पंतप्रधान कार्यालय
मत्स्योद्योग क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या मार्गांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
Posted On:
15 MAY 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 0225
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या मार्गांसंदर्भातल्या एक बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले."आम्ही या क्षेत्राला खूप महत्त्व देतो आणि या क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि मच्छिमारांसाठी कर्ज तसेच बाजारपेठेची अधिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी व्यापकपणे काम करत आहोत",असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे ;
"मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या मार्गांवर एक बैठक घेतली. आम्ही या क्षेत्राला खूप महत्त्व देतो आणि या क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि आमच्या मच्छिमारांसाठी कर्ज तसेच बाजारपेठांची अधिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी व्यापकपणे काम करत आहोत. आजच्या बैठकीत निर्यात सुधारण्यावर आणि खोल समुद्रातील मासेमारीवर केंद्रित असलेले लक्ष वाढविण्यावर विचारमंथन झाले.”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128959)