माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025: माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानासाठी सर्वश्रेष्ठ जागतिक प्रदर्शन
Posted On:
28 APR 2025 7:10PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 28 एप्रिल 2025
मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे 1ते 4 मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्हज 2025 चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने जगभरातील माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे नवोन्मेषक एकत्र येणार आहेत. 15,000 चौरस मीटर परिसरात होणारी वेव्हज 2025 परिषद हे उद्योग क्षेत्रातील दिग्गज, निर्माते, गुंतवणूकदार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रवर्तकांना एकत्र येण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि जागतिक मनोरंजनाच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट व्यासपीठ म्हणून काम करेल. नेटफ्लिक्स, अमेझॉन, गुगल, मेटा, सोनी, रिलायन्स, अॅडोब, टाटा, बालाजी टेलिफिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन्स, सारेगामा आणि यश राज फिल्म्ससह 100 हून अधिक आघाडीचे प्रदर्शक तसेच जेटसिंथेसिस, डिजिटल रेडिओ मोंडियल (डीआरएम), फ्री स्ट्रीम टेक्नॉलॉजीज, न्यूरल गॅरेज आणि फ्रॅक्टल पिक्चर सारख्या पुढील पिढीतील नवोन्मेषकांना मनोरंजन क्षेत्रातील नवोन्मेष, सर्जनशीलता आणि सीमापार सहकार्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी वेव्हज हा सर्वोत्तम मंच असेल.
या विशेष शिखर परिषदेच्या केंद्रस्थानी भारत पॅव्हेलियन आहे, जे भव्य 1,470 चौरस मीटर क्षेत्रात उभारले आहे, जे "कला टू कोड" या संकल्पनेअंतर्गत अंतर्गत भारताच्या गतिमान वारशाचा उत्सव साजरा करते. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना श्रुती, कृती, दृष्टी आणि क्रिएटर्स लीप या चार अनुभवात्मक क्षेत्रांमध्ये - प्राचीन मौखिक परंपरा आणि दृश्य कलांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रगतीपर्यंत - भारतीय कथाकथनाच्या उत्क्रांतीच्या माध्यमातून एक गुंग करणारा प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
भारत पॅव्हेलियन व्यतिरिक्त, वेव्हज 2025 मध्ये राज्यांचे खास पॅव्हेलियन असतील, ज्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्ये अभिमानाने त्यांच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील सामर्थ्याचे दर्शन घडवतील.
त्याचबरोबर , एमएसएमई पॅव्हेलियन आणि स्टार्ट-अप बूथ हे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख व्यवसाय आणि नवोन्मेषकांना जागतिक मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग धुरीण , गुंतवणूकदार आणि प्रमुख हितधारकांशी संपर्क साधण्याची अतुलनीय संधी प्रदान करतील.
गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स उद्योगांची वेगवान वाढ अधोरेखित करणारा विस्तृत गेमिंग अरेना हे वेव्हज 2025 मधील एक प्रमुख आकर्षण असेल. यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि एक्सबॉक्स, ड्रीम11, क्राफ्टन, नझारा, एमपीएल आणि जिओगेम्स सारखे प्रमुख ब्रँड्स असणार आहेत. हे अरेना भविष्यातील परस्परसंवादी मनोरंजनाची झलक दाखवेल तसेच जागतिक डिजिटल परिसंस्थेत गेमिंगचा वाढता प्रभाव प्रदर्शित करेल.
1ते 4 मे 2025 दरम्यान उद्योग आणि व्यवसायांसाठी तर 3 आणि 4 मे 2025 रोजी जनतेसाठी खुले असणारे वेव्हज 2025 मनोरंजन, माध्यम आणि तंत्रज्ञानाच्या परिदृश्यात विशेष नेटवर्किंग संधी आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करेल. हे प्रदर्शन 1ते 3 मे या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि 4 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले राहील. भव्य व्याप्ती, प्रभावशाली प्रदर्शक आणि दूरदृष्टीसह, वेव्हज 2025 हे जागतिक माध्यम अभिसरणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज आहे - एक असे ठिकाण जिथे परंपरा आणि नवोन्मेष एकत्र येऊन कथाकथन, तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे भविष्य घडवणार आहेत.
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2124955)
| Visitor Counter:
13