संसदीय कामकाज मंत्रालय
दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा ठाम संदेश जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांची नियुक्ती
Posted On:
17 MAY 2025 9:19AM by PIB Mumbai
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर, सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यांसह काही महत्त्वाच्या भागीदार देशांना भेट देणार आहेत.
या शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारताचा दहशतवादाविरुद्धचा राष्ट्रीय एकमत आणि ठाम दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यात येईल. दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती शून्य सहिष्णुतेचा भारताचा स्पष्ट संदेश हे शिष्टमंडळ जागतिक स्तरावर पोहोचवतील.
प्रत्येक शिष्टमंडळात विविध पक्षांचे खासदार, महत्त्वाचे राजकीय नेते आणि नामांकित राजनयिक सहभागी असतील.
या सात शिष्टमंडळांचे नेतृत्व पुढील खासदारांकडे असेल:
1. शशी थरूर, कॉंग्रेस
2. रविशंकर प्रसाद, भाजप
3. संजय कुमार झा, जदयू
4. बैजयंत पांडा, भाजप
5.कनिमोळी करुणानिधी, द्रमुक
6. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
7. श्रीकांत एकनाथ शिंदे,शिवसेना
***
JPS/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129281)
Read this release in:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam