आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
वर्ष 2025-26 च्या साखर हंगामासाठी साखर कारखान्यांद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव
5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि शेती संबंधित सहाय्यक काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ
Posted On:
30 APR 2025 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2025
उस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 (ऑक्टोबर - सप्टेंबर) साखर हंगामासाठी उसाचे रास्त आणि किफायतशीर मूल्य (एफआरपी) 10.25% च्या मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी 355 रुपये प्रति क्विंटल दराने मंजूर केले आहे. यामध्ये 10.25% पेक्षा जास्त वसुलीत प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.46 रुपये प्रति क्विंटल प्रीमियम आणि वसुलीत प्रत्येक 0.1% घटीसाठी एफआरपी मध्ये 3.46 रुपये प्रति क्विंटल दराने कपात करण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% पेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना 2025-26 च्या आगामी साखर हंगामात उसासाठी 329.05 रुपये प्रति क्विंटल मिळतील.
2025-26 च्या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च (ए2 +एफएल) 173 रुपये प्रति क्विंटल आहे. 10.25% च्या पुनर्प्राप्ती दराने 355 रुपये प्रति क्विंटल एफआरपी हा उत्पादन खर्चापेक्षा 105.2% अधिक आहे. 2025-26 च्या साखर हंगामासाठीचा एफआरपी चालू साखर हंगाम 2024-25 पेक्षा 4.41% जास्त आहे.
मंजूर केलेला एफआरपी 2025-26 च्या साखर हंगामात (1ऑक्टोबर , 2025 पासून सुरु ) साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागू असेल. साखर क्षेत्र हे एक महत्त्वाचे कृषी-आधारित क्षेत्र आहे ज्याचा प्रभाव सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले तसेच शेतमजूर आणि वाहतूक यासारख्या विविध सहाय्यक कामांमध्ये काम करणाऱ्यांव्यतिरिक्त साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सुमारे 5 लाख कामगारांच्या उपजीविकेवर पडतो.

पार्श्वभूमी:
कृषी व्यय आणि मूल्य आयोगाच्या शिफारशींच्या आधारे आणि राज्य सरकारे आणि इतर हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर एफआरपी निश्चित करण्यात आला आहे.
मागील साखर हंगाम 2023-24 मध्ये, 28.04.2025 पर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या 1,11,782 कोटी रुपयांपैकी सुमारे 1,11,703 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत; अशा प्रकारे, 99.92% ऊस थकबाकी देऊन झाली आहे. चालू साखर हंगाम 2024-25, मध्ये, 28.04.2025 पर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या 97,270 कोटी रुपयांपैकी सुमारे 85,094 कोटी रुपये अदा करण्यात आली असून उसाची 87% थकबाकी देऊन झाली आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125543)
Visitor Counter : 20
Read this release in:
Assamese
,
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia