या संपूर्ण अंमलबजावणीच्या दिशेने कृतीला अधिक गती देऊन आणि सहकार्यात वाढ करून ब्रिक्सच्या विकासविषयक गरजा आणि प्राधान्यक्रमांना पाठींबा देणाऱ्या उपायांमध्ये प्रगती करण्यासह परस्पर सक्षमीकरणाच्या माध्यमातून सामुहिक नेतृत्वाचा वापर करण्याच्या आमच्या निर्धाराचे निवेदन म्हणून आम्ही ब्रिक्स हवामान नेतृत्व अजेंड्याला मान्यता देतो. या निष्कर्षावरून असे दिसून येते की, अधिक चांगल्या भविष्यासाठी बहुपक्षीयता तसेच जगाच्या दक्षिणेकडील देशांचे सहकार्य अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनाला आकार देऊ शकते हे आम्ही अधोरेखित करतो.

हवामान विषयक कृतीला शाश्वत विकासाशी जोडून घेणारे न्याय्य स्थित्यंतर मार्ग शक्य व्हावेत म्हणून विकसनशील देशांसाठी सहजप्राप्य, योग्य वेळी आणि परवडण्याजोग्या हवामान वित्तपुरवठ्याची सुनिश्चिती करण्यावर आम्ही अधिक भर देतो. युएनएफसीसीसी आणि त्याच्या पॅरिस कराराअंतर्गत स्त्रोतांची तरतूद तसेच जमवाजमव ही विकसित देशांची विकसनशील देशांप्रती असलेली जबाबदारी आहे हे आम्ही अधोरेखित करतो. बहुपक्षीयता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याप्रती बांधील असलेल्या तसेच अधिक निष्पक्ष आणि अधिक शाश्वत आंतरराष्ट्रीय चलन आणि वित्तीय प्रणालीसाठी जागतिक एकत्रीकरणाचे नेतृत्व करण्याचा निश्चय केलेल्या आम्ही हवामान वित्तपुरवठा विषयक नेत्यांच्या आराखड्याच्या जाहीरनामा स्वीकारला आहे. यासाठी आम्ही आमचे आर्थिक सामर्थ्य आणि नवोन्मेष क्षमता यांचा वापर करुन महत्त्वाकांक्षी हवामानविषयक कृतीमुळे प्रत्येकासाठी समृद्धी आणि अधिक चांगले भविष्य घडवू शकतो हे दाखवण्यासाठी करत आहोत. वेगवेगळ्या राष्ट्रीय परिस्थितींमध्ये, युएनएफसीसीसी, त्याची क्योटो नियमावली आणि पॅरिस करार याची उद्दिष्ट्ये, तत्वे तसेच तरतुदी, त्यातील निष्पक्षपातीपणाची तत्वे आणि सामान्य पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तसेच त्यांच्याशी संबंधित क्षमता यांचा मान राखायला हवा, याचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.

आम्ही हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे मूल्यमापन करण्यासाठी परस्परांनी मान्यता दिलेल्या पद्धती आणि मानके यांच्या वापराला, योग्य म्हणून प्रोत्साहन देतो. आम्ही उत्पादने आणि सुविधा पदचिन्हे तत्वांतील निष्पक्ष, समावेशक आणि पारदर्शक कार्बन गणनेसाठी ब्रिक्स तत्वांच्या स्वीकाराची, कार्बन गणनाधारित यंत्रणाचे डिझाईन, मानके आणि पद्धती यांच्याप्रती ब्रिक्सचे महत्त्वाचे योगदान म्हणून प्रशंसा करतो तसेच विशिष्ट क्षेत्रांशी या तत्वांच्या संदर्भीकरणासारख्या पुढील कामांतून तसेच सर्व हरितगृह वायुंसाठी आणि कार्बन गणनेचा समावेश असलेल्या धोरणात्मक चौकटींना पाठबळ देण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी निराकरण करता येईल अशा ज्ञानातील तफावतीचे मूल्य अधोरेखित करतो. हवामान बदलाशी संबंधित तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी बौद्धिक संपदा पर्यायांवर आधारलेल्या ब्रिक्स अहवालाच्या स्वीकाराची आम्ही दखल घेतली असून हा अहवाल हवामानविषयक कृतींचा गंभीर सक्षमकर्ता म्हणून तंत्रज्ञानाचा विकास तसेच हस्तांतरणाला पाठबळ आणि वेग देण्याच्या उद्दिष्टासह ब्रिक्स सदस्य देशांतर्फे भविष्यात विचारात घेण्याच्या शक्यतेसाठी हवामान बदलाशी संबंधित सहकारी व्यवस्थेचे आश्वासक मॅपिंग करण्यात मदत करेल.

सर्व देशांमध्ये, विशेषतः विकसनशील देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढ आणि विकासाकडे घेऊन जाणाऱ्या आश्वासक तसेच खुल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अधिक विस्तृत सहकार्य मिळण्याचे जोरदार आवाहन करतो, जेणेकरून सदर देशांना हवामान बदलाच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजना; अगदी एकतर्फी उपायांसह, सगळ्या उपाययोजनांमध्ये मनमानी अथवा अन्याय्य भेदभावाचे अथवा आंतरराष्ट्रीय व्यापारावरील छुपे निर्बंध घालण्याचे मार्ग असता कामा नयेत यावर आम्ही भर देतो. व्यापार आणि पर्यावरणीय आयाम यांना एकत्र आणणाऱ्या मिश्र कायदेशीर स्वरूपाच्या उपाययोजनांद्वारे देऊ करण्यात आलेल्या संधी आणि आव्हाने मान्य करत त्यांनी पर्यावरणीय उद्दिष्टांच्या संदर्भात एकपक्षीय व्यापारी उपाययोजनांच्या वाढत्या वापराबाबत तीव्र चिंता आणि विरोध व्यक्त केला. तसेच आम्ही ब्रिक्स सदस्य व्यापाराच्या लाभांचा अधिक चांगला वापर करून घेऊ शकतील, संयुक्तपणे एकतर्फी उपाययोजनांना संयुक्तपणे प्रतिसाद देऊ शकतील आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देऊ शकतील यांची सुनिश्चिती करत  व्यापार आणि पर्यावरण धोरणाप्रती परस्पर सहाय्यक दृष्टीकोनांबाबत सहयोग सुलभ करण्यासाठीचा मंच म्हणून व्यापार, हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी ब्रिक्स प्रयोगशाळेच्या स्थापनेचे स्वागत करत आहोत.

ब्रिक्स हवामान संशोधन मंचासाठी संदर्भ अटींच्या अंगीकाराचे आम्ही स्वागत करतो आणि ब्रिक्स सदस्य देशांमध्ये दृष्टीकोन, ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींच्या वैज्ञानिक आणि तज्ञ विनिमयात वाढ करण्यासाठीचे अर्थपूर्ण योगदान म्हणून मान्यता देतो. 

पॅरिस करारातील कलम सहाला उपशमन कृतींमध्ये उच्च महत्त्वाकांक्षा जोपासण्याचे तसेच हवामान विषयक प्रयत्नांमध्ये खासगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीला दिशा देण्यासाठीचे मार्ग देऊ करुन शाश्वत विकास आणि पर्यावरणीय एकात्मतेला चालना देण्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणून आम्ही मान्यता देत आहोत. या यंत्रणा बळकट करून, आपण खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रेरणा देणे, तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला प्रोत्साहन देणे आणि सरकारी वित्तपुरवठ्याच्या ओघाला पूरक ठरणे, अशी विविध कार्ये साध्य करू शकतो. ब्रिक्स कार्बन बाजारपेठ भागीदारीशी संबंधित सामंजस्य करारातील तरतुदी तसेच क्षमता निर्मिती आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासह कार्बन बाजारपेठांच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या तरतुदींचे मूल्य यांची दखल आम्ही घेतली आहे. उपशमनविषयक प्रयत्नांना पूरक ठरण्यासह तसेच गरजेच्या स्त्रोतांचे एकत्रीकरण करण्यासह सदस्यांना त्यांच्या हवामानसंदर्भातील धोरणांमध्ये मदत करण्यासाठी सहकारी दृष्टीकोन म्हणून त्यांच्या अंमलबजावणीची आम्ही अपेक्षा करतो.

आम्ही एकतर्फी आणि भेदभावात्मक कार्बन सीमा समायोजन यंत्रणा (सीबीएएम्स), जंगलतोडविषयक नियम, योग्य परिश्रम आवश्यकता, कर आणि इतर उपाययोजना यांच्यासारख्या पर्यावरणीय चिंतांच्या बहाण्यासह आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नाहीत अशा एकतर्फी, दंडात्मक आणि भेदभावपूर्ण संरक्षणात्मक उपाययोजनांना नकार देतो तसेच हवामान तसेच पर्यावरण यांच्यावर आधारित एकतर्फी व्यापारी उपाययोजना टाळण्याशी संबंधित असलेला कॉप28 परिषदेतील आवाहनाला आमचा संपूर्ण पाठींबा आहे, याची ग्वाही देतो. जागतिक पुरवठा आणि उत्पादन साखळ्या जाणूनबुजून खंडित करणाऱ्या आणि स्पर्धेला विकृत रूप देणाऱ्या एकतर्फी संरक्षणात्मक उपायांचा देखील आम्ही विरोध करतो.

उर्जेचे प्रमुख उत्पादक आणि ग्राहक अशा दोन्ही नात्याने आपल्या सामायिक जबाबदारीचा स्वीकार करत आम्ही शाश्वत विकास ध्येय क्र. 7 (एसडीजी-7) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रीय परिस्थिती तसेच सर्वांसाठी परवडण्याजोग्या दरातील, विश्वासार्ह, टिकाऊ आणि आधुनिक उर्जेची सार्वत्रिक उपलब्धता यानुसार न्याय्य आणि समावेशक उर्जा स्थित्यंतर सुनिश्चित करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला आम्ही दुजोरा देतो. या संदर्भात, त्या ध्येयाच्या दिशेने प्रगतीला वेग देण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अधिक मजबूत सहकार्याचे आम्ही आवाहन करतो. हे लक्षात घेऊन आम्ही ज्येष्ठ उर्जा अधिकाऱ्यांची ब्रिक्स समिती तसेच ब्रिक्स उर्जा संशोधन मंच यांच्या फलदायी कार्याचे आम्ही स्वागत करतो आणि ब्रिक्स उर्जा सहकार्य 2025-2030 साठीचा अद्ययावत आराखडा व उर्जाविषयक सेवा तसेच नूतन तसेच शाश्वत इंधने उपलब्ध होण्यासंदर्भातील अहवालांचा सध्या सुरु असलेला विस्तार यांची नोंद घेतली. आम्ही 9 आणि 10 जून रोजी ब्रासिलिया येथे भरलेल्या सातव्या ब्रिक्स युवा उर्जा शिखर परिषदेची देखील दखल घेतली आहे.

सर्व देशांचा सामाजिक व आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा व कल्याणासाठी उर्जा सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे, हे आम्ही जाणतो. उर्जा बाजारपेठेचे स्थैर्य सुनिश्चित करून तसेच विविध स्त्रोतांकडून उर्जेचा अखंडित ओघ कायम राखणे, मूल्य साखळ्या बळकट करणे, सीमापार पायाभूत सुविधांसह ऊर्जाविषयक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची लवचिकता आणि संरक्षण सुनिश्चित करणे, या मार्गांनी उर्जा सुरक्षा वाढवण्याची गरज आम्ही अधोरेखित करत आहोत. जगाच्या विशेषतः नव्याने उदयाला येणाऱ्या बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या उर्जाविषयक मिश्रणात जीवाश्म इंधने अजूनही महत्त्वाची भूमिका निभावतात, हे आम्ही मान्य करतो तसेच न्याय्य, सुव्यवस्थित, समतोल आणि समावेशक उर्जा स्थित्यंतराला प्रोत्साहन देण्याची व आमच्या हवामानविषयक ध्येयांचे पालन करुन आणि एसडीजी-7 चे पालन करुन तसेच राष्ट्रीय परिस्थिती, गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तंत्रज्ञान विषयक तटस्थता व सामान्य पण भिन्न जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमता यांच्या तत्वांचे पालन करून जीएचजी उत्सर्जन कमी करण्याची गरज आम्ही मान्य करतो. हवामान बदलाच्या समस्येवर उपाय शोधणे आणि उर्जा स्थित्यंतराला प्रोत्साहन देणे, यातील आंतरसंबंध ओळखून आम्ही युएनएफसीसीसी, त्याचा पॅरिस करार आणि राष्ट्रीय परिस्थिती यांच्या नुसार शाश्वत पद्धतीने आर्थिक विकासाची जोपासना करण्याप्रती आमच्या सामायिक कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.

ऊर्जा स्रोतांमधील संक्रमणादरम्यान वित्तपुरवठा या संकल्पनेचा विचार करतानाच ऊर्जा संक्रमणासाठी निधीची कमतरता भरून काढण्यासाठी वित्तपुरवठ्यात सहकार्य आणि गुंतवणूक वाढवण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो तसेच  पॅरिस करार आणि त्याच्या तत्त्वांनुसार न्याय्य आणि समावेशक ऊर्जा संक्रमणांसाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना पुरेसा, अपेक्षित आणि सुलभ कमी किमतीचा आणि सवलतीच्या दरात वित्तपुरवठा करण्याचे आवाहन करतो. शाश्वत विकासासाठी बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराने आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वांना वित्तपुरवठा होणे आवश्यक आहे यावर आम्ही भर देतो.

शून्य आणि कमी[1]उत्सर्जन ऊर्जा तंत्रज्ञान, ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा साखळींच्या लवचिकतेच्या विकासासाठी महत्त्वाच्या खनिजांची प्रमुख भूमिका आम्ही जाणतो. संसाधन-समृद्ध देशांमध्ये लाभ वाटप, मूल्यवर्धन आणि आर्थिक विविधीकरणाची हमी देण्यासाठी अशा खनिजांच्या विश्वसनीय, जबाबदार, वैविध्यपूर्ण, लवचिक, निष्पक्ष, शाश्वत आणि न्याय्य पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेचे आम्ही समर्थन करतो. तसेच त्यांच्या खनिज संसाधनांवरील सार्वभौम अधिकारांचे पूर्णपणे जतन करतो, तसेच कायदेशीर सार्वजनिक धोरण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वीकारण्याचा, राखण्याचा आणि अंमलबजावणी करण्याचा त्यांचा अधिकार देखील आम्ही मान्य करतो.

शाश्वत भविष्य आणि सर्वांसाठी समान  आणि न्याय्य संक्रमणाच्या दिशेने जागतिक प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी ब्रिक्समधील आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. आम्ही जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापर, अनुवांशिक संसाधनांच्या वापरातून उद्भवणाऱ्या लाभांचे  निष्पक्ष, समान वाटप आणि जैविक विविधतेवरील करार, त्याचे प्रोटोकॉल आणि त्याच्या कुनमिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता चौकटीच्या  प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करतो. आम्ही  विकसनशील देशांना पुरेशी, प्रभावी, अपेक्षित, वेळेवर आणि सुलभ आर्थिक संसाधने उपलब्ध करून देणे सुनिश्चित  करण्याचे आवाहन विकसित देशांना करतो, तसेच जैवविविधतेच्या वापरातून होणाऱ्या लाभांचे  संवर्धन, शाश्वत वापर आणि न्याय्य आणि समान  वाटप करण्यासाठी विकसनशील देशांना क्षमता बांधणी, विकास आणि  तंत्रज्ञान हस्तांतरण सुधारण्याचे आवाहन करतो.

कुनमिंग जैवविविधता निधीची स्थापना आणि चीन सरकारने दिलेल्या योगदानाची आम्ही प्रशंसा  करतो आणि विकसनशील देशांना त्यांच्या जैवविविधता संवर्धनासाठी समर्थन देणे आणि कुनमिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता चौकटीच्या अंमलबजावणीत मोठे योगदान देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका यांची दखल घेतो. कॉप 16 वाटाघाटींमध्ये, विशेषतः संसाधनांची जमवाजमव करण्यात ब्रिक्स देशांच्या सक्रिय भूमिकेची आम्ही दखल घेतो. आम्ही विकसित देशांना विकसनशील देशांना पुरेशी, प्रभावी, अपेक्षित, वेळेवर आणि सुलभ आर्थिक संसाधनांचे वाटप सुनिश्चित करण्याबरोबरच जैवविविधतेच्या वापरातून होणाऱ्या लाभांचे संवर्धन, शाश्वत वापर आणि न्याय्य आणि समान  वाटप करण्यासाठी विकसनशील देशांना क्षमता बांधणी, विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सुधारण्याचे आवाहन करतो. जैवविविधतेचे संवर्धन, जलाशयांचे आणि मातीचे संवर्धन करणे आणि आर्थिक क्षेत्रांसाठी उच्च मूल्याचे लाकूड आणि बिगर लाकूड वन उत्पादने प्रदान करणे, जलविज्ञान चक्रांचे नियमन करणे, तसेच वाळवंटीकरणाचा सामना करणे आणि महत्त्वपूर्ण कार्बन सिंक म्हणून काम करणे यासाठी उष्णकटिबंधीय जंगलांसह सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर आम्ही भर देतो. या आवश्यक उष्णकटिबंधीय परिसंस्थांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि पुनर्संचयित करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या "आमच्या जंगलांसाठी एकजुटता " उपक्रमाचाही  आम्ही उल्लेख करतो.  दुर्मिळ प्रजातींचे जतन करण्यासाठी आपल्या देशांच्या प्रयत्नांचे कौतुक करत असताना आणि बिग कॅटच्या  असुरक्षिततेची दखल घेत, आम्ही आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी तयार करण्याच्या आणि बिग कॅटच्या संवर्धनासाठी एकत्र काम करण्यासाठी ब्रिक्स देशांना प्रोत्साहित करण्याच्या भारताच्या पुढाकाराचा उल्लेख करतो.

बेलेम येथे कॉप 30 मध्ये  उष्णकटिबंधीय वन सार्वकालीन सुविधा सुरू करण्याच्या योजनांचे आम्ही स्वागत करतो आणि उष्णकटिबंधीय वन संवर्धनासाठी दीर्घकालीन, परिणाम-आधारित वित्तपुरवठा जमवण्यासाठी डिझाइन केलेले एक अभिनव तंत्र मानतो.  सुविधेचे भांडवलीकरण आणि वेळेवर कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संभाव्य देणगीदार देशांना महत्त्वाकांक्षी योगदान जाहीर करण्यासाठी प्रोत्साहित केले.

आम्ही पुनरुच्चार करतो की ब्रिक्स देशांकडे वैज्ञानिक संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच शाश्वत वन व्यवस्थापन आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे तसेच वन-संबंधित आव्हाने आणि उद्दिष्टे यशस्वीरित्या हाताळण्याचा  चांगला अनुभव आहे आणि वनीकरण आणि इतर वन-संबंधित समस्यांशी संबंधित अनुभव सामायिक करण्यात आणि संशोधन करण्यात ब्रिक्स सहकार्य वाढविण्यासाठी प्रोत्साहित करतो.

ब्रिक्स पर्यावरणीयदृष्ट्या सुदृढ तंत्रज्ञान मंच (BEST) "BRICS स्वच्छ नद्या" आणि "BRICS शहरी पर्यावरणीय शाश्वततेसाठी भागीदारी" यासह ब्रिक्स पर्यावरणीय मार्गावर विकसित केलेल्या पर्यावरणीय सहकार्यावरील सामंजस्य करार आणि इतर सहकार्य यंत्रणांअंतर्गत पर्यावरणीय सहकार्य वाढविण्याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो. पर्यावरणीय समस्या सोडवण्यात समाजाच्या विविध घटकांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व आम्ही  जाणतो तसेच "ब्रिक्स  युवा पर्यावरणीय नेटवर्क" तयार करण्याची शक्यता शोधण्याचा मानस आहे.

आम्ही नमूद करतो की वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळ, तसेच वाळू आणि धुळीची वादळे, लोकांच्या कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी विशेषतः आदिवासी आणि स्थानिक समुदायांसह असुरक्षित परिस्थितीत असलेल्या लोकांसाठी गंभीर धोके निर्माण करत आहेत. आम्ही विकसित देशांना गंभीर दुष्काळ आणि/किंवा वाळवंटीकरणाचा सामना करणाऱ्या देशांमध्ये  संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरणाविरोधात लढण्यासाठीच्या (UNCCD) कराराची पुरेशी अंमलबजावणी करण्यासाठी वित्तीय  संसाधने वाढवण्याचे आणि शाश्वत विकास उद्दिष्ट  15 अंतर्गत , भूमी-क्षरण  तटस्थता (LDN) चे   प्रमुख लक्ष्य 15.3 साठी विकसनशील देशांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.

प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढून पर्यावरणीय लवचिकता वाढविण्यात ब्रिक्स देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे आम्ही जाणतो. आम्ही सहकार्य आणि सहमती निर्माण करण्याच्या भावनेने आणि तातडीच्या आणि एकतेच्या भावनेने , सागरी पर्यावरणासह प्लास्टिक प्रदूषणावर निष्पक्ष, प्रभावी आणि संतुलित आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधनासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सहभागी होत राहू,  यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सभेच्या ठराव 5/14 नुसार, विकसनशील देशांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन,अंमलबजावणीच्या पर्याप्त  साधनांच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष करणार नाही. आंतरराष्ट्रीय साधन प्रत्येक देशाची  राष्ट्रीय परिस्थिती, क्षमता आणि वचनबद्धता विचारात घेते, तसेच क्षमता निर्माण आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे ठोस प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थांवर, विशेषतः विकसनशील देशांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची खात्री करते.

ब्रिक्सच्या चौकटीत पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासात सहकार्य मजबूत करण्यासाठी, बहुपक्षीयतेचे समर्थन करण्यासाठी आणि जागतिक पर्यावरणीय शासन मजबूत करण्याप्रति आम्ही आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण रोखण्यासाठी केलेले एकतर्फी  उपाय आणि  करारांसह, संबंधित बहुपक्षीय पर्यावरण आणि व्यापार-संबंधित करारांच्या तत्त्वे आणि तरतुदींनुसार डिझाइन, स्वीकार आणि अंमलात आणले पाहिजेत आणि ते मनमानी किंवा अन्याय्य भेदभावाचे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारावर छुपे निर्बंध घालण्याचे साधन बनता कामा  नयेत.

14 मे  2025  रोजी ब्राझिलिया येथे झालेल्या दुसऱ्या ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीच्या निकालांचे आम्ही स्वागत करतो आणि सर्व संबंधितांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि ब्रिक्स देशांच्या वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी वाहतूक संवादाला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाहतूक सहकार्य करताना सर्व सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्यासाठी उत्सुक आहोत. आर्थिक वाढ, कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका ओळखून, शाश्वत आणि लवचिक वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला  आम्ही दुजोरा देतो . शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास आणि अधिक न्यायसंगत , राहण्यायोग्य, निरोगी, अनुकूल आणि कमी गर्दीचे शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी  सक्रिय गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या महत्वावर आम्ही भर देतो. शहरी गतिशीलतेमध्ये शून्य आणि कमी उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आम्ही मान्य करतो.  विमान वाहतूक आणि सागरी वाहतुकीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या संदर्भात ब्रिक्स सदस्यांमध्ये सहकार्याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीतून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत विमान इंधन (SAF), कमी कार्बन विमान इंधन (LCAF) आणि इतर विमान वाहतुकीच्या स्वच्छ उर्जेचे महत्त्व आम्ही नमूद करतो.  स्वच्छ विमान वाहतूक ऊर्जा आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या विकास आणि तैनातीसाठी, त्यांच्या राष्ट्रीय वास्तविकता ध्यानात घेऊन , ब्रिक्स देशांमध्ये तंत्रज्ञान  सहकार्याला आम्ही प्रोत्साहन देतो. आम्ही हवाई आणि सागरी संपर्क  वाढवण्यासाठी आणि सागरी वाहतूक कार्बन -मुक्त करण्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच  लॉजिस्टिक्स एकीकरण  आणि नवोन्मेष  उपक्रमांना बळकटी देण्यासाठी सहकार्यावर देखील भर देतो.

मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी

लोकसंख्येच्या बाबतीत ब्रिक्स सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, कारण लोकसंख्या वयोगटाच्या  रचनेत बदल होत असतो जो  सामाजिक-आर्थिक विकासासाठी , विशेषतः महिला आणि दिव्यांग  व्यक्तींचे हक्क आणि लाभ , युवा विकास, रोजगार आणि कामाचे भविष्य, शहरीकरण, स्थलांतर आणि वृद्धत्व या संदर्भात आव्हाने तसेच संधी निर्माण करतात.

समानता आणि परस्पर आदराच्या तत्त्वांनुसार मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच  सर्व प्रकारच्या भेदभावाशी लढण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करण्याच्या  आवश्यकतेला आम्ही दुजोरा देतो. विकासाच्या अधिकारासह सर्व मानवी हक्कांना निष्पक्ष आणि समान पद्धतीने, समान पातळीवर आणि समान भर देऊन वागवणे सुरू ठेवण्याबाबत  आम्ही सहमत आहोत. या संदर्भात, आम्ही ब्रिक्स मध्ये  आणि बहुपक्षीय मंचांवर समान हिताच्या मुद्द्यांवर सहकार्य मजबूत करण्यास सहमत आहोत, ज्यामध्ये निवड न करता , राजकारणरहित आणि रचनात्मक पद्धतीने आणि दुहेरी मानकांशिवाय, रचनात्मक संवाद आणि सहकार्याने मानवी हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण आणि पूर्तता करण्याची आवश्यकता लक्षात घेतली जाईल. आम्ही लोकशाही आणि मानवी हक्कांचा आदर करण्याचे आवाहन करतो. या संदर्भात, आम्ही अधोरेखित करतो की त्यांची अंमलबजावणी जागतिक प्रशासनाच्या पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी. परस्पर हिताच्या सहकार्यावर आधारित आंतरराष्ट्रीय समुदायासाठी उज्ज्वल सामायिक भविष्य निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वांसाठी लोकशाही, मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याला प्रोत्साहन आणि संरक्षण सुनिश्चित करण्याप्रति  आम्ही आमच्या वचनबद्धतेला दुजोरा देतो.

जगभरातील वंशवाद, वांशिक भेदभाव, परदेशी लोकांबद्दल द्वेष आणि संबंधित असहिष्णुता तसेच धर्म, आस्था  किंवा विश्वासाच्या आधारावरील भेदभाव  आणि त्यांच्या सर्व समकालीन स्वरूपांविरोधातील लढा तीव्र करण्याची गरज असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, ज्यामध्ये  द्वेषपूर्ण भाषण, दिशाभूल करणारी माहिती आणि चुकीची माहिती प्रसारित करणारे धोकादायक कल यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे  आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय दशक  (2025 – 2034) घोषित करण्याचे आम्ही स्वागत करतो. 2025 हे वर्ष "आफ्रिकन आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी न्यायाच्या माध्यमातून भरपाई" चे वर्ष म्हणून घोषित करण्याच्या आफ्रिकन संघाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि वसाहतवाद आणि गुलामांच्या  व्यापाराच्या विनाशकारी वारशाला सामोरे जाण्यासाठी  आफ्रिकन संघाच्या प्रयत्नांची दखल घेतो. बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंचाच्या 30 व्या वर्धापन दिनाच्या संदर्भात आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे हक्क आणि नेतृत्व याना चालना देण्याप्रती  आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. आम्ही महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करतो आणि समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचा पूर्ण, समान आणि अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित करतो, ज्यामध्ये शिक्षण आणि व्यापार सुलभता  आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग समाविष्ट आहे, जो समानता, विकास आणि शांतता साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. आम्ही शाश्वत विकास, हवामान कृती आणि उद्योजकतेमध्ये विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये महिला आणि मुलींच्या भूमिकेवर भर देतो. महिलांप्रति  ऑनलाइन द्वेष आणि चुकीच्या माहितीचा  महिलांवर पडणाऱ्या प्रभावाशी संबंधित ब्राझिलच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चांची आम्ही दखल घेतो आणि महिलांची सुरक्षितता, आवाज आणि लैंगिक  डिजिटल तफावतीसह डिजिटल दरी भरून काढण्यासाठी सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो. किफायतशीर  बालसंगोपनाची सुविधा उपलब्ध करून देणे, STEM क्षेत्रांमध्ये महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून महिलांसाठी कायदेशीर संरक्षण मजबूत करणे यासारख्या धोरणात्मक उपायांद्वारे अर्थव्यवस्थेत महिलांचा पूर्ण आणि समान सहभाग वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

17,जून  2025 रोजी ब्राझीलिया येथे झालेल्या 15 व्या ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या प्रगतीची आणि आरोग्य सहकार्य बळकट करण्याप्रति वचनबद्धतेची आम्ही प्रशंसा करतो. आम्ही ब्रिक्स आरोग्य संस्थांमध्ये घनिष्ठ संबंधांना चालना देण्याचे स्वागत करतो आणि इलेक्ट्रॉनिक संशोधन आणि विकास स्टॉक, ब्रिक्स टीबी रिसर्च नेटवर्कसह ब्रिक्स संशोधन आणि विकास लस केंद्राच्या उपक्रमांना, तसेच आरोग्य प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक आणि प्रभावी वापर आणि मजबूत डेटा प्रशासन सुनिश्चित करण्यासाठीच्या उपक्रमांचे समर्थन करतो. सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती  साध्य करण्याच्या उद्देशाने आणि औषधे, लस आणि निदान यासह आवश्यक आरोग्य वस्तू आणि आरोग्य सेवांची  निष्पक्ष आणि वेळेवर उपलब्धता  सुनिश्चित करण्यासाठी लवचिक, समान  आणि समावेशक आरोग्य प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी या कृतींचे महत्त्व आम्ही पुन्हा अधोरेखित करतो.  आम्ही हे मान्य करतो की टीबी आणि एएमआरचा सामना करण्यासाठी तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग आणि इतर आरोग्य समस्यांना प्रतिबंध करण्याच्या क्षमता मजबूत करण्यासाठी पारंपारिक औषध प्रणालीसह ब्रिक्स सहकार्य, अनुभव सामायिकरण, डिजिटल आरोग्य यासह प्रासंगिक  आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देते. ब्रिक्स देशांच्या उच्च-स्तरीय सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सहकार्यासाठी ब्रिक्स नेटवर्क ऑफ रिसर्च इन पब्लिक हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे हे आम्ही नमूद करतो. ब्रिक्स अणुवैद्यकीय कार्यगट अंतर्गत न्यूक्लियर मेडिसिन आणि रेडिओ फार्मसी क्षेत्रात सहकार्याची गरज आम्ही मान्य करतो. ब्रिक्स वैद्यकीय उत्पादने नियामक प्राधिकरण उपक्रमाद्वारे स्वैच्छिक नियामक समन्वयाला गती देण्याच्या महत्त्वावरही आम्ही भर देतो.

आम्ही सामाजिक कारणांनी उद्भवणाऱ्या रोगांच्या निर्मूलनासाठीच्या भागीदारीच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतो. आम्ही ही भागीदारी सुरू करत आहोत, कारण ती आरोग्य समतेला चालना देण्याच्या आणि जागतिक आरोग्य संरचनेला बळकट करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण टप्पे दर्शवते. एकात्मिक, बहुखंडीय प्रतिसादांना प्राधान्य देऊन, आम्ही आरोग्य विषमतेची मुळे असलेल्या गरिबी, सामाजिक बहिष्करण यांसारख्या कारणांचा सामना करण्याचा प्रयत्न करतो. या माध्यमातून सहकार्य वाढवणे, साधनसामुग्री उपलब्ध करून देणे आणि नवोन्मेषांना प्रोत्साहन देणे — याचा उद्देश सर्वांसाठी आरोग्यपूर्ण भविष्यासाठी मार्ग मोकळा करणे हाच आहे.

आम्ही युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्धता) आणि आरोग्य यंत्रणेच्या लवचिकतेसाठी प्राथमिक आरोग्य सेवांची मूलभूत भूमिका मान्य करतो, तसेच सार्वजनिक आरोग्य संकटांवर प्रतिबंध आणि प्रतिसाद देण्यामध्येही तिचे महत्त्व मानतो. संसर्गजन्य नसलेल्या रोगांच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि मानसिक आरोग्य तसेच कल्याणाच्या संवर्धनावर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या चौथ्या उच्चस्तरीय बैठकीचे यशस्वी आयोजन होण्याची आम्ही अपेक्षा करतो.या बैठकीत या आजारांच्या प्रतिबंध, ओळख आणि उपचारांबाबत महत्त्वाच्या बाबींचा सखोल विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे.

आम्ही ब्रिक्स शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत, तांत्रिक-व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (TVET) सहकार्य आघाडीची सनद (Charter) स्वीकारल्याचे स्वागत करतो. ही सनद, तांत्रिक-व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुधारण्याच्या आमच्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. हे क्षेत्र शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि सामाजिक समावेशन वाढवण्यासाठी एक धोरणात्मक प्राधान्यक्रम म्हणून कायम आहे. यंदा आपली दहावी वर्षपूर्ती साजरी करत असलेल्या, ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी (BRICS-NU) या संस्थेच्या संस्थात्मक बळकटीकरणाबाबत आम्ही समाधान व्यक्त करतो. यामध्ये सहभागी संस्थांची देशनिहाय वाढ, नवीन सदस्य देशांचा सहभाग, तसेच सहकार्याच्या विषयांमध्ये विविधता यांचा समावेश आहे. ब्रिक्स-NU ने आमच्या देशांतील विद्यापीठांमध्ये थेट संवाद घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे आम्ही मान्य करतो आणि पुढील वर्षांत हे परस्पर सहयोग अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. ब्रिक्स विद्यापीठांसाठी सर्वसमावेशक गुणवत्ता मूल्यांकन प्रणाली विकसित करण्याचे आणि या संस्थांमधील शिक्षणाला मान्यता देण्यासाठी उच्च गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्याचे आमचे वचन आम्ही पुन्हा एकदा दृढ करतो.

आम्ही ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या अंतर्गत सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेवरील ब्रिक्स मंचाच्या स्थापनेचे स्वागत करतो. या क्षेत्रांचा वाढता आर्थिक भार आणि एकूण अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, आम्ही ब्रिक्स सदस्य देशांच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन सदस्य देशांना, त्यांच्या सांस्कृतिक संस्था आणि आर्थिक संस्थांना करतो. यामुळे या क्षेत्रांचा विकास होईल आणि सदस्य देशांमधील सांस्कृतिक सहकार्य अधिक बळकट होईल.

आपल्या देशातून पूर्वी चोरी, युद्ध किंवा वसाहतीच्या काळात नेलेली सांस्कृतिक वस्तू किंवा वारसा पुन्हा त्या देशात परत आणणे खूप महत्त्वाचे आहे, असं आम्ही मानतो. अशा वस्तू परत केल्या गेल्या तर देशांमध्ये समानतेवर आधारित आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात.हे शक्य होण्यासाठी एक मजबूत आणि आंतरराष्ट्रीय नियमांची प्रणाली असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया देशांमध्ये सामंजस्य, ऐक्य, न्याय आणि जुने दुखणे विसरून पुढे जाण्यास मदत करू शकते. अशा गोष्टी देशाची ओळख आणि आठवणींना जपायला मदत करतात.

आजच्या जगात शिक्षण, विज्ञान, संस्कृती, माहिती आणि संवाद या गोष्टींमध्ये देशोदेशींचे एकमेकांशी सहकार्य खूप गरजेच आहे, कारण सध्याची आव्हाने खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहेत. युनेस्कोच्या तत्वांनुसार, देशांनी समानता, शांत संवाद आणि एकत्र काम करण्याच्या भावनेतून एकमेकांशी सहकार्य करावं, हे खूप महत्त्वाचे आहे.ब्रिक्स देशांनी एकमेकांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यात सहकार्य करावे, यावरही आम्ही भर देतो. युनेस्कोची परिषद, तसेच जी-20 मधील भारत (नवी दिल्ली) आणि ब्राझील (रिओ) येथील नेत्यांची घोषणापत्रे या गोष्टी दाखवतात की संस्कृती केवळ परंपरा नाही, तर ती देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारी शक्ती आहे. यामधून नवीन कल्पना, सर्जनशीलता, आर्थिक वाढ आणि सर्वसमावेशक विकास घडतो. शिवाय ही संस्कृती सहकार्य, ऐक्य, शांतता आणि आपुलकीची भावना वाढवते.

सगळ्या ब्रिक्स देशांकडे पारंपरिक आणि स्थानिक खेळांची एक समृद्ध परंपरा आहे, हे आम्ही मान्य करतो.आपापसात आणि जगभरात हे खेळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जपण्यासाठी आम्ही एकमेकांना मदत करू, असे ठरवले आहे. आम्ही हेही महत्त्वाचे मानतो की, प्रत्येक देशातील पारंपरिक, स्थानिक आणि ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या खेळांचा विकास करायला हवा, खेळाडूंना ब्रिक्स देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन द्यायला हवे आणि खेळ तसेच शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रातील समान समस्या किंवा मुद्द्यांवर एकत्र चर्चा व्हायला हवी. ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांच्या बैठकीत जे ‘सहकार्य करण्यासाठीचे करारपत्र (MoU)’ मंजूर झाले, त्याचे आम्ही स्वागत करतो आणि त्या करारातील गोष्टी योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी एक मजबूत यंत्रणा  तयार होणे आवश्यक आहे, हेही आम्ही मान्य करतो.

ब्रिक्स देशांनी शाश्वत विकासाच्या आणि माणूस-केंद्रीत रोजगारव्यवस्थेच्या (1)माध्यमातून दर्जेदार, संपूर्ण आणि फलदायी रोजगार वाढवण्यासाठी चांगली प्रगती केली आहे, हे आम्ही कौतुकपूर्वक मान्य करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता कामाच्या स्वरूपात मोठे बदल घडवत आहे, ती नवीन रोजगार संधी निर्माण करते, पण त्याच वेळी जुनी कामे नष्ट होणे, विषमता वाढणे अशी धोकेही निर्माण करते, याची आम्हाला जाणीव आहे .महिला, तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर संवेदनशील गटांवर या डिजिटल बदलांचा विशेष धोका असतो. त्यामुळे तंत्रज्ञान जबाबदारीने वापरणाऱ्या, सर्वसमावेशक धोरणांची आमची बांधिलकी आहे- जेणेकरून AI चा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी होईल. आम्ही देशांतर्गत धोरणे, नियम आणि आंतरराष्ट्रीय करार यांचा आदर करत, लोकांनी डिजिटल कौशल्ये शिकावीत यासाठी आयुष्यभर शिक्षणाच्या संधी वाढवू…कामगारांचे हक्क जपून, सामाजिक सुरक्षाही मजबूत करू  आणि माणसालाच केंद्रस्थानी ठेवणारे विकास धोरण राबवू. हवामान बदलाचा परिणाम, आणि त्यातून अपरिहार्य ठरणारे "न्याय्य संक्रमण" (Just Transition-उद्योग क्षेत्रातील बदल) या संदर्भात सर्व क्षेत्रांमध्ये – अगदी असंघटित क्षेत्रासह ( अनौपचारिक अर्थव्यवस्था) – सन्मानजनक रोजगार निर्माण करण्यासाठी, सामाजिक संवाद (social dialogue) वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारांना सक्रियपणे सहभागी करणे गरजेचे आहे, हे आम्ही मानतो.

आम्ही ब्रिक्स देशांमधील लोकांच्या आपापसातील देवाणघेवाणीचे (people-to-people exchanges) महत्त्व पुन्हा अधोरेखित करतो, कारण त्यातून परस्पर सामंजस्य, मैत्री आणि सहकार्य वृद्धिंगत होते.आम्ही हे मान्य करतो की, अशा देवाणघेवाणी (people-to-people exchanges) आपल्या समाजांना समृद्ध करण्यामध्ये आणि अर्थव्यवस्था विकसित करण्यामध्ये अत्यावश्यक भूमिका बजावतात.ब्राझीलच्या 2025 मधील अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे आम्ही कौतुक करतो, ज्यामध्ये पुढील मंचांचा समावेश होतो —संसदीय मंच (Parliamentary Forum), व्यापार परिषद (Business Council), महिला उद्योजिका आघाडी (Women’s Business Alliance),युवा परिषद (Youth Council)  कामगार संघटना मंच (Trade Union Forum), विचार मंच परिषद (Think Tank Council), शैक्षणिक मंच (Academic Forum), अधिष्ठाता मंच (Deans Forum), नागरी परिषद (Civil Council), लघु आणि मध्यम उद्योग मंच (SME Forum), शहरे आणि नगरपालिका संघटना (Association of Cities and Municipalities), सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (Supreme Audit Institutions), कायदेतज्ञ मंच (Legal Forum), ब्रिक्स सर्वोच्च न्यायालय प्रमुखांची बैठक आणि ब्रिक्स देशांच्या प्रोसिक्यूशन सेवा प्रमुखांची बैठक (Heads of Prosecution Services-सरकारच्या वतीने न्यायालयात गुन्हेगारी खटले चालवणारी यंत्रणा). या सर्व देवाणघेवाणीमुळे (1) ब्रिक्स देशांमधील लोकांमधील संबंध, समज आणि सहकार्य बळकट होत आहे, हे आम्ही मान्य करतो.

आम्ही विविध संस्कृतींचा आदर करण्यासाठी अधिक प्रयत्न होण्याचे आवाहन करतो, तसेच परंपरेचा वारसा, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे महत्त्व आम्ही मान्य करतो. आम्ही ,आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या लोकांच्या आपापसातील एकत्रितपणे जोरदार देवाणघेवाण आणि सहकार्याचे समर्थन करतो आणि "International Day for Dialogue among Civilizations" (नागरी संस्कृतीमधील संवादाचा आंतरराष्ट्रीय दिवस) या शीर्षकाच्या UNGA (संयुक्त राष्ट्र महासभा) ठराव क्रमांक A/RES/78/286  स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो.

आम्ही 3 ते 5 जून 2025 दरम्यान ब्राझीलियामध्ये पार पडलेल्या 11व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करतो, ज्यामध्ये महिला खासदारांची बैठक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी विषयक समित्यांच्या अध्यक्षांची बैठक यांचा समावेश होता. संसदीय मुत्सद्देगिरी आणि आंतरसंसदीय सहकार्य  हे आपल्या सामूहीक प्रयत्नांचे महत्त्वाचे स्तंभ आहेत.परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी,  देशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी,आणि संघर्षांचे शांततेने निराकरण करण्यासाठी मदत करणारे, हे एक अनोखे माध्यम आहे. यामधून समावेशकता , ऐक्यभाव  आणि शाश्वत विकास यांना प्रोत्साहन मिळते.

आम्ही आपल्या देशांतील तरुणाईसाठीच्या सार्वजनिक धोरणांना (youth public policies) अधिक मजबूत करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित करतो. ही धोरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संरचित वित्तपुरवठा, विश्वसनीय आकडेवारी आणि उत्तम पद्धतींचे परस्पर आदानप्रदान यावर आधारित असावीत,असे आम्ही मानतो. आम्ही तरुणाईच्या नेतृत्वाखालील मंच, संवाद आणि कार्यक्रम यांचे विविध सहकार्याच्या क्षेत्रांमधील मोलाचे योगदान मान्य करतो. आम्ही अशा समावेशक युवा रोजगार धोरणांना प्रोत्साहन देऊ, जी शालेय शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा प्रवास सुलभ करतील आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधींमध्ये वाढ करतील. आम्ही ब्रिक्स देशांना आवाहन करतो की त्यांनी तरुणाईला ब्रिक्सच्या कार्यसूचीत सक्रियपणे सहभागी करून घ्यावे, तरुणाईबाबत विश्वासार्ह माहिती तयार करावी आणि ब्रिक्सच्या उपक्रमांमध्ये तरुणाईच्या हितसंबंधांचे प्रतिबिंब दिसून यावे, याची काळजी घ्यावी. या संदर्भात, जून 2025 मध्ये ब्राझीलियामध्ये झालेल्या 11व्या ब्रिक्स युवक परिषदेचे (Youth Summit) आम्ही स्वागत करतो, ज्यात "युवा सहकार्यावरील नवीन सामंजस्य करार" (Memorandum of Understanding on Youth Cooperation) स्वीकारण्यात आला.

परवडणाऱ्या दरातील गृहप्रकल्पांच्या क्षेत्रात ब्रिक्स देशांनी केलेल्या प्रगतीचे आम्ही कौतुक करतो, तसेच विषमतेमध्ये घट करण्यावर लक्ष केंद्रीत करून, सर्व नागरी सेवा समाविष्ट असलेल्या, न्याय्य आणि लवचिक नागरी संक्रमणाला चालना देण्यासाठी, शमन (mitigation-हवामान बदलाचे कारण बनणाऱ्या गोष्टी कमी करणे) आणि जुळवून घेण्याच्या (adaptation) धोरणांत झालेल्या प्रगतीचेही आम्ही स्वागत करतो. 2030 पर्यंतच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची (SDGs) अंमलबजावणी आणि ती स्थानिक स्तरावर पोहोचवण्याच्या  दृष्टीने, ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमने (BRICS Urbanization Forum-ब्रिक्स नागरीकरण मंच) सर्व ब्रिक्स देशांमध्ये सरकार आणि समाज यांच्यातील सहयोग अधिक बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याचे आम्ही विशेष कौतुक करतो.

आम्ही, ब्रिक्स व्यवसाय परिषद (BRICS Business Council - BBC) ने ब्रिक्स 2025 कार्यसूचीमध्ये दिलेल्या धोरणात्मक शिफारसींसाठी कौतुक करतो. विशेषत: यामध्ये, ब्रिक्स देशांमधील अंतर्गत व्यापार (intra-BRICS trade) वाढवण्यासाठी डिजिटलीकरण आणि नियामक सहकार्य (regulatory cooperation) यांना चालना देणे, नवोन्मेषात्मक वित्तीय साधनांचा (innovative financing instruments) विस्तार करणे, मालवाहतूक जोडणी (logistics connectivity) सुधारणे, ब्रिक्स देशांमधील हवाई मार्ग  वाढवणे, ऊर्जा संक्रमणास  पाठबळ देणे, अन्न सुरक्षा आणिशपोषण सुधारण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान  विकसित करणे आणि शाश्वत डिजिटल अर्थव्यवस्थेत सर्वसमावेशक सहभागासाठी आवश्यक कौशल्ये निर्माण करणे, यांचा समावेश आहे.हे सर्व प्रयत्न ब्रिक्स देशांमध्ये आर्थिक सहकार्य, शाश्वत विकास आणि तांत्रिक प्रगतीला चालना देणारे आहेत, हे आम्ही मान्य करतो.या क्षेत्रांमध्ये सरकारी कृतीला गती देण्यासाठी BRICS Business Council (BBC) घेत असलेल्या कृतीप्रधान  उपक्रमांचेही आम्ही तितक्याच आदराने कौतुक करतो…तसेच, BRICS देशांतील व्यापारी क्षेत्रासाठी आयोजित केलेले 'बिझनेस फोरम' आणि नाविन्यपूर्ण उपायांना दिले जाणारे 'सोल्यूशन्स अवॉर्ड्स' हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले, म्हणून त्यांचे यश स्वागतार्ह आहे, असे आम्ही मानतो.

शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महिलांच्या आर्थिक सहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही मान्य करतो,आणि महिला व्यवसाय आघाडीच्या (Women Business Alliance - WBA) धोरणात्मक शिफारसींचे कौतुक करतो, ज्याद्वारे क्रेडिट (कर्ज), शिक्षण आणि आरोग्यसेवा यामधील मूलभूत अडथळे  दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवामान-संवेदनशील (climate-smart) शेती क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाची आम्ही पोचपावती देतो….तसेच शाश्वत आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांना प्रगतीसाठी न्याय्य संधी मिळाव्यात, या गरजेचीही आम्ही जाणीव ठेवतो.महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी महिला व्यवसाय आघाडीने (Women Business Alliance - WBA) घेतलेल्या उपक्रमांचे आम्ही कौतुक करतो. यामध्ये, व्यवसाय प्रोत्साहन बैठका (Business Promotion Meetings), नवंऊद्योग स्पर्धा (Startup Contest) आणि BRICS महिला विकास अहवाल (BRICS Women’s Development Report) यांसारख्या सातत्याने सुरु राहणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.आम्ही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्याकरता अधिकाधिक पाठबळ तसेच अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत. असंघटित अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत महिलांसाठी,डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता वाढवणे, हेही आमचे उद्दिष्ट आहे, यासाठी त्यांचे काम कायदेशीर आणि नोंदणीकृत करणे (formalization) आणि त्यांना विमा, निवृत्तीवेतन, आरोग्य सेवा यांसारखे संरक्षण मिळावे (social protection), यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

आपत्ती जोखीम व्यवस्थापन (Disaster Risk Reduction) क्षेत्रात, अधिक वित्तीय तरतूद  वाढवणे, राज्यकारभार अधिक बळकट करणे,  ऐक्यभाव वाढवणे (solidarity), आणि लवचिकता तसेच पुनर्स्थापन क्षमता निर्माण करणे (resilience building) या बाबींमध्ये आमची कटिबद्धता पुन्हा स्पष्ट करतो.विविध महत्त्वपूर्ण घोषणांद्वारे (key declarations) आणि संयुक्त कार्यदलांच्या (Joint Task Force) स्थापनेद्वारे साध्य झालेल्या, 2015 पासूनच्या सहकार्याच्या प्रगतीचे आम्ही आनंदाने स्वागत करतो. आपत्तींच्या जोखमी दिवसेंदिवस अधिक जटील होत चालल्या आहेत, हे आम्ही मान्य करतो — विशेषतः हवामान बदलाशी संबंधित जोखमी, ग्लोबल साउथ (दक्षिणी  विकसनशील देश) साठी अधिक गंभीर आहेत. जगभरातील पायाभूत सुविधा प्रणाली, अत्यंत तीव्र हवामान घडामोडी आणि आपत्तींमुळे वारंवार गंभीरपणे बाधित होत आहेत, यामुळे आर्थिक अडथळे निर्माण होत असून लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहेत.म्हणूनच, आपत्तीजन्य नुकसान कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा, मानवी जीवन आणि उपजीविका (livelihoods) यांचे संरक्षण करण्यासाठी, आम्ही राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करणाऱ्या प्रणाली (disaster risk reduction systems) आणि क्षमतेत सुधारणा करण्यासाठी परस्पर सहकार्य करू.तसेच, समग्र पायाभूत सुविधा विकासासाठी आवश्यक निधी उभारणे आणि खाजगी गुंतवणूक वाढवणे, हेही आमचे उद्दिष्ट राहील. 2025–2028 कार्ययोजनेला आम्ही मान्यता देतो, जी पुढील गोष्टींवर केंद्रित आहे: असमानता दूर करून असुरक्षितता कमी करणे, भक्कम पूर्व-सूचना यंत्रणा (early warning systems) विकसित करणे, पूर्वतयारी आणिशप्रतिसाद क्षमतेत (anticipatory response) सुधारणा करणे, लवचिक आणि टिकाऊ पायाभूत सुविधा (resilient infrastructure) उभारणे, आणि विविध ज्ञानप्रणालींचे समावेशीकरण (integrating diverse knowledge systems) करणे. योजना आणि उपाययोजनांच्या माध्यमातून, सर्व लोकांना समान प्रतिसाद देणे आणि संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम बनणे हे आमचे ठाम उद्दिष्ट आहे, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगत आहोत. आपत्तींचे धोके ओळखण्यासाठी, आपत्तीपूर्व भाकीत करण्यासाठी आणि त्यांचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणांच्या विकासासंदर्भात सुरू असलेल्या विस्तारित संवादाचे आम्ही समर्थन करतो.

रियो परिषदेमध्ये ब्रिक्स व्यवसाय परिषद, महिला व्यवसाय आघाडी (Women’s Business Alliance), आणि प्रथमच BRICS नागरी परिषद  यांच्या अहवालांचे सादरीकरण झाले, त्याचे आम्ही स्वागत करतो. BRICS देशांची सरकारे आणि नागरी समाज यांच्यातील संवाद अधिक विस्तारावा, याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो.ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली BRICS शेर्पा (Sherpas-विशेष दूत) आणि लोकांमधील परस्पर संवाद  यंत्रणांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाचेही आम्ही स्वागत करतो.

BRICS सदस्यवृद्धी मार्गदर्शक तत्त्वे, निकष, मानके आणि कार्यपद्धती — जी जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथील BRICS शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली — यांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या BRICS विस्तार प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, परस्पर सन्मान आणि सामंजस्य, सार्वभौम समता, ऐक्य, लोकशाही, पारदर्शकता, सर्वसमावेशकता, सहकार्य, सातत्य, परस्पर विचारविनिमय आणि एकमत — या मूल्यांच्या आधारे BRICS समूह अधिक बळकट करण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करतो. रशियातील काझान येथे पार पडलेल्या BRICS शिखर परिषदेत स्वीकारलेल्या "BRICS भागीदार देश" (Partner Country) वर्गीकरणाच्या कार्यपद्धतीनुसार,भागीदार देशांनी BRICS सहकार्यामध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे, यावर आम्ही भर देतो.ब्राझीलच्या अध्यक्षतेखालील विविध मंत्रीस्तरीय आणि तांत्रिक स्तरावरील बैठकींमध्ये या भागीदार देशांचा सहभाग झाला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो.BRICS गटाचे सदस्यत्व वाढत असून, चर्चेची विषयसूची (thematic agenda) अधिक व्यापक होत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यामुळे या बदलांच्या अनुषंगाने BRICS च्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे.या संदर्भात, BRICS च्या कार्यनियमावलीत (Terms of Reference) सुधारणा करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याची आम्ही दखल घेतो आणि हा प्रक्रियात्मक बदल पुढे नेण्याला आम्ही प्रोत्साहन देतो. BRICS गट कार्यक्षम, परिणामकारक, प्रतिसादक्षम, सर्वसमावेशक आणि एकमतावर आधारित राहावा, यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा व्हाव्यात, याला आम्ही पाठिंबा देतो. संस्थात्मक विकास (institutional development) हा एक सतत चालणारी गतिशील प्रक्रिया (dynamic process) आहे. ती समुहाच्या गरजा आणि प्राधान्यक्रम यांचे प्रतिबिंब असावी,अशी आमची पुन्हा एकदा ठाम भूमिका आहे. EMDCs (Emerging Markets and Developing Countries — उदयोन्मुख आणि विकसनशील देश) यांच्याशी ब्रिक्स संवाद आणि भागीदारी अधिक विस्तारली गेल्यास, सर्वांच्या हितासाठी ऐक्यभाव आणि खऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार्याला अधिक बळकटी मिळेल, या आमच्या ठाम विश्वासावर आम्ही भर देतो. तसेच, BRICS संदर्भातील संबंधित दस्तऐवज आणि पार्श्वभूमीविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी, सामायिक BRICS माहिती-संच (database) तयार करण्याची गरज आम्ही मान्य करतो.

2025 मधील ब्राझीलच्या BRICS अध्यक्षपदाचे आम्ही कौतुक करतो आणि रिओ द जिनेरो शहरात सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल, ब्राझील सरकार आणि तेथील जनतेप्रती आभार व्यक्त करतो.

2026 मध्ये भारताच्या BRICS अध्यक्षपदासाठी आणि भारतात होणाऱ्या अठराव्या व BRICS शिखर परिषदेसाठी आम्ही पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो.

 

* * *

JPS/NM/ShilpaN/SonalT/Nandini/Shailesh/Madhuri/Uma/Nilima/Sanjana/Sushama/Ashutosh/DR/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144727)