पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्लीत स्वच्छ तसेच हरित शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस हिरवा झेंडा दाखवून केल्या रवाना
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2025 3:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
शाश्वत विकास आणि स्वच्छ शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक)बसेसना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
हा उपक्रम स्वच्छ तसेच हरित दिल्ली शहराच्या उभारणीत योगदान देईल. ह्या उपक्रमामुळे दिल्लीतील जनतेसाठी ‘जीवन सुलभते’त देखील वाढ होईल असे त्यांनी नमूद केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“स्वच्छ तसेच हरित दिल्लीची उभारणी!
शाश्वत विकास आणि स्वच्छ शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बसेसना झेंडा दाखवून रवाना केले. त्यासोबतच हा उपक्रम दिल्लीतील जनतेच्या ‘जीवन सुलभते’त देखील सुधारणा करेल.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2134144)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam