पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती बैठकीचे झाले आयोजन
पंतप्रधानांनी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा
प्रलंबित प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यावर पंतप्रधानांचा भर; कार्यक्षमता आणि जबाबदारीला प्राधान्य देण्याचे केले आवाहन
राज्य सरकारांनी रेरा अंतर्गत सर्व पात्र रिअल इस्टेट प्रकल्पांची नोंदणी अनिवार्य करावी - पंतप्रधानांनी केले आवाहन
घर खरेदीदारांना न्याय आणि निष्पक्षता मिळेल याची खात्री करण्यासाठी तक्रारींचे निवारण गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर निवारण करण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
पंतप्रधानांनी भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्थेशी संबंधित सर्वोत्तम पद्धतींचे केले परीक्षण
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2025 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती संदर्भातील बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या सक्रिय प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.
पंतप्रधानांनी या बैठकीत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या रस्ते वाहतूक, वीज आणि जलसंपदा या क्षेत्रांमधील 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. या प्रकल्पांच्या धोरणात्मक महत्त्वावर भर देत अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांची वेळेवर पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
प्रकल्प विलंबाच्या प्रतिकूल परिणामांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की अशा अडचणींमुळे केवळ खर्चच वाढतो असे नाही तर नागरिक आवश्यक सेवा आणि पायाभूत सुविधांपासून वंचित राहतात. जास्तीत जास्त सामाजिक-आर्थिक परिणाम साध्य करण्यासाठी वेळेवर काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर भर देऊन सर्व हितसंबंधींनी कार्यक्षमता आणि जबाबदारीला प्राधान्य द्यावे , असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (RERA) शी संबंधित सार्वजनिक तक्रारींच्या पुनरावलोकनादरम्यान, पंतप्रधानांनी घर खरेदीदारांना मिळणारा न्याय आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तक्रारींचे निराकरण गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर सुधारणा करण्याची गरज यावर भर दिला. राज्य सरकारांनी रेरा (RERA) कायद्यांतर्गत सर्व पात्र रिअल इस्टेट प्रकल्पांची अनिवार्य नोंदणी सुनिश्चित करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. गृहनिर्माण बाजारपेठेतील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी रेरा (RERA) तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
भारतात सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या विकासाशी संबंधित उल्लेखनीय सर्वोत्तम पद्धतींचे परीक्षण केले.असे उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक मॉडेल म्हणून काम करू शकतात तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यापक स्वीकृतीला प्रेरणा देऊ शकतात, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशन मजबूत होईल, असेही ते म्हणाले.
आज झालेल्या प्रगती बैठकीपर्यंत, सुमारे 20.64 लाख कोटी रुपये खर्चाच्या 373 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2132207)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada