गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'संविधान हत्या दिना'निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 'द इमर्जन्सी डायरीज - इयर्स दॅट फोर्ज्ड अ लीडर' हे पुस्तक केले प्रकाशित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीविरोधी चळवळीतील अनुभवांचे संकलन असलेले हे पुस्तक
Posted On:
25 JUN 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज 'संविधान हत्या दिना'निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 'द इमर्जन्सी डायरीज - इयर्स दॅट फोर्ज्ड अ लीडर' या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या पुस्तकात नरेंद्र मोदी यांचे एक तरुण संघ प्रचारक म्हणून आणीबाणीच्या काळात केलेले कार्य, जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील 19 महिने चाललेल्या चळवळीदरम्यान त्यांनी भूमिगत राहून कसा लढा दिला याचा उल्लेख आहे. पुस्तकात त्यांनी मिसा म्हणजेच अंतर्गत सुरक्षा देखभाल (MISA) कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेल्या कुटुंबीयांना मदत करणे, त्यांच्या उपचारांची व्यवस्था करणे याचाही तपशील या पुस्तकात आहे. या काळात नरेंद्र मोदी यांनी गुप्तपणे प्रकाशित होणाऱ्या अनेक वर्तमानपत्रांचे बाजारपेठेत, चौकात, विद्यार्थी आणि महिलांच्या गटांमध्ये केलेले वाटप, याचीही माहिती या पुस्तकात आहे. गुजरातमधील 25 वर्षांच्या तरुणाच्या रूपात त्यांनी या संघर्षाचे नेतृत्व केले याचे वर्णनही पुस्तकात आहे. कधी संत म्हणून, कधी सरदारजी म्हणून, कधी हिप्पी म्हणून, कधी अगरबत्ती विक्रेता म्हणून तर कधी वृत्तपत्र विक्रेता म्हणून मोदी त्यावेळी भूमिगत राहून काम करायचे, हे देखील पुस्तकात नमूद असल्याचे शाह यांनी सांगितले.
तत्कालीन पंतप्रधानांच्या हुकूमशाही विचारांना याच 25 वर्षांच्या तरुणाने विरोध दर्शवला होता, असे शाह म्हणाले. घराणेशाहीचे राजकारण पुन्हा सुरू करण्यासाठीच आणीबाणी लादण्यात आली होती, परंतु नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून घराणेशाही उखडून टाकण्यासाठी गावोगावी, शहरोशहरी अनेकांच्या दारी जाऊन या विचारांना विरोध दर्शवला आणि अखेर 2014 मध्ये त्यांनी संपूर्ण देशातून घराणेशाहीचे राजकारण उखडून टाकले. या पुस्तकात माध्यमांवर नियंत्रण (मीडिया सेन्सॉरशिप), सरकारी दडपशाही, संघ आणि जनसंघाचा संघर्ष, आणीबाणीतील बळींचे वर्णन आणि हुकूमशाहीपासून ते लोकसहभागापर्यंतचा प्रवास अशी पाच प्रकरणे आहेत.
गृहमंत्र्यांनी देशातील तरुणांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले. जेणेकरून या तरुणांना कळेल की त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच्या काळात हुकूमशाहीविरुद्ध लढणारा हाच तरुण या देशात लोकशाहीची मुळे मजबूत करत आहे आणि ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे शाह म्हणाले.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139735)