पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी जिनिव्हा येथे झालेल्या 8 व्या जागतिक आपत्ती जोखीम कमी करण्याच्या व्यासपीठावर जागतिक आपत्ती लवचिकता प्रयत्नांसाठी भारताच्या वचनबद्धतेची केली पुष्टी

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2025 9:06AM by PIB Mumbai

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी काल (03 जून 2025) जिनिव्हा येथे झालेल्या 8 व्या जागतिक आपत्ती जोखीम कमी करण्याबाबतच्या व्यासपीठाच्या बैठकीत जागतिक आपत्ती लवचिकता प्रयत्नांसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट्रीय विकास उपमंत्री स्टाइन रेनेट हाहेम यांच्याशी फलदायी चर्चा केली आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.


डॉ. मिश्रा यांनी व्यासपीठाच्या उद्घाटन समारंभातही सहभाग नोंदवला, त्यांनी आपत्ती सज्जता आणि लवचिकता निर्माण करण्याबाबतच्या भारताच्या सक्रिय दृष्टिकोनावर प्रकाश टाकला, सुरक्षित आणि अधिक लवचिक भविष्यासाठी भागीदारी मजबूत करण्याची भारताची समर्पित भावना दृढ केली.

***

SonalT/NandiniM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2133715) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam