महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन


नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे

अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन नामांकन सादर करावे

Posted On: 03 MAY 2025 12:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2025

 

देशभरातील अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते. वर्ष 2025 मधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे. नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. सर्व नामांकने https://awards.gov.in या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन सादर करावीत.

वयवर्षे 5 ते 18 वयोगटातील मुले या पुरस्कारासाठी (31 जुलै 2025 पर्यंत) अर्ज करू शकतात. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अपवादात्मक कामगिरी असलेल्या मुलांना नामांकित करू शकते. तसेच मुले स्वतःचे नामांकन करून देखील अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी, अर्जदारांना प्रथम स्वतःचे नाव, आडनाव, जन्मतारीख, अर्जदाराचा प्रकार (व्यक्ती/संस्था), मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आधार क्रमांक इत्यादी तपशील आणि ‘कॅप्चा’  पडताळणी देऊन पोर्टलवर नोंदणी किंवा लॉग इन करावे लागेल. नोंदणी केल्यानंतर,  चालू नामांकन विभागांतर्गत “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025” हा रकाना निवडावा आणि “नामांकन करा/आता अर्ज करा” वर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदारांनी संबंधित पुरस्कार श्रेणी निवडावी आणि नामांकन स्वतःसाठी आहे की इतरांसाठी आहे हे सूचित करावे.

नामांकनाच्या अर्जात नामनिर्देशित व्यक्तीची माहिती, त्यांनी केलेली कामगिरी आणि त्या कामगिरीचा प्रभाव यांचे वर्णन करणारे एक संक्षिप्त निवेदन (जास्तीत जास्त 500 शब्द), इतर आवश्यक  कागदपत्रे अपलोड करावीत (पीडीएफ फॉरमॅट, 10 अटॅचमेंट्स) आणि अलीकडील छायाचित्र (jpg/jpeg/png फॉरमॅटमध्ये) आवश्यक आहे. अर्जाचे मसुदे जतन केले जाऊ शकतात आणि अंतिम क्षणी सादर करण्यापूर्वी त्यात बदल केले जाऊ शकतात. एकदा पुनरावलोकन आणि सादर केल्यानंतर, अर्जाची डाउनलोड करण्यायोग्य प्रत संदर्भासाठी उपलब्ध असेल.

शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या 18 वर्षांखालील (31 जुलै 2025 पर्यंत) मुलांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) देवून गौरव केला जातो.

भारतातील युवावर्गाने विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देणे आणि देशातल्या इतर युवकांना वास्तविक जीवनातील आदर्श दाखवून प्रेरणा देणे तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहितीसाठी आणि नामांकनासाठी, कृपया https://awards.gov.in ला भेट द्या.

* * *

S.Bedekar/B.Sontakke/D.Rane


(Release ID: 2126420)