माहिती आणि प्रसारण मंत्रालय
स्टार्ट-अप ॲक्सलरेटर वेव्हएक्सने केला 'कला सेतू' या देशव्यापी उपक्रमाचा शुभारंभ, भारतातील आघाडीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्ट-अप्सना शासनामध्ये नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचण्यासाठी रिअल-टाइम बहुभाषिक मल्टीमीडिया आशय निर्मिती उपाययोजना सादर करण्यासाठी हा उपक्रम करत आहे आमंत्रित
'कला सेतू' स्टार्ट-अप्ससमोर भारतीय भाषांमधील मजकुरातून मल्टीमीडिया आशय निर्मितीसाठी स्केलेबल एआय साधने तयार करण्याचे ठेवत आहे आव्हान
'कला सेतू' आणि 'भाषा सेतू' बहुभाषिक आशयामध्ये भारताच्या एआय नवोन्मेषाला देणार चालना; यामध्ये सहभागी होण्यासाठी अनुक्रमे 30 जुलै आणि 22 जुलैपर्यंत अर्ज करा
Posted On:
08 JUL 2025 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2025
भारताच्या डिजिटल शासनाचा प्रवास वेगवान होत असताना, नागरिकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत, तात्काळ आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता यापूर्वी कधीही नव्हती इतकी महत्त्वाची झाली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रमाण, वेग आणि विविधता यांच्यासह वेग कायम राखण्यामध्ये आशय निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत आहेत. भारत सरकारच्या सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-आधारित संपर्क आणि संवाद घडवण्याच्या वचनबद्धतेनुसार, भाषिक दरी कमी करण्यासाठी आणि देशभरात शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी एआय-आधारित उपाययोजना स्वीकारण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.
कला सेतूः भारतासाठी रियल टाईम भाषा तंत्रज्ञान
भारतामध्ये सर्वसमावेशक संपर्क आणि संवादासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग करण्याच्या धोरणात्मक प्रयत्नाचा एक भाग म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या वेव्हएक्स स्टार्ट-अप ॲक्सलरेटर मंचाद्वारे "कला सेतू - रिअल-टाइम लँग्वेज टेक फॉर भारत" या स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा देशव्यापी उपक्रम भारतातील आघाडीच्या एआय स्टार्ट-अप्सना विविध भारतीय भाषांच्या पाठबळाने मजकूर-आधारित माहितीवरून ऑडिओ, व्हिडिओ आणि ग्राफिक्स आशयाची स्वयंचलित निर्मिती करण्यासाठी स्वदेशी आणि स्केलेबल उपाययोजना विकसित करण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही स्पर्धा एआय-आधारित आशय निर्मितीच्या तीन मुख्य क्षेत्रांना पाठबळ देणाऱ्या स्केलेबल उपायांवर लक्ष केंद्रित करते. पहिला, टेक्स्ट-टू-व्हिडिओ निर्मिती, जे मजकूरातून व्हिडिओ सामग्रीची स्वयंचलित निर्मिती करण्यास अनुमती देते. यात वेगवेगळ्या संवादांच्या गरजांनुसार वातावरण, टोन आणि विषय सानुकूलित करण्याची क्षमता असेल. दुसरा, टेक्स्ट-टू-ग्राफिक्स निर्मिती, जो डेटा-आधारित इन्फोग्राफिक्स आणि सचित्र व्हिज्युअल तयार करण्याची सुविधा देतो, ज्यामुळे क्लिष्ट माहिती समजणे सोपे होते आणि ती अधिक आकर्षक दिसते.
तिसरा, टेक्स्ट-टू-ऑडिओ निर्मिती, जो प्रगत व्हॉईस सिंथेसिसचा वापर करून भाषण तयार करतो. हे भाषण केवळ अचूक नसते तर ते भावनिकदृष्ट्या अभिव्यक्त करणारे आणि प्रादेशिक उच्चारांच्या बाबतीत संवेदनशील असते, ज्यामुळे बहुभाषिक आशयामध्ये प्रासंगिकता आणि परिणामकारकतेत वाढ होते.
नागरिक-केंद्रित अनुप्रयोग
सार्वजनिक संप्रेषण संस्थांना अधिकृत माहितीचे वास्तविक वेळेत प्रादेशिक प्रतिध्वनीत प्रारूपात उदा. इन्फोग्राफिक व्हिज्युअल्स, संदर्भित व्हिडिओ एक्सप्लेनर आणि ऑडिओ न्यूज कॅप्सूलमध्ये गतिशीलतेने रूपांतर करण्यास सक्षम करून डिजिटल भाषेतील दरी सांधणे हा कला सेतूचा उद्देश आहे. हवामान संबंधी सूचना जाणू इच्छिणारा शेतकरी असो, परीक्षेसंदर्भात ताजी माहिती घेणारा विद्यार्थी असो किंवा आरोग्यसेवा योजनांबद्दल जाणून घेणारा ज्येष्ठ नागरिक असो, हा उपक्रम अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो जी केवळ संदर्भानुसार संबंधित नाही तर त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये देखील उपलब्ध असेल.
अर्ज कसा करावा
स्टार्टअप्स "कला सेतू" आव्हान श्रेणी अंतर्गत https://wavex.wavesbazaar.com या WAVEX पोर्टलद्वारे आव्हानासाठी नोंदणी आणि अर्ज करू शकतात. उत्पादनाचा व्हिडिओ डेमो दाखवून 30 जुलै 2025 पर्यंत कार्यरत किमान व्यवहार्य संकल्पना स्टार्टअप्सना सादर करावी लागेल. अंतिम निवड झालेल्या संघांना नवी दिल्लीत राष्ट्रीय परीक्षक मंडळासमोर त्यांचे उपाय सादर करावे लागतील, ज्यामध्ये विजेत्याला व्यापक प्रमाणात विकास, आकाशवाणी, दूरदर्शन आणि पीआयबीकडून प्रायोगिक सहाय्य आणि वेव्हेक्स इनोव्हेशन प्लॅटफॉर्म अंतर्गत इन्क्युबेशनसाठी सामंजस्य करार मिळेल. आव्हानांसाठी तांत्रिक आवश्यकता आणि इतर तपशील वेव्हएक्स पोर्टलवर मिळू शकतात.
भाषा सेतू आव्हान
‘भाषा सेतू’ वास्तविक वेळेत भाषा अनुवाद आव्हान वेव्हएक्स अंतर्गत 30 जून 2025 रोजी सुरू करण्यात आले. स्टार्टअप्स अजूनही 22 जुलै 2025 पर्यंत भाषा सेतू आव्हान श्रेणी अंतर्गत वेव्हएक्स पोर्टलद्वारे ‘भाषा सेतू’ साठी अर्ज करू शकतात.
हे उपक्रम समावेशक आणि प्रभावी प्रशासनासाठी एआय-संचालित उपायांना चालना देण्याप्रति भारत सरकारची दृढ वचनबद्धता अधोरेखित करतात. बहुभाषिक सामग्री निर्मिती आणि वास्तविक वेळेत भाषा अनुवाद यामधील स्वदेशी नवोन्मेषाना प्रोत्साहन देऊन, संवादातील तफावत भरून काढण्याचे आणि प्रत्येक भारतीय भाषेत शेवटच्या व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे
कला सेतू आणि भाषा सेतू हे भविष्यासाठी सज्ज डिजिटल परिसंस्था तयार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे ज्यातून राष्ट्राची भाषिक आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते, तसेच एक चैतन्यशील स्टार्टअप नवोन्मेष व्यवस्थेला चालना देते.
वेव्हएक्स बद्दल
वेव्हएक्स हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज उपक्रमांतर्गत सुरू केलेले समर्पित स्टार्टअप अॅक्सिलरेटर प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश माध्यमे, मनोरंजन आणि भाषा तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेषाना प्रोत्साहन देणे हा आहे. मे 2025 मध्ये मुंबईत झालेल्या वेव्हज शिखर परिषदेत वेव्हएक्सने 30 हून अधिक उदयोन्मुख स्टार्टअप्सना कल्पना मांडण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे सरकारी संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योग धुरिणांशी थेट संबंध शक्य झाला. वेव्हएक्स लक्ष्यित हॅकेथॉन, इनक्युबेशन, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय प्लॅटफॉर्मबरोबर एकत्रीकरण याद्वारे यशस्वी कल्पनांना समर्थन देत आहे.
* * *
N.Chitale/Shailesh/Sushma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143126)
Read this release in:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam