पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील तरुणांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे, आमची युवा शक्ती गतिमानता, नवोन्मेष आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे: पंतप्रधान


नवीन शिक्षण धोरण आणि कौशल्य विकास आणि स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्याने, आपले तरुण 'विकसित भारत' या संकल्पात महत्त्वाचे भागीदार बनले आहेत: पंतप्रधान

आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्व शक्य संधी देऊ, ते विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत: पंतप्रधान

Posted On: 06 JUN 2025 10:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली. "गेल्या 11  वर्षांत, आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या आहेत ज्यामध्ये आपल्या युवकांनी अकल्पनीय कामगिरी केली आहे," असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 11  वर्षात युवा सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबवलेल्या सरकारी धोरणांचा परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केला. तरुणांना सक्षम करणे ही राष्ट्र करू शकणारी सर्वात शक्तिशाली गोष्ट  असून  स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020  सारखे सरकारी उपक्रम या दृढ विश्वासावर आधारित आहेत  असे   मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 11  वर्षात सरकारने तरुणांना सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. नवीन शिक्षण धोरण, कौशल्य विकास आणि स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्याने, तरुण 'विकसित भारत' या संकल्पात महत्त्वाचे भागीदार बनले आहेत.
 मोदी यांनी सांगितले की सरकार नेहमीच युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी सर्व शक्य त्या संधी देऊ करेल.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"भारताच्या तरुणांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. आमची युवा शक्ती गतिमानता, नवोन्मेष आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. आमच्या तरुणांनी अतुलनीय ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भारताच्या विकासाला चालना दिली आहे."
गेल्या 11 वर्षांत, स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा, संस्कृती आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये अकल्पनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांची उल्लेखनीय उदाहरणे आपण पाहिली आहेत.
गेल्या 11 वर्षांत युवा सक्षमीकरणाच्या उद्देशाने धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये निर्णायक बदल झाले आहेत. तरुणांना सक्षम करणे ही राष्ट्र करू शकणारी सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे या दृढ विश्वासावर स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सारखे सरकारी उपक्रम आधारित आहेत.
मला विश्वास आहे की आपले तरुण विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देत राहतील. 
#11YearsOfYuvaShakti"

"गेल्या 11  वर्षात, आमच्या सरकारने युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. नवीन शिक्षण धोरण, कौशल्य विकास आणि स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित केल्याने, आमचे तरुण 'विकसित भारत' च्या संकल्पात महत्त्वाचे भागीदार बनले आहेत. आज देशातील तरुण राष्ट्र उभारणीत आघाडीची भूमिका बजावत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
#11YearsOfYuvaShakti"
"आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्व शक्य त्या संधी देऊ! आपले युवक विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत. #11YearsOfYuvaShakti"

***

SonalT/HemangiK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2134470)