माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लिगल करंट्स : अ रेगुलँरिटी हँण्डबुक आँन इंडिया'ज मिडिया अँण्ड एन्टरटेन्मेन्ट सेक्टर 2025 उद्या प्रकाशित होणार
Posted On:
02 MAY 2025 4:15PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
वेव्हज 2025 (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद) - हे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचे वळण असून, या परिषदेदरम्यान Legal Currents: A Regulatory Handbook on India’s Media & Entertainment Sector 2025 अर्थात "कायदेविषयक घडामोडी : भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीची नियामक पुस्तिका 2025" या महत्त्वाच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन उद्या होणार आहे. वेव्हज-2025 या शिखर परिषदेअंतर्गत ज्ञान आणि माहितीविषयक भागीदारांपैकी एक असलेल्या खेतान अँड कंपनीने ही अहवाल पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेतून भारताच्या बहुआयामी माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या वाढत्या क्षमतेला आकार देणाऱ्या तसेच या क्षेत्राला चालना देणाऱ्या नियामक संरचनांची रूपरेषा मांडली आहे.
भारताचे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व बदलातून जात आहे. नेमक्या या महत्वाच्या काळातच ही कायदेविषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली जात आहे. या पुस्तिकेत मांडलेल्या नियामक आराखड्यामुळे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्राशी संबंधितांना प्रसारण तसेच माहिती आधारित मनोरंजन, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि चित्रपट यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करता आला आहे. अलिकडच्या काळात भारतात इंटरनेटच्या सुलभ उपलब्धतेत झपाट्याने वाढ झाली आहे, तसेच भारतातील आशय सामग्रीच्या वापराचे स्वरुपही बदलले असून, सध्या भारत एका सक्रिय आणि स्वीकारार्ह प्रशासनाच्यावतीने सुरू केलेल्या गेलेल्या एका डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. याअंतर्गत सरकारने आजही देशात मोठा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवलेल्या मुद्रित तसेच दूरचित्रवाणी आणि नभोवाणी सारख्या माध्यमांकरता नियामक प्रक्रिया सुलभ आणि अनुकूल केल्या आहेत.
मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये या क्षेत्राशीसंबंधित परदेशातील व्यक्ति आणि व्यावसायिकांसाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणे, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या स्थापित करणे आणि आपल्या प्रकल्पांचे कार्यान्वयन करणे या प्रक्रिया सुलभ करण्यासह त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या प्रमुख उपक्रमांचा तसेच कायदेविषयक महत्वाच्या तरतुदींविषयींचा तपशील दिलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने निर्मिती तसेच सह-निर्मितीसाठी प्रोत्साहनपर लाभ मिळवून देणाऱ्या योजनाही राबवल्या जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत आशय सामग्री निर्मितीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
जाहिरात, ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल मीडिया यासारख्या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित उद्योग व्यावसायिक संस्था आणि सरकारमध्ये परस्पर सहकार्यपूर्ण भागिदाऱ्याही प्रस्थापित झाल्या आहेत. यामुळे या उद्योग क्षेत्राशी संबंधित भागधारकांना आपल्या प्रकल्पांच्या कार्यान्वयासाठी लवचिकता प्राप्त झाली असून, त्यांच्याद्वारे नियमांच्या अनुपालनाचीही सुनिश्चिती होऊ शकली आहे.
आज भारत आशय निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिकाधिक भक्कम करू लागला आहे, अशावेळी आजच्या बहुआयामी, तंत्रज्ञानाधारित माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भागधारकांसाठी एक महत्त्वाचे संसाधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन केले जात आहे.
* * *
PIB Mumbai | NM/T.Pawar/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126162)
| Visitor Counter:
20
Read this release in:
Kannada
,
English
,
Nepali
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Telugu